दूध व्यवसाय कसा करायचा संपूर्ण व्यवस्थापन माहिती

Complete management information on how to start a milk business

 दुग्ध व्यवसाय : शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचा शेतीपूरक व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय हा दूध व्यवसाय प्रत्येक शेतकरी करतो परंतु काही शेतकऱ्यांना या व्यवसायाबद्दल व्यवस्थित माहिती नसल्यामुळे किंवा दुग्ध व्यवसायाचे व्यवस्थापन कसे असायला पाहिजे हे माहीत नसल्या कारणामुळे ते या व्यवसायामधून हवे तसे उत्पन्न काढू शकत नाहीत. त्यामुळे आज आपण दुग्ध व्यवसाय नियोजनबद्ध कसा केला जातो याबद्दल माहिती घेणार आहोत

दुग्ध व्यवसाय दिनक्रम कसा असला पाहिजे

  • शेतकरी मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये शेतकऱ्याचा दिनक्रम हा सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होतो ते कसे तर सकाळी पाच वाजता उठून सर्वप्रथम आपल्याला सर्व गाई व म्हैस यांचे दूध काढण्यासाठी त्या गाई व म्हैस दावणीला बांधल्या जातात व त्यानंतरच सकाळचे दूध हे काढले जाते
  •  दूध काढल्यानंतर दुसरा दिनक्रम म्हणजे गाई व म्हैस यांना लगेचच चारा व खुराक टाकने त्यामध्ये एका गाईला व म्हशीला दररोज दहा ते बारा किलो चारा कुट्टी दिली जाते. त्यामध्ये घास गवत ऊस मका भुसा यांचा समावेश असतो त्यामुळे चाऱ्याचे नियोजन तुम्हाला आदल्या दिवशीच रात्री करावे लागेल
  • याचबरोबर जनावरांसाठी गोठ्यामध्ये मुबलक व स्वच्छ पाण्याचे तुम्हाला नियोजन करावे लागेल जेणेकरून जनावरांना एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवावे लागणार नाही
  • जनावरांच्या खुराकामध्ये गोळी पेंड, सरकी पेंड,वालिस मक्याचा भरडा यांचा समावेश करून देऊ शकता तसेच बाजारात मिळणारे पशुखाद्य देखील देऊ शकता
  • परत दुपारच्या चारा घालून तुम्हाला संध्याकाळी दूध काढण्याचे नियोजन करावे लागते, अशाप्रकारे दूध व्यवसाय मध्ये दिनक्रम असतो

दूध व्यवसायात जनावरांची निवड कशी केली जाते

दूध व्यवसायामध्ये जनावरांच्या निवडीमध्ये जास्त दुधाळ गाय व म्हैस यांचा समावेश केला जातो, आणि वरील प्रमाणे जर तुम्ही जनावरांना योग्य वेळेत पशुखाद्य व योग्य वेळेत त्यांचे दूध काढले तर तुम्हाला दूध व्यवसायातून चांगला नफा प्राप्त होतो तसेच जनावरांचे योग्य नियोजन असेल तर जनावरांचे दूध कमी होत नाही, तुम्हाला जर या व्यवसायाबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या (9284463634) क्रमांकावर संपर्क करून दूध व्यवसाय बाबत अधिक माहिती घेऊ शकता

Leave a Comment