महिला बचत गटाचे फायदे व तोटे | संपूर्ण माहिती

 मित्रांनो आपण आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये असंख्य सारे महिला बचत गट पाहतो परंतु आपल्याला माहित नसते की त्या बचत गटाचे महिलांना काय फायदे होतात व काय तोटे होतात त्यामुळे आजच्या लेखांमध्ये आपण महिला बचत गटाचे फायदे व तोटे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही खालील लेख संपूर्ण वाचा

Advantages and disadvantages of women's self-help groups

महिला बचत गटाचे फायदे

  • मित्रांनो गावामध्ये जेव्हा एखादा महिला बचत गट स्थापन होतो तेव्हा त्या बचत गटामध्ये गावा मधील सर्व महिला सामील होतात ज्यातून गावाची एकी लक्षात येते
  • यानंतर मित्रांनो गावामधील गरजू व कष्टकरी महिलांना या बचत गटाचा खूप मोठा फायदा होतो
  • तसेच मित्रांनो महिला बचत गट सुरू केल्याने महिलांना दैनंदिन जीवनात एक छोट्याशा पैशांमध्ये बचत करता येते ज्याचा फायदा त्यांच्या कुटुंबाला होतो
  • यानंतर सर्वात महत्त्वाचा फायदा असा की महिला बचत गटांना नेहमी बँके कडून कमी व्याजदरात कर्ज हे दिले जाते ज्यामुळे त्या कर्जाचा उपयोग ते चांगल्या कामासाठी करू शकतात
  • यानंतर सरकार गावांमधील बचत गटांच्या महिलांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम हे राबवत असते ज्याचा देखील फायदा महिला बचत गटातील महिलांना होतो
  • यानंतर मित्रांनो एखाद्या महिलेला जर व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसायाच्या भांडवलासाठी पैसे नसतील तर त्या महिलेला बचत गटातून एक आर्थिक मदत देखील प्राप्त होते
  • एकंदरीत मित्रांना महिला बचत गटामुळे गावामधिल व शहरामधिल सर्व महिलांच्या आत्मविश्वास वाढतो
  • आणि तसेच बचत गटामुळे कुटुंबासाठी एक छोटीशी बचत महिलेला करता येते ज्यामधून सामाजिक आणि आर्थिक स्थिती त्या महिलेच्या कुटुंबाची सुधारते
  • याचबरोबर बचत गटामुळे महिलांच्या उद्योगाला प्राधान्य मिळते व महिला कुटुंबामधील एक सक्षम व स्ववलंबी बनतात ज्यातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते
  • असे वरील काही व अनेक फायदे हे महिला बचत गटाचे आहेत

महिला बचत गटाचे तोटे

मित्रांनो तसे पाहिले तर महिला बचत गटाचे फायदेच फायदे आहेत परंतु महिला बचत गटाचे तोटे पाहिले तर असे फारसे तोटे आपल्याला पाहायला मिळत नाही

  • महिला बचत गटात अशाच महिलांना भाग घेता येतो की ज्यांच्याकडे एका महिन्यात एक छोटीशी रक्कम ती शंभर रुपये असू शकते किंवा हजार रुपये असू शकते ही त्या महिलेला त्या बचत गटात प्रत्येक महिन्याला द्यावी लागते
  • आणि छोटीशी रक्कम पण जर एखाद्या महिलेकडे नसेल तर त्या महिलेला या बचत गटामध्ये भाग घेता येत नाही एवढीच एक छोटीशी समस्या आहे

महिला बचत गटाचे नियम

  • मित्रांनो जेव्हा एक महिला बचत गट स्थापन होतो त्यावेळी तो बचत गट स्थापन करण्यासाठी प्रत्येक महिलेचे स्वयंघोषणापत्र घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये बचत गटाचे सर्व नियम व अटी त्या महिलेला मान्य असल्या पाहिजेत
  • यानंतर महिला बचत गटामध्ये जास्तीत जास्त 20 महिला व कमीत कमी 10 महिला असाव्यात
  • यानंतर बचत गटातील 20 महिलांमधील सर्वांचा विचार घेऊन त्या वीस महिलांमध्ये एक बचत गटाचा अध्यक्ष नेमण्यात यावा
  • बचत गट स्थापन झाल्यानंतर बचत गटाची ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेकडून जमा करून देण्यात यावी
  • यानंतर बचत गटामधील जमा रक्कम बचत गटातील महिलांना कर्ज स्वरूपात देण्यात  यावी
  • तसेच बचत गटाच्या अध्यक्षाने प्रत्येक महिन्याला वेळ व जागा ठरवून तिथे बचत गटाची बैठक घेण्यात यावी व या बैठकीसाठी बचत गटातील सर्व महिलांनी उपस्थित राहावे याची काळजी घ्यावी
  • यानंतर नियमित पैसे न देणाऱ्या महिलेकडून बचत गटाच्या अध्यक्षाने एक विशिष्ट दंड आकारण्यात यावा
  • गटाच्या बाहेरील कोणत्याही महिलेला गटाच्या अध्यक्षांनी कर्ज देऊ नये
  • यानंतर एखाद्या महिलेने जर पहिले गटामधून कर्ज घेतले असेल आणि त्या महिलेला दुसरे कर्ज हवे असे तर ते कर्ज देऊ नये पहिले कर्ज परतफेड केल्याशिवाय दुसरे कर्ज देऊ नये
  • यानंतर एखाद्या संस्थेकडून किंवा बँकेकडून बचत गटासाठी जेव्हा कर्ज घेतले जाते त्यावेळेस बचत गटातील 75% महिलांचे त्या कार्यासाठी प्राधान्य असायला हवे किंवा मान्यता असायला हवी
  • बचत गटातील अध्यक्षांनी कर्ज देताना त्या कर्जा वर व्याजदर व परत फेडीचा कालावधी नियमित ठरवून द्यावा 
  • यानंतर बचत गटातील महिलांना सही किंवा अंगठा करता आला पाहिजे
  • यानंतर बचत गटातील प्रत्येक महिलेचे वय हे 18 वयोगटातील असायला हव
FAQ

महिला बचत गट कसा स्थापन करायचा

महिला बचत गट स्थापन करण्यासाठी महिला बचत गटामध्ये कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 20 महिलांचा समूह असणे गरजेचे आहे.त्या प्रत्येक महिलेचे वय हे 18 वय वर्ष असायला हवे, असे असेल तरच तुम्ही महिला बचत गट हा स्थापन करू शकता

महिला बचत गटामध्ये किती लोकांची संख्या पाहिजे

महिला बचत गटांमध्ये कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 20 लोकांच्या समूह असायला पाहिजे

महिला बचत गट म्हणजे काय

महिला बचत गट म्हणजे 10 ते 20 महिलांनी मिळून  पैशाची बचत करण्यासाठी स्थापन केलेला बचत गट म्हणजे महिला बचत गट होय

Leave a Comment