मित्रांनो आजच्या लेखात आपण असे अर्ज पाहणार आहोत की त्या अर्जांचा वापर शैक्षणिक कामात नेहमी होत असतो व त्याचा फायदा तुम्हाला वर्षान वर्ष होऊ शकतो त्यामुळे खालील दिलेली माहिती व्यवस्थित वाचा व त्या अर्जाचा नमुना आहे असा लिहून तुम्ही या प्रकारचे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने करू शकता
कॉलेजमधून टी सी मिळण्याबाबत अर्ज कसा करायचा
दिनांक
प्रति,
मा. प्राचार्य
छत्रपती कॉलेज पुणे (तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेता त्याचे पूर्ण नाव )
पत्ता (पिंपरी चिंचवड)
पुणे
अर्जदार – आर्यन किशोर वाघमारे ( अर्जदाराचे नाव)
विषय – कॉलेजमधून T.C. मिळण्याबाबत
महोदय’
वरील नमूद केलेल्या विषयास अनुसरून मी आर्यन किशोर वाघमारे आपल्या कॉलेजचा विद्यार्थी असून इयत्ता बारावी सायन्स तुकडी ब रोल नंबर 63 या वर्गात सण 2023-24 यावर्षी शिक्षण घेत होतो आणि मार्च 2024 मध्ये झालेल्या H.S.C परीक्षेमध्ये सगळे विषय पास उत्तीर्ण झालेलो आहे तरी पुढील शिक्षणासाठी मला कॉलेजमधून T. C. ची आवश्यकता आहे मला माझ्या पुढील शैक्षणिक कामत किंवा प्रवेशात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी मला लवकरात लवकर महाविद्यालयातून टीसी मिळावा ही नम्र विनंती
आपला आज्ञाधारक
सही –
आर्यन किशोर वाघमारे
बोनाफाईड साठी अर्ज कसा करायचा
दिनांक
प्रति,
मा. प्राचार्य
छत्रपती कॉलेज पुणे (तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेता त्याचे पूर्ण नाव )
पत्ता (पिंपरी चिंचवड)
पुणे
अर्जदार – प्रतीक मंगेश पाटील ( अर्जदाराचे नाव)
विषय – महाविद्यालयातून बोनाफाईड सर्टिफिकेट मिळण्याबाबत
महोदय’
वरील विषयास अनुसरून मी प्रतिक मंगेश नांगरे आपणास असा अर्ज सादर करतो की मी आपल्या महाविद्यालयामध्ये इयत्ता 13 Fyba वर्गात शिक्षण घेत आहे माझा वर्ग 13 fyba व तुकडी ब आहे व रोल नंबर हा 63 आहे नमूद केलेल्या विषयास अनुसरून मला माझ्या वैयक्तिक कामासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट ची आवश्यकता असून ती मला लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी मी आपणास असा अर्ज करतो की माझ्या विनंतीचा मान ठेवून मला लवकरात लवकर बोनाफाईड सर्टिफिकेट मिळवून द्यावे ही नम्र विनंती
आपला आज्ञाधारक
सही –
प्रतीक मंगेश पाटील
निर्गम उतारा मिळण्याबाबत अर्ज कसा करायचा
दिनांक
प्रति,
मा. मुख्याध्यापक,
महात्मा फुले विद्यालय पुणे (तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेता त्याचे पूर्ण नाव )
पत्ता (पिंपरी चिंचवड)
ता. जि.पुणे
अर्जदार – ओमकार सुदाम नांगरे ( अर्जदाराचे नाव)
विषय – निर्गम उतारा मिळणे बाबत मिळण्याबाबत
महोदय’
वरील विषयास अनुसरून मी ओमकार सुदाम नांगरे मी आपणास असा अर्ज सादर करतो की 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी तुकडी ब वर्गामध्ये शिक्षण घेत होते व माझा रोल नंबर हा 57 होता
तरी मला आता माझ्या पुढील शिक्षणासाठी शाळेमधून निर्गम उतारा पाहिजे आहे तरी तू मला लवकरात लवकर मिळावा ही मी आपणास विनंती करतो
आपला आज्ञाधारक
सही –
ओमकार सुदाम नांगरे
बँकेचे सर्व अर्ज कसे करायचे | येथे क्लिक करा |
मार्कशीट मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा
दिनांक
प्रति,
मा. प्राचार्य
भारतीय विद्यापीठ नागपुर (तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेता त्याचे पूर्ण नाव )
पत्ता (नागपुर )
ता. जि.नागपुर
अर्जदार – महेश मारुती पेठारे ( अर्जदाराचे नाव)
विषय – मार्कशीट मिळण्याबाबत
महोदय’
आदरणीय सर व मॅडम वरील विषयास अनुसरून मी महेश मारुती पेठारे मी आपणास असा अर्ज सादर करतो की 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी तुकडी ब वर्गामध्ये शिक्षण घेत होतो व माझा रोल नंबर हा 57 होता
तरी मला आता माझ्या पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयांमधून मला माझे बारावी उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट पाहिजे आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मला ते उपलब्ध करून द्यावे जेणेकरून मला पुढे कोणत्या ही प्रकारची शैक्षणिक अडचण भासणार नाही यासाठी मी आपणास एक विनंती अर्ज करतो
आपला आज्ञाधारक
सही –
महेश मारुती पेठारे
कॉलेजमध्ये जात पडताळणीसाठी अर्ज कसा करायचा
दिनांक
प्रति,
मा. प्राचार्य साहेब,
मराठा विद्यापीठ लातूर (तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेता त्याचे पूर्ण नाव )
पत्ता (लातूर )
ता. जि.लातूर
अर्जदार – तुषार पांडुरंग शेटे ( अर्जदाराचे नाव)
विषय – जात पडताळणीसाठी ना हरकत व जात पडताळणी करून मिळणे बाबत
महोदय’
मी आपल्या महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023 24 या वर्षात इयत्ता बारावी वर्गामध्ये तुकडी व रोल नंबर 27 शिकत असून मला पुढील शैक्षणिक कामासाठी जात पडताळणी करायची आहे तरी आपण माझ्या जातिच्या पडताळणीची खात्री करून मला महाविद्यालयातून न हरकत प्रमाणपत्र द्यावे ही नम्र विनंती
जात पडताळणीसाठी आपण मला न हरकत प्रमाणपत्र दिल्यास मी आपला अत्यंत ऋणी राहील
आपला आज्ञाधारक
सही –
तुषार पांडुरंग शेटे