तुमचा मोबाईल आत्ता कोणीच चोरू शकणार नाही…

do this after the mobile phone is stolen in maharashtra

मोबाईल : मित्रांनो हल्ली आपण पाहतो की शहरांमध्ये अनेक मोबाईल दिवसेंदिवस चोरी होत असतात ज्यामध्ये गरिबांचे खास करून मोबाईल कोणी जास्त करून चोरी होत असतात

त्यासाठी पर्याय म्हणून भारताच्या सायबर सिक्युरिटी ने आता एक असे संकेतस्थळ केले आहे ज्या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या मोबाईल बद्दल सर्व माहिती भरली तर तुमचा मोबाईल चोरीला गेला तरी तो पुन्हा तुम्हाला सापडू शकतो

जसे की आपल्याला माहीत असेल की आपला फोन जर एखाद्याने चोरी केला तर तो व्यक्ती आपल्या फोन द्वारे अनेक प्रकारचे ऑनलाइन गुन्हे देखील करू शकतो व त्या गुन्ह्यांमध्ये आपण अडकण्याचे देखिल खूप मोठी शक्यता असते

त्यामुळे आपला फोन इथून पुढे जेव्हा पण चोरी होईल तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरातील किंवा शेजारील एखाद्या व्यक्तीचा फोन घेऊन त्या फोनमध्ये गुगल वरती हे (ceir.gov.in) संकेतस्थळ टाकून या संकेतस्थळावरती आपल्याला जायचे आहे

या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला असा CEIR services असा एक पर्याय दिसेल त्यामध्ये तुम्हाला क्लिक करून खाली तीन पर्याय उघडतील त्यामधील या Block Stolen / Lost Mobile या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे कारण की तुमचा फोन इथे हरवलेला आहे

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज लोड होऊन उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव व त्या मोबाईल मध्ये असणारा मोबाईल क्रमांक व त्या मोबाईलची काही माहिती तुम्हाला तिथे टाकावी लागेल जी तुम्ही घेतलेल्या मोबाईलच्या बॉक्सवर संपूर्ण दिली गेली असेल

अशी वरील संपूर्ण माहिती जर तुम्ही त्या अर्जात भरली आणि तो अर्ज तुम्ही भरल्यानंतर जेव्हा पण तुमचा फोन त्या व्यक्तीद्वारे उघडला जाईल किंवा त्यामध्ये नवीन सिम कार्ड टाकण्यात येईल तेव्हा तुमच्या फोनचे लोकेशन सायबर पोलिसांना समजेल व तुमचा फोन लवकरात लवकर ट्रॅक करून तो फोन तुम्हाला सायबर पोलीस खात्याद्वारे पुन्हा परत देण्यात येईल

Leave a Comment