Krushi News : केळी विक्रीसाठी मागणी 15 दिवसात दुप्पट दर वाढले, जाणून घ्या भाव..

Demand for banana sales doubled in 15 days

केळी उत्पादक : महाराष्ट्रा मध्ये जसा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे तेव्हा पासून केळी पिकाला मागणी पेठांमध्ये वाढली आहे त्यामध्ये शेतकऱ्याचा खूप फायदा होत आहे. व लग्नसराईमुळे ही मागणी अजून वाढण्याची शक्यता सूत्रातून कळत आहे

दिवाळीमध्ये व दिवाळीच्या आधी केळी पिकाला मागणी ही खूप कमी होती अगदी हजार रुपये टन इतके दर घसरले होते ज्यामुळे शेतकरी हा त्रस्त होता. परंतु दिवाळीपासून जसे तुळशी विवाह झाले त्यानंतर लग्नसराईचे दिवस सुरू झाले व मार्गशीर्ष महिन्यातील सुरू झाल्यामुळे केळी पिकाला बाजारपेठ मध्ये मागणी वाढू लागले व त्या बाजारपेठ मध्ये दिवसेंदिवस केळी पिका च्या मागणीमध्ये हजार ते दोन हजार रुपये प्रति टन ने वाढ होत असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे

मागील आठवड्यात केळीच्या दाराला पुणे जिल्ह्यात मागणी होती, 15 हजार रुपये टन परंतु दोन ते तीन दिवसात तो भाव 17 हजार रुपये प्रति टन इतका गेला, कारण असे की मार्गशीर्ष महिन्यात असंख्य लोक ही फळांचे सेवन करतात व लग्नसराई असल्यामुळे फळांचा वापर जास्त होतो त्यामुळे केळी या पिकाला बाजारपेठ म्हणतात मागणी ही खूप वाढली आहे हे त्या दोन ते तीन महिन्यात 25 ते 30 हजार प्रति टन या भावाने केळीची विक्री होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे

त्यामुळे कृषी विभागाने माहिती दिली आहे की तुम्ही केळी विकण्यास अधिक घाई करू नका कारण म्हणजे येथे दोन महिन्यात केळी पिकाला खूप मागणी येणार आहे व यावर्षी केळी पिकाचे उत्पादन कमी असल्यामुळे तुम्हाला योग्य भाव देखील मिळणार आहेत त्यामुळे केळीला वेळोवेळी पाणी घालत रहा व जेव्हा बाजारपेठांमध्ये खूप मागणी वाढेल तेव्हा तुम्ही विक्रीसाठी केळी आना

Leave a Comment