Agriculture Drone : शेतकऱ्यांकडून आकाशात उडणाऱ्या ड्रोन ची मागणी वाढली, सरकारने घेतला यावर मोठा निर्णय…

Demand for drones increased from farmers

कृषी ड्रोन : भारत देश हा तंत्रज्ञानामध्ये एक प्रसिद्ध देश म्हणून ओळखला जातो त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग आता शेती व्यवसायात होणार आहे याचा फायदा येत्या काळात शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांकडून ड्रोन साठी खूप मागणी होत आहे व कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार ड्रोन विक्रीसाठी बाजारपेठामध्ये 4 लाख कोटींची मागणी आहे

कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार व निती आयोगाच्या माहितीनुसार येत्या पुढील पंधरा वर्षांमध्ये ड्रोन हा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल करणार आहे खास करून याची विक्री शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाच्या वाढीसाठी करण्यात येणार आहे सरासरी बाजारपेठांमध्ये ड्रोन विक्री बाजारपेठे चार लाख कोटींच्या पुढे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे, मागील पाच वर्षापासून भारतीय बाजारपेठेमध्ये ड्रोन ची उलाढाल ही 8% टक्क्यांनी वाढत चालली आहे, व पुढील 1 ते 2 वर्षात ही टक्केवारी 15 ते 20 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे

भारतात दिवसेंदिवस अनेक कृषी अवजारे सादर होत आहेत त्यामध्ये ड्रोन या कृषी अवजाराची जागा लवकरच भारतामध्ये कृषी विभागात वाढण्याची शक्यता आहे जसे की भारत देश हा प्रयोगशील शेतीमध्ये आघाडीचे देश मानला जातो व भारतात महाराष्ट्र हा अग्रेसर आहे, त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र मध्ये ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेती खूप मोठ्या प्रमाणात चालणार आहे

केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ड्रोन योजना

केंद्र सरकारने सुद्धा आता शेतकऱ्यांचे प्रश्न मिटण्यासाठी अनेक कंपन्यांना ड्रोनचे उत्पादन करायला सांगितले आहे जे उत्पादन झाल्यानंतर केंद्र सरकार अंतर्गत एक विशिष्ट योजना राबवून सर्व शेतकऱ्यांना या ड्रोन चा लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने अवघ्या पंधरा हजार महिलांना ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग देण्यास सुरुवात देखील केली आहे.

ड्रोनचे शेतकऱ्यांसाठी फायदे काय

कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार व अभ्यासानुसार सांगण्यात येते की ड्रोन चे फायदे हे शेतजमीन मोजण्यासाठी शेतातील पिकावर फवारणी करण्यासाठी तसेच पक्षांपासून व अनेक प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी व आपल्या शेती बद्दल घरबसल्या माहिती घेण्यासाठी या ड्रोन तंत्रज्ञाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे व त्याची मागणी शेतकऱ्याकडून बाजारामध्ये देखील वाढू लागली आहे

Leave a Comment