मित्रांनो महाराष्ट्र बँकेने आता नवीन एक सुविधा सर्वांसाठी आणलेली आहे त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला जर बँकेमध्ये खाते खोलायचे असेल तर त्याला बँकेमध्ये येण्याची गरज नाही तो त्याच्या मोबाईल वरून देखील महाराष्ट्र बँकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने खाते हे खोलू शकतो ज्यामुळे नागरिकांचा आत्ता वेळ व पैशाची बचत होणार आहे तर खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचे महाराष्ट्र बँकेमध्ये ऑनलाइन खाते खोलू शकता.
महाराष्ट्र बँकेत ऑनलाईन खाते कसे उघडायचे
मित्रांनो महाराष्ट्र बँकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने जे अकाउंट उघडले जाते ते संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने उघडले जाते. यामध्ये तुम्हाला लगेच तुमच्या खात्याचा अकाउंट नंबर व आयएफसी कोड मिळूतो तसेच इंटरनेट बँकिंग म्हणजेच फोन पे गुगल पे अश्या सेवा देखिल तुम्हाला वापरता येतात. त्याचबरोबर तुम्हाला एटीएम व एक चेक बुक तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला 14 दिवसात मिळून जाते त्यामुळे आत्ता खालील दिलेल्या क्रमानुसार तुम्ही तुमचे महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट उघडू शकता.
( महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाते उघडताना ही E केवायसी करावी लागते त्यासाठी नागरिकांना बँकेमध्ये जावे लागते परंतु आत्ता E केवायसी आपण ऑनलाईन मोबाईल द्वारे देखील करू शकतो त्यामुळे आपल्याला बँकेमध्ये जाण्याची देखील गरज भासणार नाही)
- सर्वप्रथम महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला मोबाईल वरती गुगल क्रोम वर जाऊन तिथे तुम्हाला (बँक ऑफ महाराष्ट्र) हे सर्च करायच आहे यानंतर एक नवीन मजकूर उघडेल त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले (bank of Maharashtra),या संकेतस्थळावरती क्लिक करायचं आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल त्यामध्ये तुम्हाला वरच्या साईडला एक ( Personal) असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये (Deposits) असा पर्याय दिसेल त्यापुढे तुम्हाला एक (Saving Deposits) हा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- आता परत तुमच्यासमोर एक नवीन पान उघडेल. त्यामध्ये तुम्हाला (saving account ) या पर्यायाच्या खाली असलेल्या (Know more) या बाटनावरती क्लिक करायच आहे.
- यानंतर पुन्हा परत एकदा एक नवीन पान तुमच्यासमोर उघडेल तिथे तुम्हाला दोन लाल कलरचे बॉक्स दिसतील त्यामधील पहिल्या बॉक्समध्ये लिहिलं असेल की (Open SB A/c) आणि दुसऱ्या बॉक्समध्ये लिहिले असेल (OPEN SB A/c with V-clip) ( इथे सुचना जर तुम्ही पहिल्या बॉक्स वरती क्लिक करून अकाउंट उघडले तर तुमच्या खात्याची E केवायसी होत नाही त्यासाठी तुम्हाला पुन्हा E केवायसी करण्यासाठी बँकेत जावे लागेल.) त्यामुळे जर तुम्हाला बँकेत जायचे नसेल तर तुम्हाला दुसऱ्या बॉक्स वरती क्लिक करायचं आहे आणि तिथून अकाउंट उघडायचा आहे.
- तर मित्रांनो दुसऱ्या बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पण उघडेल. त्यामध्ये तुम्हाला दिल्या गेलेल्या पर्यायांमध्ये सर्वात पहिला जो पर्याय दिला आहे त्यावरती टिक करायचा आहे. ( i want open new account via VKYC) इथे. आणि त्यानंतर खाली (Terms and Condition) आणि त्याच्या खालचा पर्याया वरती क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेल्या (Lets start) बटनावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर पुढील पान उघडेल (सुचना : तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जाऊन तुम्हाला तुमचे लोकेशन हे ऑन करायचं आहे ज्यामुळे बँकेला तुमच्या लोकेशनच्या जवळची असणारी शाखा सापडण्यास मदत होईल) लोकेशन ऑन केल्यानंतर या पानावरती तुम्हाला तुमच्याजवळ असणारी महाराष्ट्र बँकेची शाखा दाखवण्यास सुरुवात होईल ती शाखा तुम्हाला निवडायची आहे. आणि जर तुमच्या जवळची शाखा तिथे दाखवत नसेल तर तुम्हाला (Others) या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे राज्य, शहर आणि शहराजवळील शाखा तुम्हाला निवडायची आहे. आणि (NEXT) या बटनावरती क्लिक करायचा आहे
- त्यानंतर पुन्हा परत एक नवीन पान उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती ही भरायची आहे. जसे की नाव नंबर ईमेल आयडी या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भरायच्या आहेत. आणि खाली दोन प्रश्न विचारले जातील त्यामध्ये (NO) वरती टिक करून (PROCED) या बटनावरती तुम्हाला क्लिक करायच आहे.
- त्यानंतर पुन्हा एक नवीन पान उघडेल त्यामध्ये तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्यावरती एक ओटीपी आला असेल तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे.आणि (next) या बटनावरती क्लिक करायच आहे.
- यानंतर पुढच्या पानावर तुम्हाला आधार कार्ड व पॅन कार्ड ची माहिती इथे भरावी लागेल. तसेच तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा फोटो देखील तिथे वरती अपलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला (Verify)बटनावरती क्लिक करायचं आहे
- यानंतर पुन्हा काही (TERMS AND CONDITION) येतील तिथे तुम्हाला Accept करायचे आहे.Accept केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड बरोबर जो नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला एक ओटीपी मिळेल तो तिथे टाकून (Next) बटनावरती क्लिक क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर एक नवीन पाण उघडेल तेव्हा तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरती जो पत्ता आहे तो टाकायचा आहे. आणि पुन्हा Next) बटनावरती क्लिक क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला नवीन पानावरती स्वतःची संपूर्ण माहिती भरायची आहे ( जर काही अडचण येत असेल तर तुम्ही खाते कसे उघडायचे या संबंधित ऑनलाइन युट्युब वरती व्हिडिओ देखील पाहू शकता) स्वतःची संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुन्हा Next या बटनावरती क्लिक करायच आहे
- त्यानंतर एक नवीन (other banking services) असं पान उघडेल त्यामध्ये तुम्हाला (WhatsApp banking, upi banking, net banking,mobile banking) या सर्व पर्यायावरती टिक करायचे आहे. त्यानंतर खाली SUBMIT या बटनावरती क्लिक करायचं आहे
- तर आता एक नवीन पाण लोड होऊन तिथे तुम्ही भरलेली सर्व माहिती व तुमचा फोटो तुम्हाला तिथे दिसायला लागेल ती माहिती योग्य आहे की नाही ते तुम्हाला तपासायचे आहे. आणि सर्व माहिती जर अचूक असेल तर खाली दिलेल्या (NEXT) या बटणावर क्लिक करायचं आहे
- तर मित्रांनो आता तुमचा इथं अकाउंट ओपनिंग चा फॉर्म हा संपूर्णपणे भरून झालेला आहे असा मजकूर तुम्हाला तिथे दिसेल. पण आता आपल्याला आपल्या खात्याची व्हिडिओ E केवायसी करायची आहे. त्यासाठी आपल्याला Call Now च्या पर्यायावर क्लिक करायचा आहे. आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे (Referance Details) दिसेल तिथे तुम्हाला रेफरन्स नंबर टाकायचा आहे. रेफरन्स नंबर हा तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला मेसेज द्वारे आला असेल तो पाहून तुम्हाला तिथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो तुम्हाला पुन्हा तिथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर NEXT या बटणावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला एक सूचना दिली जाईल की तुमचा मोबाईलचा कॅमेरा चांगला पाहिजे व तुमच्याकडे इंटरनेटचे स्पीड देखील चांगले हवे आणि तुम्हाला तुमचे लोकेशन देखील ऑन ठेवावे लागेल यानंतर सगळं व्यवस्थित असेल तर तुम्हाला Next या बटणावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमचा व्हिडिओ कॉल हा बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याशी जुळेल आणि तिथे तुमची E केवायसी होईल. वह्या संबंधित तुम्ही तिथे अधिक माहिती देखील घेऊ शकता तर असं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते खोलू शकता.
महाराष्ट्र बँकेत अकाउंट उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात
मित्रांनो महाराष्ट्र बँकेत अकाउंट उघडण्यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड व पॅन कार्ड व दोन फोटो असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र बँकेत ठेवी व्याजदर किती आहे
महाराष्ट्र बँकेत ठेवी व्याजदर हा 2.75% इतका आहे
महाराष्ट्र बँकेत कर्ज व्याजदर किती आहे
महाराष्ट्र बँक कर्ज व्याजदर हा 7 ते 7.75 टक्के इतका आकारला जातो.
महाराष्ट्र बँक कस्टमर केअर अधिकारी नंबर काय आहे
महाराष्ट्र बँक कस्टमर केअर नंबर हा आहे 1800 233 4526