डोळे येणे लक्षणे | पुणे जिल्ह्यात डोळे येणे साथ आजार

मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रा मधील व इतर राज्यातील वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यामुळे राज्यामध्ये डोळे येणे या साथीचा खुप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे आपण या रोगापासून कसे सावध राहिले पाहिजे व या डोळे येणे रोगाची लक्षणे काय आहेत हे आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे खालील दिलेला लेख संपूर्ण वाचा.

dole yene lakshane

डोळे येणे लक्षणे

  • सर्वप्रथम डोळे येण्याची लक्षणे पाहिली तर म्हणजे जर तुमचे डोळे हलके किंवा खूप लाल होत असतील किंवा होण्यास सुरुवात होते असेल तेव्हा तुम्ही समजू शकता की तुम्हाला या रोगाची लागण झाली आहे
  • यानंतर या रोगाचे दुसरे लक्षण म्हणजे जर तुमच्या डोळ्यातून सतत पाणी यायला सुरुवात झाली तर तेव्हा देखील तुम्ही समजू शकता की डोळे येणे या रोगाची लागण तुम्हाला झालेली आहे
  • यानंतर या रोगाचे तिसरे लक्षण म्हणजे जर तुमच्या डोळ्यांना खाज येण्यास सुरुवात झाली तर तेव्हा देखील तुम्हाला या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे असे तुम्ही समजू शकता
  • यानंतर या रोगाची चौथे लक्षण म्हणजे डोळ्यांना चिकटपणा येणे असे असल्यास तुम्हाला हा डोळ्यांचा रोग झालेला आहे
  • वरील लक्षणे ही अशी आहेत की सर्वप्रथम एका डोळ्यात आधी होऊन त्यानंतरच दुसऱ्या डोळ्यात देखील होऊ शकतात असे नाही की एकाच वेळेस दोन्ही डोळ्यात होतील त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे

डोळे आल्यावर उपाय

  • डोळे येणे यासाठीच्या रोगावरती सर्वप्रथम उपाय असा की आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे ज्यामुळे या रोगाचा संसर्ग जास्त प्रमाणात होणार नाही व तो रोग आपल्याला देखील होणार नाही
  • तज्ज्ञांच्या माहितीनुसार डोळे आल्यानंतर डोळे हा रोग एक ते दोन आठवड्यामध्ये बरा देखील होतो परंतु हा रोग कमी कालावधीमध्ये बरा करण्यासाठी शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असणे गरजेचे आहे ज्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या देखील देतात
  • तुम्हाला जर डोळे येणे या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्ही जवळच्या नेत्र रुग्णालय मध्ये जाऊन डॉक्टरच्या सल्ल्याने डोळ्यात टाकण्यासाठी काही ड्रॉप मिळतात त्याचा वापर तुम्ही करू शकता
  • ज्यांना डोळे येणे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांना सूर्यप्रकाशाचा बाहेर पडल्यानंतर त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांनी बाहेर पडताना गॉगल घालून बाहेर पडावे ज्यामुळे डोळ्यांवर जास्त त्रास होणार नाही
  • आणि घरामधील ज्या व्यक्तीला डोळे येणे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनी इतरांची लांबून संबंध ठेवावे जेणेकरून घरातील इतर लोकांना तो आजार होणार नाही
  • डोळे येणे या रोगासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय असा की जेव्हा तुम्हाला वरील डोळे येणे लक्षणे जाणून येतील तेव्हा तुम्ही सर्वप्रथम जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरच्या साहाय्याने औषधे घेऊन तो आजार तुम्ही बरा करू शकत

डोळे येणे घरगुती उपाय

मित्रांनो डोळे आल्यावर एक पूर्व काळापासून चालत येणारा घरगुती उपाय म्हणजे आपण एखाद्या भांड्यामध्ये डोके बुडेल एवढे पाणी घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपले तोंड बुडवायचे आहे व त्या पाण्यामध्ये तोंड बुडवल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये डोळे उघडायचे आहेत ज्यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये असणारी सर्व घाण कचरा निघून जातो व एक नैसर्गिक पद्धतीने आपले डोळे स्वच्छ होण्यास मदत होते

डोळे आल्यावर काय करावे

मित्रांनो डोळे आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या नेत्र रुग्णालयांमध्ये जाऊन डॉक्टरच्या साह्याने त्यावर उपचार करून औषधे घेऊन तुम्ही डोळे येणे या रोगावर मात करू शकता

डोळे का येतात

मित्रांनो डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि प्रामुख्याने हा आजार पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो पावसाळ्यामध्ये घरात असणाऱ्या माशा किंवा इतर कीटकनाशकापासून हा रोग माणसांमध्ये पसरतो व त्यामुळे डोळे येतात

डोळे जड होण्याचे कारण काय

मित्रांनो डोळे जड पडण्याची अनेक सारी कारणे आहेत परंतु त्यामध्ये एक महत्त्वाचे कारण म्हणजे डोळे जड पडणाऱ्या व्यक्तीची पुरेशी झोप न होणे किंवा मोबाईलचा जास्त प्रमाणात वापर करणे ज्यामुळे त्याचा प्रभाव त्याच्या डोळ्यांवर होणे

Leave a Comment