आरोग्य सेवक पगार | arogya sevak salary

मित्रांनो आरोग्य सेवक या पदासाठी शासनाकडून पगार हा दोन विभागात दिला जातो एक म्हणजे जर आरोग्य सेवक या पदावरती काम करणारा उमेदवार जर मेट्रो शहरात काम करत असेल म्हणजेच महानगरपालिकेच्या ठिकाणी काम करत असेल तर त्याला तेथील खर्चाच्या अनुसार थोडासा अधिक पगार दिला जातो आणि ग्रामीण भागातील काम करणाऱ्या उमेदवाराला थोडा कमी पगार हा दिला जातो

arogya sevak salary

आरोग्य सेवक पद व पगार | arogya sevak salary

आरोग्य सेवक पदवेतन सुरवातीचे वेतन 
आरोग्य सेवक पगारRs.२५,५०० ते ८१,१००  ३८,३००

आरोग्य सेवक ची कामे

मित्रांनो आरोग्य सेवकाची कामे ही खालील असतात

  • जर तुम्ही आरोग्य सेवक या पदावरती काम करत असाल तर तुम्हाला जो काम करण्यासाठी एरिया दिला जातो म्हणजेच तुम्हाला जी गावे दिली जातात तिथे तुम्हाला दर महिन्याला गावामध्ये भेट घेऊन कोणत्या व्यक्तीला कोणता आजार आहे त्यानुसार त्या व्यक्तीवर प्रथम उपचार करावे लागतात. (सर्दी खोकला हिवताप जुलाब पोट दुखी अंगदुखी खरूज अशा साध्या आजारांवर ती तुम्हाला प्रथम उपचार करावे लागतात)
  • तसेच यानंतर त्या गावांमध्ये किती गरोदर महिला आहेत त्यांची तुम्हाला नोंदणी करून घ्यावी लागते तसेच वेळोवेळी त्यांना लागणारी औषधे तुम्हाला पुरवावी लागतात
  • तसेच गावामध्ये वेळोवेळी होणारे लहान मुलांचे पोलिओचे डोस असतील किंवा इतर डोस असतील त्या संबंधित तुम्हाला गावामध्ये माहिती देऊन त्या शिबिराचा त्यांना लाभ मिळवून द्यावा लागतो
  • यानंतर गावातले दूषित पाणी चांगले शुद्धीकरण होण्यासाठी गावामध्ये तुम्हाला पाण्यात टाकण्यासाठी टी.सी.एल. वाटावे लागते
  • यानंतर तसेच इतर बाहेरील साथीच्या रोगांची माहिती गावामध्ये देणे व त्यासाठीच्या रोगांपासून आपले संरक्षण कसे करायचे यावर गावातील लोकांना उपाययोजना सांगणे अशी कामे ही आरोग्य सेवक न करावी लागतात

आरोग्य सेवक बनण्यासाठी पात्रता काय आहे

  • 10 वी किंवा 12 वी पास प्रमाणपत्र
  • अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा
  • या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 18 ते 45 वयोमर्यादेमधील असायला हवा

आरोग्य सेवक कसे बनायचे

मित्रांनो आरोग्य सेवक या पदाची निवड ही सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या जाहिरातीमधून केली जाते ज्यामध्ये आरोग्य सेवक बनण्यासाठी इच्छुक उमेदवारांची एक 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते व त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना आरोग्य सेवक हे पद दिले जाते

आरोग्य सेवक परीक्षा अभ्यासक्रम
अ. क्र विषय प्रश्न संख्या गुण 
1मराठी 1530
2इंग्लिश 1530
3अंकगणित व बुद्धिमत्ता 1530
4सामान्यज्ञान 1530
5तांत्रिक ज्ञान4080
एकूण 100200
FAQ
आरोग्य सेवक म्हणजे काय

आरोग्य सेवक म्हणजे महाराष्ट्र सरकार मार्फत राबवण्यात येणारा ग्रामीण व शहरी भागातील लोकांसाठी गोळ्या औषधे उपलब्ध करून एक प्रथमोपचार करणारा सेवक म्हणजेच आरोग्य सेवक होय

आरोग्य सेवक सॅलरी

आरोग्य सेवकाची सॅलरी ही सुरुवातीला 28 हजार पाचशे कमीत कमी व जास्तीत जास्त 81 हजार 100 इतकी आहे

Leave a Comment