Pune Travel : मित्रांनो आपण जर हिवाळ्यामध्ये पुणे शहरात राहत असाल किंवा पुणे शहरांमध्ये फिरण्यासाठी येत असाल तर खालील काही स्थळे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही हिवाळ्यात फिरू शकता
भीमाशंकर :मित्रांनो सर्वप्रथम जे स्थळ आहे ते पुणे जिल्ह्यामधील अतिशय निसर्गरम्य परिसरात असणारे महादेवाच्या मंदिराच्या नावाने ओळखले जाणारे भीमाशंकर हे स्थळ आहे
पुण्यापासून भीमाशंकर स्थळ हे 121 किलोमीटर आहे जर आपण गाडीवर गेला तर आपल्याला 3 तास लागू शकतात भीमाशंकर ला जाण्यासाठी आपण तीन मार्गाने जाऊ शकता सर्वप्रथम राजगुरुनगर खेड मधून त्यानंतर राजगुरुनगर च्या पुढचे गाव पेठ येथून देखील आपण जाऊ शकता आणि शेवटी मंचर किंवा नारायणगाव मार्गे देखील आपण भीमाशंकरला जाऊ शकता
माझ्या माहितीनुसार आपण जर पुण्यावरून भीमाशंकर ला जाण्यासाठी येत असाल तर आपल्याला पेठ च्या रस्त्याने जाणे एक योग्य मार्ग ठरेल कारण पेठच्या रस्त्याने भीमाशंकरचा रस्ता हा सोपा व चांगला रस्ता पडतो
भीमाशंकर हे महाराष्ट्र मधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे व आपल्याला हिवाळ्यात तिथं एक उत्तम वातावरण पाहायला भेटेल कारण की तिथला निसर्ग हा खूपच उत्तम आहे जिथे आपल्याला धुके देखील पाहायला मिळतील त्यामुळे हिवाळ्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून भीमाशंकर हे पहिले ठिकाण आहे
नाणेघाट : मित्रांनो यानंतरचे दुसरे जे स्थळ आहे ते पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी असणारे हे ठिकाण आहे व या ठिकाणावरून आपल्याला अतिशय खोलवर असणारी दरी पाहायला मिळते
पुण्यापासून नाणेघाट पर्यंत जो रस्ता आहे तो तीन तासाचा 122 किलोमीटर चा रस्ता आहे आपल्याला पुण्यापासून थेट जुन्नर या मार्गासाठी निघायचे आहे व जुन्नर पासून नाणेघाटचे अंतर 30 किलोमीटर इतके आहे
नाणेघाट या ठिकाणावर आपल्याला अतिशय उत्तम हॉटेलची व राहण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्त जाऊ शकता
तसेच नाणेघाट या ठिकाणावरती आपल्याला एका टेकड्यावरून संपूर्ण निसर्ग पाहायला मिळतो जसे की महाबळेश्वरला आहे त्याचबरोबर इथे धुक्याचे प्रमाण देखील जास्त असते त्यामुळे आपल्याला एक हिवाळ्यात चांगला आनंद भेटू शकतो तसेच आपण या जागी टेन्ट वगैरे देखील लावू शकतो त्यामुळे हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम जागा म्हणून नाणेघाट देखील ओळखले जाते
हरिचंद्र गड : मित्रांनो पुणे शहरात सुप्रसिद्ध ट्रेकिंग साठी असणारे ठिकाण म्हणजे हरिश्चंद्रगड जर आपल्याला ट्रेकिंगची आवड असेल तर आपण हिवाळ्यामध्ये हरिश्चंद्रगड हे ठिकाण फिरू शकता
मित्रांनो हरिश्चंद्रगड ची वैशिष्ट्ये पाहिली तर या गडावरून आपल्याला संपूर्ण सह्याद्री पर्वतरांग पाहायला मिळते तसेच हरिचंद्र गडावरती सात डोंगर असल्यामुळे आपण जर ट्रॅकर असाल तर आपल्यासाठी एक उत्तम ट्रेकिंग पॉईंट आहे त्याच्या शिखरावर जाऊन आपल्याला खूप सारा निसर्ग पाहायला मिळतो
परंतु हरिचंद्र गडावरती जाण्यासाठी जर आपण नवीन असाल तर तिथे गावातील भागात गाईड असतात त्यांच्या मदतीने आपण वरती जा अन्यथा आपण त्या जंगलात भटकू शकता
पुण्यापासून हरिश्चंद्रगड हे अंतर 120 किलोमीटर इतक आहे येथे जाण्यासाठी तुम्हाला 3 तास लागतील परंतु हरिश्चंद्रगडावर येण्यासाठी तुम्हाला आठ ते दहा तास लागतील त्यामुळे तुमच्याकडे जर तुम्ही वेळ असेल तरच तुम्ही या ठिकाणी जा
हरीचंद्र गडाच्या पायथ्याशी उत्तम प्रकारची हॉटेल व पार्किंगची सोय आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही