बांधकाम कामगार योजना फायदे | bandhkam kamgar | बांधकाम कामगार योजना 2023 | बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
बांधकाम कामगार योजना फायदे यामध्ये प्रत्येक तीन वर्षाला प्रत्येक कामगाराला बांधकामाचे साहित्य खरेदी करण्यासाठी ५ हजाराचा लाभ भेटतो त्याचबरोबर बांधकाम कामगाराच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाकडून पैसे भेटतात तसेच बांधकाम कामगारांच्या पहिल्या लग्नासाठी देखील शासनाकडून ३० हजार इतके पैसे हे भेटत असतात त्यानंतर बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा देखील दिला जातो तसेच त्याचबरोबर नोंदणी बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा देखील दिला जातो यानंतर नोंदीत बांधकाम कामगारांसाठी कौशल्य वृद्धीकरण योजना देखील राबवली जाते.
योजना फायदे
- त्यानंतर बांधकाम कामगार योजना फायदे यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक योजनांचा देखील लाभ भेटतो त्यामध्ये बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी पहिली ते सातवी साठी प्रति वर्ष २५०० रुपये चा लाभ भेटतो आणि आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी ५ हजार रुपयांचा लाभ हा बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भेटत असतो
- तसेच बांधकाम कामगाराच्या दोन मुलांना जर अकरावी व बारावी वर्गात ५० टक्के हुन अधिक गुण मिळाले असतील तर त्यांना दहा हजार रुपये इतके दोन वर्ष शिष्यवृत्ती ही शासनाकडून मिळत असते
- त्यानंतर सेपरेट एक वेगळी बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी दोन्ही वर्ष दहा दहा हजार रुपये शिष्यवृत्ती ही मिळत असते
- त्यानंतर बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी व त्याच्या पत्नीस प्रथम पदवीस व द्वितीय व तृतीय वर्षाच्या शिक्षणासाठी व त्या शिक्षणाच्या पुस्तकांचा खर्च व इतर सामग्री साठी शासनाकडून प्रतिवर्षी २० हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते
- त्यानंतर बांधकाम कामगाराची मुले किंवा पत्नी जर वैद्यकीय पदवी घेत असेल तर त्यांना त्या पदवीच्या अभ्यासाकरिता प्रति वर्ष १ लाख रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्याचबरोबर अभियांत्रिकी पदवीसाठी देखील प्रति वर्ष ६० हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते
- त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांसाठी डिप्लोमाच्या शिक्षणासाठी प्रति वर्ष २० हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाते
- त्यानंतर बांधकाम कामगारांच्या मुलांच्या MSCIT करिता देखील शासनाकडून ४५०० इतकी शिष्यवृत्ती ही दिली जाते
- यानंतर बांधकाम कामगार आरोग्य योजना देखील शासनाकडून राबवल्या जातात ज्यामध्ये बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांचा जन्म हा नॉर्मल डिलिव्हरीने झाला असेल तर तेव्हा शासनाकडून १५ हजार रुपये इतके मानधन दिले जाते आणि जर त्याच पहिल्या दोन मुलांचा जन्म हा शस्त्रक्रियेने म्हणजेच सिझेरियन ने झाला असेल तर तेव्हा शासनाकडून २० हजार इतके अनुदान दिले जाते
- यानंतर बांधकाम कामगार कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाख रुपये इतके शासनाकडून अनुदान हे दिले जाते यामध्ये जर गंभीर आजार असेल तरच हा शासनाकडून लाभ दिला जातो
- यानंतर नोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास शासनाकडून २ लाख रुपये इतके अनुदान हे दिले जाते
- यानंतर मित्रांनो शासनाकडून बांधकाम कामगार अर्थसाह्य योजनाचा देखील लाभ बांधकाम कामगारास दिला जातो.ज्यामध्ये बांधकाम कामगाराचा जर बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला तर शासनाकडून त्या बांधकाम कामगाराच्या कुटुंबास म्हणजेच त्याच्या वारसास बांधकाम अपघात योजने मार्फत ५ लाख रुपये इतके शासनाकडून अनुदान दिले जाते
- यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा जर नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला तर त्या कामगाराच्या वारसास शासनाकडून २ लाख रुपये इतके अनुदान दिले जाते
- यानंतर बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूच्या अंत्यविधीसाठी शासनाकडून १० हजार रुपये इतके अनुदान दिले जाते
- नोंदणीकृत बांधकाम कामगार याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या विधवा पत्नीस किंवा महिला कामगाराच्या विदुर पतीस शासनाकडून २४ हजार रुपये इतके प्रति वर्ष असे पाच वर्षे अनुदान दिले जाते
तर मित्रांनो असे वरील फायदे आपल्याला बांधकाम कामगार योजनेतून मिळू शकतात
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे काढायचे
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आपल्याला जिल्ह्याच्या कामगार कल्याणकारी मंडळाशी संपर्क करायचा आहे म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे पण त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कामगार असल्याची नोंदणी करणे गरजेचे आहे तुम्ही जर कामगार असल्याची जर नोंदणी केलेली असेल तुमच्याकडे त्याची पावती असेल तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी अर्ज करू शकता आणि जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कामगार असल्याची नोंदणी करावी लागेल त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल त्या पावतीची झेरॉक्स त्या अर्ज सोबत तुम्हाला जोडायचे आहे हा अर्ज तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर तुमची कामगार असल्याची नोंदणी केली जाते आणि तुम्हाला हे जे स्मार्ट कार्ड आहे हे घरपोच तुमच्या पत्त्यावरती पाठवलं जातं आता या स्मार्ट कार्ड मध्ये सविस्तर तुमची माहिती दिलेली असते त्यामध्ये संपूर्ण तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर तुमचा पत्ता आणि तुम्ही कामगार असल्याचे एक नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी दिला जातो तर मित्रहो अशा सोप्या पद्धतीने आपण हे कामगार स्मार्ट कार्ड काढू शकतात तर आत्तापर्यंत आपण जर हे कामगार स्मार्ट कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर आपण हे कामगार स्मार्ट कार्ड काढून घ्या
कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे
कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे जर आपण पाहिले तर यामध्ये कामगारांच्या मुलांना व कुटुंबास यामध्ये कल्याणकारी योजना म्हणून कामगारांसाठी राबवली जाते त्यामध्ये पहिल्या लग्नाच्या खर्चासाठी 30 हजार रुपये इतके शासनातर्फे अनुदान दिलं जातं त्याचबरोबर मध्यान भोजन योजना असेल प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्याचबरोबर आर्थिक मदत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या एका मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये अशा प्रकारचे देखील ही योजना आहे आणि शिक्षणासाठी म्हणजे जर कामगारांची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी देखील विविध योजना शासनातर्फे राबवल्या जातात त्यामध्ये पहिलीपासून पदवीधर असेल वैद्यकीय शिक्षण असेल अभियांत्रिकी शिक्षण असेल यासाठी कामगाराच्या मुलांना विविध योजनांचा लाभ या ठिकाणी दिला जातो त्याचबरोबर आरोग्याची काळजी म्हणून विविध आरोग्य योजना या ठिकाणी राबवल्या जातात असे असंख्य कामगार स्मार्ट कार्ड काढण्याचे फायदे आहेत.
FAQ
बांधकाम कामगार नोंदणी 2023
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपल्याला गुगल वरती www.mahabocw.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला बांधकाम कामगार योजना नोंदणी करायची आहे.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
शासनाच्या विविध बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाते बांधकाम कामगार नोंदणी झाल्यानंतर हे कार्ड आपल्याला बांधकाम कामगाराच्या पत्त्यावर दिले जाते आणि सध्या तरी बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्याची सुविधा शासनाने अजून उपलब्ध केली नाही.
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2023
प्रत्येक बांधकाम कामगाराला दिवाळी बोनस हा शासनाकडून प्रती वर्षी ५ हजार किंवा १० हजर इतक्या रकमेत दिला जातो.
बांधकाम कामगार घरकुल योजना
बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ घेण्यसाठी सर्वप्रथम तुम्हला तुमच नोंदणीकरण करणे गरजेचे आहे. ते नोंदणीकरण तुम्ही www.mahabocw.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन फोर्म भरून करू शकता,आणि आपण याच संकेत स्थळावर जाऊन बांधकाम कामगार योजना यादी देखिल पाहू शकतात.