Sarkari Yojana : ड्रोन दीदी योजना 2024, शेतकऱ्यांसाठी 8 लाखाचं अनुदान जाहीर आनंदाची बातमी…

Drone Didi yojana 2024

सरकारी योजना : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या मुलाखतीत सांगितले की ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्याचा आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये फायदा होईल म्हणून ड्रोन दीदी योजना ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे..

ड्रोन दीदी योजनेअंतर्गत केंद्र सरकार संपूर्ण देशभरातल्या एकूण 15000 महिला बचत गटांना पंधरा हजार ड्रोन हे उपकरण वितरित करणार आहे व वरील योजनेअंतर्गत हे ड्रोन 2024 मध्ये पात्र झालेल्या महिलांना वितरित करण्यात येणार आहेत, यासाठी केंद्र सरकार संपूर्ण जगभरात 1261 कोटी रुपये खर्च करणार आहे.

तसेच ड्रोन च्या मदतीने शेतातील काम कसे करायचे जसे की खत फवारणी पिकांचे संरक्षण तसेच एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या ड्रोन चा वापर कसा करायचा याच संपूर्ण प्रशिक्षण हे महिलांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच बचत गटातील महिलांना ड्रोन हे उपक्रम देण्यात येणार आहे

 ड्रोन हे एक आधुनिक उपकरण असल्यामुळे या उपकरणाचा वापर शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे ज्यामुळे केंद्र सरकार ड्रोन खरेदीसाठी 8 लाख रूपये अनुदान देणार आहे

आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच ड्रोन चा वापर शेतीमध्ये आल्याने शेतकऱ्यांच्या परिश्रमात आणि वेळेत बचत होणार आहे, ज्यामुळे बाजारामध्ये आपण जे ड्रोनचे भाडे पाहतो ते 1 एकराच्या फवारणीसाठी हजार ते दीड हजार रुपये घेतले जाते. व ड्रोन ने एक ते दोन एकर शेत दहा ते पंधरा मिनिटात ड्रोन च्या साह्याने फवारुण होते.
ड्रोन कमी वेळेत शेतकऱ्यांसाठी जास्त काम करू शकतो परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याला ड्रोन खरेदी करणे परवडू शकत नाही, असे की एका ड्रोन ची किंमत बजारामध्ये हजार मध्ये 6 ते 12 लाख रुपया पर्यंत पाहायला मिळते व त्या ड्रोन चा जीवन काय चार ते पाच वर्षाचा असतो

Leave a Comment