Hotel Business : असंख्य तरुण हॉटेल व्यवसाय सुरू करतात परंतु काही कारणास्तव त्यांचा व्यवसाय काही दिवसांनी बंद पडतो त्याचे कारण म्हणजे अशा काही गोष्टी आपल्या द्वारे केल्या जातात जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन आपले हॉटेल बंद करावे लागते तर आपण काय नाही केलं पाहिजे ते पाहूया
जसे की व्यवसाय क्षेत्रामध्ये सर्वात जास्त व्यवसाय केला जाणारा व्यवसाय म्हणजे हॉटेल व्यवसाय परंतु प्रत्येक हॉटेल व्यवसाय हा यशस्वी होत नाही त्याची काही कारणे आहेत ती तुम्ही खाली जाणून घेऊ शकता
जेव्हा आपण हॉटेल व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम जी गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला सुरुवातीला हॉटेल व्यवसायातील पदार्थ बनवता यायला पाहिजे
कारण जर आपल्याला उत्तम पदार्थ बनवता येत असतील तर आपल्याला सुरुवातीला कामगारासाठी खर्च हा कमी लागणार आहे ज्याचा फायदा आपल्याला पुढे व्यवसायात होऊ शकतो व त्यांने आपले पैसे देखील बचत होऊ त्यामुळे हॉटेल कामगार ठेवण्याची चूक तुम्ही कधीच करू नका
यानंतर सुरुवातीला आपल्याला हॉटेल व्यवसायात खूप मोठी गुंतवणूक नाही करायची आपल्याला सुरुवातीला जेवढे पैसे वाचवता येतील तेवढा प्रयत्न करायचा आहे
अगदी सुरुवातीला चार टेबल वर आपण हॉटेल व्यवसाय सुरू करू शकता आपल्याला सुरुवातीला खूप मोठी जागा किंवा खूप मोठ भांडवल किंवा खूप कामगार हे ठेवायचे नाही जसं जसं धंदा वाढेल त्याप्रमाणे आपल्याला हळूहळू त्यामध्ये वाढ करायची आहे
यानंतर हॉटेल या व्यवसायात सर्वात महत्त्वाची ही चुक कधीच केली नाही पाहिजे की, जेवणात कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे जसे की काही काही हॉटेल वाले शिळे जेवण देतात किंवा त्या जेवणाला उत्तम चव नसते ज्यामुळे त्या हॉटेलचा ग्राहक टिकत नाही
आपल्याला जास्त लक्ष हे हॉटेलच्या पदार्थांवरती द्यायचे आहे जसे की त्या पदार्थांना उत्तम चव असली पाहिजे त्यानंतर ते पदार्थ व्यवस्थित सजवून देता आले पाहिजे
यानंतर खूप सारे हॉटेल वाले ही देखील चूक करतात की ग्राहकाला वेळेवर जेवण न देणे ज्यामुळे आलेला ग्राहक तरसून पुन्हा आपल्या हॉटेलला येत नाही त्यामुळे आपल्याला कमी वेळेत जेवण हे आपल्या ग्राहकाला द्यायचे आहे
यानंतर आपल्या हॉटेलला आलेल्या प्रत्येक ग्राहकासोबत आपले वागणे हे खूप चांगले असायला हवे कारण की आपण जर आपल्या ग्राहका सोबत चांगले वागलो तर तो ग्राहक चार माणसांना किंवा परत येण्याचे खूप चान्सेस असतात