भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 | 1 लाख चाळीस हजार रुपये अनुदान मिळणार 

bhausaheb fundkar falbag lagwad yojana 2024

फळबाग योजना : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन अंतर्गत मागेल त्याला योजना राबवल्या जातात त्यामधील एक योजना म्हणजे फळबाग योजना ज्यामध्ये शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी प्रति एकर 1 लाख 40 हजार रुपये अनुदान दिले जाते ते अनुदान खालील प्रमाणे दिले जाते त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती खाली वाचू शकता

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024

शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, या योजनेची संकल्पना अशी आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला घरबसल्या आर्थिक मदत प्राप्त होण्यासाठी  फळबाग लागवडीसाठी अनुदान देणे.

फळबाग योजना पात्रता काय आहे

  • अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याला फळबाग केल्यानंतर त्या फळबागेला ठिबक सिंचन बसवावे लागेल यासाठी सरकारकडून 100% टक्के अनुदान देण्यात येते त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला ठिबक बसावे लागेल
  • यानंतर अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल की जे शेतकरी संपूर्णपणे शेतीच करतात,त्यांच्या घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत नसेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल
  • शेतकऱ्याच्या सर्वप्रथम स्वतःच्या नावावर सातबारा पाहिजे तरच तो अर्ज करू शकतो
  • याचबरोबर शेतकऱ्यांनी याआधी कधीही या योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे असे असेल तरच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो

 फळबाग योजना अनुदान

शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अनुदान हे तीन टप्प्यात दिले जाते ज्यामध्ये प्रथम टप्प्यात जेव्हा अर्जदार उमेदवार या योजनेसाठी पात्र होतो. तेव्हा त्यांना 50% टक्के अनुदान हे दिले जाते, म्हणजे जर तुम्हाला या योजनेसाठी 1 लाख रुपये मंजूर झाले तर प्रथम वर्षी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच 50 हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला 30 टक्के अनुदान हे दिले जाते म्हणजेच 30 हजार रुपये हे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात दिले जातील व शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 20% अनुदान दिले जाते जे असेल 20 हजार रुपये अशाप्रकारे तुम्हाला तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या योजनेअंतर्गत अनुदान हे मिळते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)
  • डिजिटल सातबारा व ८ अ उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँकेचे पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अर्ज कसा करायचा

शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता एक तर तुम्ही राहत असलेल्या शहरांमध्ये जाऊन तेथील ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन या योजने संबंधित माहिती घेऊन अर्ज करू शकता. नाहीतर तुम्ही घरबसल्या मोबाईलवर देखील योजनेसाठी अर्ज करू शकता, घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गुगल क्रोम या ॲपवर आपले सरकार या अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल व तिथे जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल तो अर्ज कसा केला जातो त्याची तुम्ही युट्युब वर प्रात्याक्षिक माहिती घेऊन त्याप्रमाणे अर्ज करू शकता व काही समस्या आली तर आम्हाला व्हाट्सअप वर मेसेज करू शकता आम्ही नक्कीच तुमची मदत करू

Leave a Comment