Goat Farm : बाजारात आला आफ्रिकन बोअर जातीचा बोकड, शेतकऱ्याचा व्यवसाय गाजवणार..

African Boer Goat came to mahrashtra market

शेळी पालन : वाढत्या बेरोजगारीमुळे असंख्य शेतकरी व तरुण प्रवर्ग हा शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच शेळीपालन या व्यवसायाकडे भर देत चालला आहे. ज्यामध्ये बाजारपेठांमध्ये असंख्य जातीचे बोकड आपल्याला पाहायला मिळतात त्यामधीलच एक म्हणजे आफ्रिकन बोअर नावाचा बोकड तो आता बाजारपेठा मध्ये प्रसिद्ध होत चालला आहे.

आफ्रिकन बोअर नावाचा बोकड हा शेळी पालन व्यवसायात शेतकऱ्यांना खूप नफा करून देत आहे कारण म्हणजे त्या बोकड्याला बाजारपेठण मध्ये खूप मागणी वाढत चालली आहे. ज्यामध्ये 25 किलो वजनाचा जर बोकड असेल तर त्याला 17 ते 20 हजार रुपये भाव मिळतो तसेच आफ्रिकन बोर या जातीची जर गाभण शेळी असेल तर तिला 35 ते 40 हजार रुपये आरामात भाव मिळतो ज्यामुळे शेळी पालन व्यवसाय हा खूप नफा करून देणारा व्यवसाय ठरत चालला आहे.

आफ्रिकन बोअर शेळी पालन जात कशी असते

  • आफ्रिकन बोअर जातीतील बोकड व शेळीला रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते त्यामुळे ते सहजता आजारी लवकर पडत नाहीत
  • तसेच या जातीला बाहेर सोडावे लागत नाही बंदिस्त शेडमध्ये देखील आपण पाळून हा व्यवसाय करू शकतो
  • यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बोकडाचे मटणाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बाजारपेठांमध्ये या जातीच्या बोकडला जास्त प्रमाणात मागणी असते
  • तसेच एक वर्षभर जर आपण या जातीचा बोकड किंवा शेळी पाळली तर बकराचे वजन हे एका वर्षात ७० ते ८० किलो इतके पडते व एका शेळीचे वजन हे 50 ते 60 किलो इतके पडते

शेळीपालन व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट

मित्रांनो आपला जर शेळीपालन व्यवसाय करण्याचा विचार असेल तर सुरुवातीला 50 किंवा 100 शेळ्या किंवा बोकड विकत घेऊन असा लार्ज स्केलवर शेळीपालन व्यवसाय करू नये कारण म्हणजे सुरुवातीलाच आपलं जास्त भांडवल गुंतवलं जातं व त्यामुळे इतर खर्च देखील वाढतात त्यामुळे आपले गोट फार्म पहिल्याच वर्षी नुकसानीत जाऊ शकते त्यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करत असाल तर सुरुवात ही कमी भांडवलात करावी अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता

Leave a Comment