अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे माहिती

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना ही अशी योजना आहे की ज्या अंतर्गत महाराष्ट्रा मधील बेरोजगारांना एक व्यवसायासाठी कर्ज दिले जाते व ते कर्ज मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात व त्यासाठी अर्ज कसा करावा हे आपण या लेखांमधून पाहणार आहोत.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

मित्रांनो अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील कागदपत्रे ही अर्जा सोबत जोडावी लागतील त्यामुळे ती कागदपत्रे तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या.

  • सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःची ओळखपत्र असणे गरजेचे आहे (ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्ड पाहिजे)
  • त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्रा मधील रहिवासी असावा व त्याच्याजवळ ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडून मिळणारा रहिवासी दाखला पुरावा असावा
  • यानंतर उमेदवाराकडे दोन जमीनदारांचे प्रतिज्ञापत्र किंवा सहमती पत्र असावे
  • यानंतर उमेदवाराकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे
  • तसेच उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला देखील असणे गरजेचे आहे
  • उमेदवार जो व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायाचा अनुभव किंवा प्रशिक्षण असल्याचे प्रमाणपत्र देखील त्याच्याजवळ असणे गरजेचे आहे
  • यानंतर उमेदवार हा व्यवसाय ज्या जागेत करणार त्या जागेचा सातबारा किंवा जागी विषयी पुरावे त्याच्या जवळ असणे गरजेचे आहे
  • यानंतर ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिकेकडून त्या व्यवसायासाठी मिळालेली परवानगी पुरावा देखील त्याच्या जवळ असणे गरजेचे आहे
  • तसेच कर्ज घेण्याचा प्रकल्प अहवाल त्याच्याजवळ असायला हवा
  • अशा वरील कागदपत्रांची गरज ही अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेसाठी लागणार आहे

 निवड व पात्रता

मित्रांनो या अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याची निवड ही खालील पद्धतीने केली जाते

  • अर्जदार हा मुळचा महाराष्ट्रा मधिल रहिवासी असावा
  • यानंतर अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे शहरी भागासाठी 55 हजार इतके व ग्रामीण भागासाठी 40 हजार रुपये इतके असावे
  • यानंतर अर्जदाराचे वय हे 18 ते 45 वयोगटातील असावे
  • नंतर अर्जदारांने (maharojgar. gov.in)या संकेतस्थळावर त्याची नोंदणी करायला हवी नोंदणी कशी केली जाते यासंबंधी तुम्ही youtube वरती प्रत्यक्ष व्हिडिओ पाहू शकता
  • यानंतर अर्ज करणारा उमेदवार हा मराठा समाजातील असावा
  • यानंतर अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी याआधी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसला पाहिजे
  • अशी वरील काही पात्रता या अण्णासाहेब महामंडळ कर्ज योजनेसाठी आहे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज कसा करायचा

  • या योजनेसाठी जर लाभार्थ्याला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम लाभार्थ्याने या योजने संबंधित असणाऱ्या (maharojgar. gov.in) या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी अर्ज करू शकतो
  • तसेच जर लाभार्थ्याला मोबाईलवर अर्ज करताना अडचण येत असेल तर लाभार्थी हा जवळच्या नागरी सुविधा केंद्रा मध्ये जाऊन या योजने संबंधित माहिती घेऊन अर्ज करू शकतो
  • नाहीतर लाभार्थी हा जवळच्या जिल्हा कार्यालयामध्ये किंवा पंचायत समिती कार्यालय मध्ये जाऊन देखील ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकतो
  • अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला या योजनेसाठी निवडले जातात व त्यानंतर तुम्हाला कर्ज हे दिले जाते
योजनेचे नावAnnasaheb Patil Aarthik Vikas Mahamandal Loan Scheme
विभागकौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ10 लाख ते 50 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य
उद्देश्यव्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Leave a Comment