अंगणवाडी मदतनीस पगार किती आहे

मित्रांनो ग्रामीण व शहरी भागात ज्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी अंगणवाडी असतात त्यामध्ये जी अंगणवाडी मदतनीस काम करत असते तिला सुरुवातीला पगार हा 2250 ते 3500 रुपये प्रति महिना इतका दिला जात होता परंतु आता शासनाच्या नवीन शासन नियमानुसार अंगणवाडी मदतनीस पगार हा कमीत कमी 4500 रुपये ते जास्तीत जास्त 5500 रुपये प्रति महिना इतका करण्यात आलेला आहे

अंगणवाडी मदतनीस पगार व मानधन 

अंगणवाडी मदतनीस पदवेतन सुरवातीचे वेतन 
अंगणवाडी मदतनीस पगारRs. ४,५०० ते ५,५००  ४,५००

अंगणवाडी मदतनीस म्हणजे काय

मित्रांनो अंगणवाडी मदतनीस म्हणजे असे की आपण पाहतो की प्रत्येक अंगणवाडीमध्ये अंगणवाडीची देखरेख करण्यासाठी एक अंगणवाडी सेविका नेमण्यात येते व त्या सेविकेच्या मदतीसाठी एक अंगणवाडी मदतनीस देखील नेमण्यात येते तिलाच अंगणवाडी मदतनीस असे म्हणतात परंतु मित्रांनो अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका पेक्षा पगार हा कमी असतो

अंगणवाडी मदतनीस ची कामे

मित्रांनो अंगणवाडी मदतनीस ची कामे ही काय असतात तर जसे की अंगणवाडी मदतनीस ही अंगणवाडी सेविकेच्या हाताखाली काम करत असते त्यामुळे अंगणवाडी मदतनीस ची कामे ही खालील प्रमाणे असतात

  • सर्वप्रथम अंगणवाडी मदतनीस ला अंगणवाडी बाहेरील व सभोवतालचा परिसर नियमित पणे स्वच्छ ठेवणे व त्याची देखभाल करणे असे काम असते
  • यानंतर लहान मुलांच्या आहाराच्या स्वयंपाकासाठी व दैनंदिन कामासाठी पिण्याचे व वापरण्याचे पाणी आणणे किंवा सोय करणे
  • तसेच यानंतर लहान मुलांचा आहार स्वयंपाक बनवणे व त्यांना तो वाटप करणे
  • तसेच लहान मुलांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवणे व मुलांना स्वच्छ राहण्यासाठी मदत करणे
  • यानंतर मुलांच्या पोषण आहारासाठी ज्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तूंचा साठा करणे किंवा उपलब्ध करून ठेवणे
  • यानंतर अंगणवाडी बरे बसून ते सुटेपर्यंत व्यवस्थित सर्व मुलांवर लक्ष ठेवणे व त्यांच्या पालकांकडे त्यांना सोपवणे अशी जबाबदारी देखील अंगणवाडी मदतनीस ची असते

अंगणवाडी मदतनीस पात्रता काय आहे

  • मित्रांनो महाराष्ट्रा मध्ये अंगणवाडी मदतनीस साठी पात्रता ही अशी आहे की अंगणवाडी मदतनीस चे किमान 12 पास इतके शिक्षण असणे गरजेचे आहे
  • यानंतर उमेदवाराचे वय हे 18 वर्षाच्या पुढील ते 35 वर्षाच्या आतील असायला हवे
  • तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जर लग्न झाले असेल तर त्याला दोन पेक्षा जास्त मुले असायला नाही पाहिजेत
  • यानंतर अर्ज करणारा उमेदवार जर ग्रामीण भागातील असेल तर त्याला मराठी भाषा येणे गरजेचे आहे आणि अर्ज करणारा उमेदवार जर शहरी भागातील असेल तर त्याला मराठी व हिंदी या दोन्हीही भाषा येणे गरजेचे आहे
  • या पदासाठी अनुसूचित जाती जमातींना देखील मोठ्या प्रमाणात प्राधान्य हे दिले जाते
अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो जर तुम्ही अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला हवित

  • सर्वप्रथम आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • दहावी किंवा बारावी पास शिक्षण प्रमाणपत्र
  • अशी वरील ठराविक कागदपत्रे असणे गरजेचे आहे

Leave a Comment