बँक अकाउंट बंद करण्यासाठी सोप्पा अर्ज कसा करायचा 

खूपदा असे होते की आपल्याला एखाद्या ठराविक बँकेचे खाते हे बंद करायचे असते परंतु आपल्याला ते कसं करायचं माहित नसतं त्यामुळे आजच्या लेखक तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल की बँक अकाउंट बंद करण्यासाठी कोणता अर्ज करायचा व तो अर्ज कोणाकडे नेऊन द्यायचं व त्यासाठी काय कागदपत्रे लागतात यासंबंधी सर्व माहिती या लेखात दिली आहे 

application for bank account close in marathi

बँक अकाउंट कसे बंद करायचे

मित्रांनो बँक अकाउंट बंद करण्यासाठी तुम्हाला एखाद्या कोऱ्या कागदावरती अर्ज करावा लागतो तो अर्ज तुम्ही खालील पद्धतीने केला पाहिजे

श्री शाखाप्रमुख महोदय

बँक ऑफ महाराष्ट्र (शाखेचे नाव)

पुणे (गावचे नाव व पिन कोड)

विषय : बँक खाते बंद करण्याबाबत

महोदय 

बँक शाखाप्रमुख आपणास माझी नम्र विनंती आहे की माझे नाव संपूर्ण नाव हे आहे आणि माझे आपल्या बँकेत खाते आहे परंतु संबंधित कारणामुळे मला ते खाते बंद करायचे आहे त्यासाठी मी तुम्हाला एक विनंती अर्ज करतो की माझे खाते लवकरात लवकर बंद करा

खात्याचा खाते क्रमांक :

खातेदाराचे नाव :

मोबाईल क्रमांक :

आपला विश्वासू

वरील दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्हाला खाते बंद करण्यासाठी अर्ज करायचा आहे

बँक अकाउंट बंद करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

  • ओळखपत्र (आधार कार्ड किंवा पॅन कार्ड)
  • एटीएम कार्ड 
  • बँक पासबुक

वरील कागदपत्रे तुम्हाला अर्ज सोबत जोडून संबंधित शाखाप्रमुख आकडे नेऊन द्यायचे आहे त्यानंतर सात ते आठ दिवसात तुमच्या अकाउंट हे बंद केले जाईल

बँक अकाउंट किती दिवसात बंद होते

अर्ज केल्याच्या सात ते आठ दिवसात बँकेचा शाखाप्रमुख संबंधित कर्मचाऱ्यांना सांगून तुमच्या अकाउंट बंद करून टाकतो

बँक अकाउंट बंद झाले तर काय करावे

खूपदा अचानक आपले बँक अकाउंट हे बंद होते व आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येत नाही याचं कारण असं होतं की आपण जेव्हा बँकेच्या खात्यावरून संपूर्ण रक्कम काढून घेतो व त्या खात्यावरून दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत एकही व्यवहार करत नाही तेव्हा आपल्या बँकेचे खाते हे बंद होते ते खाते पुन्हा परत चालू करता येते त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन शाखाप्रमुखाला विनंती अर्ज करून काही ठराविक रक्कम भरून ते खाते चालू करावे लागते

बँकेचे सर्व अर्ज कसे करायचे

Leave a Comment