बँकेचे सर्व अर्ज कसे करायचे | bank application in marathi

बँकेचे अर्ज किती प्रकारचे असतात | arj in marathi

प्रत्येक बँकेमध्ये प्रत्येक नागरिकाचा विचार करून त्याला त्या बँकेच्या असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, परंतु काही वेळेस बँकेमधील कामगाराच्या गैर सेवेमुळे असंख्य नागरिकांना बँकेच्या सुविधा वेळोवेळी उपलब्ध होत नाहीत.

 त्यावेळी नागरिकाला त्या बँकेत सर्व सेवा मिळण्यासाठी अर्ज करण्याचा अधिकार हा मिळतो व या अधिकाराने तो व्यक्ती त्याला अडचण आलेल्या सेवेसाठी अर्ज करू शकतो व ती सेवा जलद गतीने प्राप्त करून घेऊ शकतो

  • वरील माहितीचा अनुसरून खालील पद्धतीचे अर्ज हे बँकेमध्ये केले जातात सर्वप्रथम ग्राहकाला जर त्या बँकेचे बँक पासबुक मिळाले नसेल तर तो त्यासाठी विनंती अर्ज करू शकतो जे की आपण खालील लेखांमध्ये पाहणार आहोत
  • यानंतर असंख्य प्रकारच्या खाजगी व सरकारी कामासाठी ग्राहकाला बँकेचे बँक स्टेटमेंट वेळोवेळी हवे असते तर ते स्टेटमेंट मिळवण्यासाठी तो वेगळा विनंती अर्ज करू शकतो
  • यानंतर तिसरा अर्ज हा जर एखाद्या व्यक्तीला त्या बँकेतील खाते हे बंद करायचे असेल तर तो व्यक्ती त्या बँकेसाठी विनंती अर्ज करू शकतो
  • यानंतर चौथा अर्ज करण्याचा प्रकार हा कर्ज विनंती अर्ज असा असतो यामध्ये ग्राहकाला बॅंकेकडून जलद गतीने कर्ज प्राप्तीसाठी अर्ज हा करावा लागतो
  • यानंतर पाचवा अर्ज करण्याचा प्रकार हा त्या बँकेच्या मॅनेजर म्हणजेच बँक प्रमुखा साठी असतो जर एखाद्या ग्राहकाला एखाद्या कामगाराची किंवा प्रसंगाची तक्रार ही बँकेच्या बँक प्रमुख म्हणजेच मॅनेजर कडे करायची असेल तर तो हा अर्ज करू शकतो
  • यानंतर अर्ज करण्याचा सहावा प्रकार हा जर एखाद्या व्यक्तीला त्या बँकेमध्ये एखाद्या नोकरीची गरज असेल अर्थात सेक्युरिटी गार्ड ची गरज असेल तर तो व्यक्ती देखील विनंती अर्ज करू शकतो

तर वरील सांगितलेले सहा बँकेचे अर्ज फॉरमॅट प्रकार आहेत व ते कसे केले जातात ते तुम्ही खालील लेखामध्ये वाचून पाहू शकता

बँक पासबुक अर्ज  | application for bank passbook in Marathi

मित्रांनो जर तुम्हाला बँकेतून बँक खाते पासबुक हे जर मिळाले नसेल आणि जर तुम्हाला आर्थिक कामात अडचण येत असेल किंवा बँक पासबुक ची गरज भासत असेल व्यवहार दाखवण्यासाठी तर तुम्ही खलील पद्धतीने एक विनंती अर्ज हा त्या बँकेच्या बँक मॅनेजरला करू शकता

खालील दिलेला फॉरमॅट हा बँक पासबुक विनंती अर्ज फॉरमॅट आहे (bank pass book arj format )

बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी विनंती अर्ज

प्रति

मा.शाखा अधिकारी साहेब / (अर्थात इथे बँक मॅनेजर चे नाव)

तालुका खेड, जिल्हा पुणे / (अर्थात इथे बँक शाखा पत्ता)

दिनांक 01/09/2024 / (तारीख )

अर्जदाराचे स्वतःचे नाव (तुम्ही)

अर्जाचा विषय – बँक पासबुक मिळण्याबाबत

बँक खाते क्रमांक – (0000123498)

माननीय महोदय,

वरील विषयास अनुसरून मी (स्वतःचे पूर्ण नाव) आपणास तुमच्या बँकेचा ग्राहक म्हणून असा विनंती अर्ज सादर करतो की, की मी आपल्या या (बँकेचे पूर्ण नाव) बँकेचा बँक खातेदार आहे व माझा खाते क्रमांक (तुमचा खाते क्रमांक टाका) असा आहे व अजूनही मला या खात्याचे बँक खाते पासबुक प्राप्त झाली नाही

त्यामुळे मी आपल्याला या बँकेचे एक ज्येष्ठ अधिकारी म्हणून असा विनंती अर्ज करतो की मला या बँकेचे बँक खाते पासबुक लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे ज्यामुळे माझ्या आर्थिक अडचणी दूर होतील व आपला ऋणी राहील

आपला खातेधारक

(स्वत:चे पूर्ण नाव)

बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज | application for bank account off

जसे की काही लोकांचे एका बँके हुन अधिक बँकेत खूप सारे अकाउंट खाते असतात ज्यामुळे त्यांना एका ठराविक बँकेत सेविंग करता येत नाही किंवा त्यांना त्या सेविंग वरती योग्य व्याजदर मिळत नाही त्यामुळे जर त्या व्यक्तीला इतर बँकेतील खाते बंद करायचे असेल तर तो व्यक्ती खालील पद्धतीने अर्ज करू शकतो

बँक खाते बंद करण्यासाठी बँक खाते बंद अर्ज फॉरमॅट

बँक खाते बंद करण्यासाठी विनंती अर्ज

प्रति

मा.शाखा अधिकारी साहेब / (अर्थात इथे बँक मॅनेजर चे नाव)

तालुका खेड, जिल्हा पुणे / (अर्थात इथे बँक शाखा पत्ता)

दिनांक 01/09/2024 / (तारीख )

अर्जदाराचे स्वतःचे नाव (तुम्ही)

अर्जाचा विषय – बँक खाते बंद करण्याबाबत

बँक खाते क्रमांक – (0000123498)

माननीय महोदय,

वरील विषयास अनुसरून मी (स्वतःचे पूर्ण नाव) आपणास तुमच्या बँकेचा ग्राहक असून आपणास असा विनंती अर्ज सादर करतो की, की मी आपल्या या (बँकेचे पूर्ण नाव) बँकेचा बँक खातेदार आहे मी या बँकेमध्ये माझे सेविंग खाते आहे व माझा खाते क्रमांक (तुमचा खाते क्रमांक टाका) असा आहे परंतु माझ्या नोकरीच्या अडचणीमुळे व आर्थिक गरजांमुळे मला माझे बँक खाते हे बदलावे लागले आहे त्यामुळे मी असा विनंती अर्ज करतो की आपल्या बँकेमध्ये असणारे माझे सेविंग खाते हे तुम्ही पूर्णपणे बंद करून टाकावे

ज्यामुळे माझ्या आर्थिक अडचणी दूर होतील व मी आपला ऋणी राहील

आपला खातेधारक

(स्वत:चे पूर्ण नाव)

बँक कर्ज प्राप्तीसाठी अर्ज | application for bank loan

दैनंदिन जीवनात असंख्य लोकांना पैशाची गरज भासत असते व ते पैसे मिळवण्यासाठी बँकेकडे धावत असतात परंतु बँक काही वेळेस ग्राहकांकडे योग्य पणे लक्ष देत नाही ज्यामुळे ग्राहकांना कर्ज मिळण्यास खूप त्रास होतो त्यासाठी एक उपाय म्हणून तुम्ही त्या बँकेतून कर्ज प्राप्तीसाठी खालील पद्धतीने अर्ज करू शकता

बँक कर्जप्राप्ती अर्ज फॉरमॅट खालील प्रमाणे

बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी विनंती अर्ज

प्रति

मा.शाखा अधिकारी साहेब / (अर्थात इथे बँक मॅनेजर चे नाव)

तालुका खेड, जिल्हा पुणे / (अर्थात इथे बँक शाखा पत्ता)

दिनांक 01/09/2024 / (तारीख )

अर्जदाराचे स्वतःचे नाव (तुम्ही)

अर्जाचा विषय – कर्ज मिळण्याबाबत

बँक खाते क्रमांक – (0000123498)

माननीय महोदय,

वरील विषयास अनुसरून मी (स्वतःचे पूर्ण नाव) आपणास तुमच्या बँकेचा ग्राहक असून आपणास असा विनंती अर्ज सादर करतो की, की मी आपल्या या (बँकेचे पूर्ण नाव) बँकेचा बँक खातेदार आहे मी या बँकेमध्ये माझे सेविंग खाते आहे व माझा खाते क्रमांक (तुमचा खाते क्रमांक टाका) असा आहे

परंतु मला आपल्या बँकेकडून एक व्यवसायासाठी आर्थिक मदत म्हणून कर्ज हवे आहे यासाठी मी सर्व कागदपत्रे बँकेकडे जमा देखील केली आहेत. परंतु अजून मला काही कर्जबाबत निरोप आला नाही.

त्यामुळे तुम्ही या बँकेचे जेष्ठ नागरिक म्हणून माझ्या अर्जाकडे लक्ष देऊन माझी चिंता दूर करण्यासाठी व माझ्या व्यवसायाच्या आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करण्यासाठी मला कर्ज वेळोवेळी प्राप्त करून द्यावे अशी विनंती मी आपणास करतो,ज्यामुळे माझ्या आर्थिक अडचणी दूर होतील व मी आपला ऋणी राहील

आपला खातेधारक

(स्वत:चे पूर्ण नाव)

बँक मॅनेजर अर्ज | application for bank manager

मित्रांनो काही वेळेस काय होतं की ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे तेथील काम करणारे व्यक्ती किंवा कामगार व्यक्ती आपल्या सोबत अतिशय उद्धटपणे वागत असते ज्यावर उपाय म्हणून आपण त्या बँकेच्या कामगारावर एक अर्ज देखील दाखल करू शकतो जो अर्ज बँक मॅनेजर कडे दिला जातो व त्या कर्जामुळे त्या कामगारावरती योग्य ती कारवाई होऊ शकते त्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने अर्ज करू शकता

बँक कामगार तक्रार अर्ज

प्रति

मा.शाखा अधिकारी साहेब / (अर्थात इथे बँक मॅनेजर चे नाव)

तालुका खेड, जिल्हा पुणे / (अर्थात इथे बँक शाखा पत्ता)

दिनांक 01/09/2024 / (तारीख )

अर्जदाराचे स्वतःचे नाव (तुम्ही)

अर्जाचा विषय – बँक कामगार तक्रार अर्ज

बँक खाते क्रमांक – (0000123498)

माननीय महोदय,

वरील विषयास अनुसरून मी (स्वतःचे पूर्ण नाव) आपणास तुमच्या बँकेचा ग्राहक असून आपणास असा विनंती अर्ज सादर करतो की, की मी आपल्या या (बँकेचे पूर्ण नाव) बँकेचा बँक खातेदार आहे मी या बँकेमध्ये माझे सेविंग खाते आहे व माझा खाते क्रमांक (तुमचा खाते क्रमांक टाका) असा आहे

परंतु मला आपल्या बँकेच्या काही कामगारांवरती अशी तक्रार करायची आहे की ते कामगार बँकेच्या ग्राहकांना उद्धटपणे बोलतात व वागतात व त्यांना योग्य प्रकारे वागणूक देत नाही ज्यामुळे असंख्य नागरिकांची कामे ही रखडली जातात व वेळोवेळी होत नाहीत

त्यामुळे तुम्ही या बँकेचे जेष्ठ नागरिक म्हणून माझ्या अर्जाकडे लक्ष देऊन त्या कामगारांना व्यवस्थितपणे समजावून ग्राहक सोबत कसे वागले जाते  जाणीव करून द्यावी अशी माझी नम्र विनंती व मी आपला ऋणी राहील

आपला खातेधारक

(स्वत:चे पूर्ण नाव)

बँकेत नोकरीसाठी अर्ज | application for bank job

मित्रांनो असंख्य खाजगी बँकेमध्ये तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असते व त्या संधीचे सोने करण्यासाठी त्या बँकेमध्ये त्यांना त्या नोकरीसाठी एक विनंती अर्ज करावा लागतो जो तुम्ही खालील पद्धतीने करू शकता

बँकेत नोकरीसाठी अर्ज फॉरमॅट खालील प्रमाणे

बँकेत नोकरी मिळण्यासाठी विनंती अर्ज

प्रति

मा.शाखा अधिकारी साहेब / (अर्थात इथे बँक मॅनेजर चे नाव)

तालुका खेड, जिल्हा पुणे / (अर्थात इथे बँक शाखा पत्ता)

दिनांक 01/09/2024 / (तारीख )

अर्जदाराचे स्वतःचे नाव (तुम्ही)

अर्जाचा विषय – बँकेत नोकरी मिळण्याबाबत अर्ज

बँक खाते क्रमांक – (0000123498)

माननीय महोदय,

वरील विषयास अनुसरून मी (स्वतःचे पूर्ण नाव) आपणास तुमच्या बँकेत नोकरीचे संधी म्हणून असा अर्ज करतो की आपल्या बँकेचे सारखे मध्ये या पदाची रिक्त जागा असून ते पदासाठी लागणारी शिक्षण व पात्रतेमध्ये मी पूर्णपणे बसत आहे तरी तुम्ही माझी मुलाखत घेऊन मला त्या पदासाठी कॉन्ट्रॅक्ट बेस वर नोकरीची संधी देऊ शकता

त्यामुळे मी तुम्हाला बँकेचे जेष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला असा अर्ज करतो की या पदासाठी माझी पूर्ण मुलाखत घेऊन माझी निवड करण्यात यावी यासाठी मी आपल्या बँकेचा व तुमचा ऋणी राहील

आपला खातेधारक

(स्वत:चे पूर्ण नाव)

सोने तारण कर्ज माहितीयेथे क्लिक करा 
महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज योजनायेथे क्लिक करा 

FAQ

बँक मॅनेजर चे काम काय असते

 बँकेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम हे बँक मॅनेजर असते

बँक मॅनेजर ला अर्ज कसा करायचा

बँक मॅनेजर ला अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक विनंती अर्ज करावा लागेल तो विनंती अर्जंतीने आम्ही दिलेल्या लेखांमध्ये वाचून तसा करू शकता

बँक अर्ज करताना त्यासोबत काय जोडावे

कोणत्याही प्रकारचा बँक अर्ज केल्यानंतर त्यासोबत तुम्हाला त्या खात्याची पासबुक प्रत किंवा तुमच ओळखपत्र जोडायचे आहे जेणेकरून तुमची ओळख त्या बँकेतील मॅनेजरला समजेल

 

Leave a Comment