अग्निशामक दल पगार | संपूर्ण माहिती मराठीत

मित्रांनो अग्निशामक या पदासाठी पगार हा सुरुवातीचा 21 हजार 700 इतका व शेवटचा 69 हजार 100 इतका असतो

वरील वेतनामध्ये महागाई भत्ता 38% इतका दिला जातो व एच आर ए 27% इतके दिले जाते. त्यामध्ये महागाई भत्ता तुम्हाला 8,226 इतका दिला जातो आणि एच आर ए 5,869 इतका दिला जातो व इतर घर भाडे भत्ता, दळणवळणाचा खर्च असे इतर खर्च मिळून तुम्हाला अग्निशामक दल या पदासाठी एकूण 37,085 इतका पगार दिला जातो

agnishamak dal salary in maharashtra

अग्निशामक दल पगार

पद वेतन
अग्निशामक दल37,085 ते 69,100

अग्निशामक दल कसे बनायचे

मित्रांनो जर तुम्हाला अग्निशामक दल या पदासाठी अर्ज करून तुम्हाला फायरमॅन बनवायचे असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद अंतर्गत जी अग्निशामक दल या पदासाठी भरती घेतली जाते त्यासाठी अर्ज करावा लागेल व अर्ज केल्यानंतर मैदानी चाचणीतून उत्तीर्ण होऊन तुम्ही फायरमॅन हे पद मिळवू शकता

अग्निशामक दल पुरष भरती पात्रता

अग्निशामक दल या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील बाबींमध्ये पात्र असणे खूप गरजेचे आहे

  • अर्ज करणारा उमेदवार जर पुरुष असेल तर त्याचे बारावी पास शिक्षण असणे गरजेचे आहे व त्याला बारावी मध्ये 50% गुणापेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे
  • यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे वय वर्ष 20 ते 32 इतके असायला हवे
  • यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची ही 172 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे
  • तसेच वजन हे 50 किलोग्रॅम पेक्षा जास्त असायला हवे
  • त्यानंतर उमेदवाराची छाती ही न फुगवता करता 81 सेंटीमीटर व फुगवून 86 सेंटीमीटर इतकी भरायला पाहिजे

अग्निशामक दल महिला भरती पात्रता

  • या पदासाठी अर्ज करणारी महिला ही बारावी पास 50% गुणांनी उत्तीर्ण असायला हवी
  • यानंतर अर्ज करणाऱ्या महिलेची उंची ही 162 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे
  • वजन हे 50 किलो पेक्षा जास्त असायला हवे

वरील सांगितलेली पात्रता ही अग्निशामक दल या पदासाठी बसणार आहे जर तुम्ही यात पात्र होत असेल तरच तुम्ही अग्निशामक दल या पदासाठी अर्ज करू शकता

अग्निशामक दल पुरुष मैदानी चाचणी परीक्षा

खालील दिलेल्या सर्व मैदानी चाचणीतील परीक्षा ह्या पुरुष गटातील उमेदवारांसाठी आहेत

  • सर्वप्रथम 800 मीटर धावणे तीन मिनिटाच्या आत धावणे
  • त्यानंतर दुसरी मैदानी चाचणी मध्ये 19 फुटावरून वरून खाली उडी मारणे
  • यानंतर तिसरी मैदानी चाचणी मध्ये जमिनीपासून ते ते तीस फूट खिडकीच्या अंतरावर लावलेल्या शिडीद्वारे वर चडून जाणे व त्याच शिडीद्वारे खाली देखील येणे आणि ही चाचणी फक्त 40 सेकंदाच्या आत पार पाडणे
  • यानंतर चौथी मैदानी चाचणी मध्ये 50 किलोचा पोत अंगावर घेऊन साठ मीटर अंतर धावणे याला देखील टाईम हा 40 सेकंदाचा दिला जातो
  • यानंतर पाचवी मैदानी चाचणी आहे वीस फूट उंच लटकवलेल्या रशीद्वारे वरती चढणे व खाली उतरणे
  • यानंतर सहावी मैदानी चाचणी आहे 20 पुलअप्स काढणे
  • यानंतरचा सातवी मैदानी चाचणी आहे चार किलोचा गोळा फेक टाकणे 
  • यानंतर लांब उडी व पुष अप देखील घेण्यात येतील

अग्निशामक दल महिला मैदानी चाचणी परीक्षा

  • महिलांसाठी सर्वप्रथम मैदानी चाचणी आहे 800 मीटर धावणे त्याच टाइमिंग आहे 4 मिनिटे
  • यानंतर दुसरी मैदानी चाचणी असणार आहे जमिनीपासून 30 फूट उंचीवर असणाऱ्या शिडीने वरती जाणे व खाली उतरणे यासाठी महिलांना एक मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे
  • यानंतर तिसरी मैदानी चाचणी असणार आहे 50 किलो वजनाची गोन खांद्यावरती घेऊन 60 मीटर अंतरापर्यंत धावणे यासाठी महिलांना 45 सेकंद इतका टाइमिंग दिला जाणार आहे
  • अशी वरील मैदानी चाचणी ही महिलांसाठी घेण्यात येणार आहे

अग्निशामक दल कामे

मित्रांनो अग्निशामक दल असे एकदल आहे की जे दल खूप महत्त्वाचे दल मानले जाते. कारण मित्रांनो या दलाचे काम असे असते की नैसर्गिक रित्या झालेली आपत्ती असेल तसेच एखादी इमारत कोसळणे किंवा एखाद्या इमारतीला आग लागणे अशा जेव्हा घटना शहरांमध्ये होतात तर त्या घटना टाळण्यासाठी त्या घटनेतून लोकांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दल हे पथक नेमण्यात येते व त्यांचे संपूर्णपणे लोकांना घडलेल्या घटनेतून वाचवणे हेच काम असते

मित्रांनो जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडते तेव्हा तिथून जेव्हा अग्निशामक दलाला फोन येतो तेव्हा अगदी दहा मिनिटाच्या आत अग्निशामक दलाला त्या घटनेस स्थळी तिथे हजर राहावे लागते

अग्निशामक दलाचे संपूर्णपणे काम हे लागलेल्या ठिकाणची आग विझवणे व तेथील लोकांना सुखरूपपणे वाचवणे असे असते

FAQ
अग्निशामक दल म्हणजे काय

लागलेल्या आगेवर नियंत्रण करून ती आग व्यवस्थितपणे विजवणे यालाच अग्निशामक दल असे म्हणतात

किती प्रकारचे अग्निशामक दल आहेत

विमान अग्निशामक दल, जहाज शिबोर्ड अग्निशामक दल, वायु अग्निशामक दल समुद्रिक अग्निशामक दल आणि नैकट्य अग्निशामक दल अशाप्रकारे अग्निशामक दल आहेत

अग्निशामक दल नंबर

मित्रांनो तुमच्या विभागात जर आग लागली किंवा नैसर्गिक आपत्ती झाली तर तुम्ही सर्वप्रथम 112 या क्रमांकावर फोन करून अग्निशामक दल हे बोलू शकता

Leave a Comment