एका एकरात लाखो रुपये उत्पन्न मिळणार | ड्रॅगन फळ शेती

शेतकरी मित्रांनो दैनंदिन जीवनात शेती करत असताना महाराष्ट्रा मध्ये बरेचसे शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती करत असतात परंतु त्या शेतीतून त्यांना पाहिजेल तसे पुरेसे उत्पन्न देखील तयार होत नाही.ज्यामुळे आत्ताच्या घडीला बरेचसे शेतकरी हे आधुनिक शेतीकडे वळत आहेत ज्याचा फायदा त्यांना त्यांच्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे आज आपण ड्रॅगन फळ लागवडी विषयी माहिती घेणार आहोत की ज्याची लागवड करून तुम्ही देखील वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न हे कमवू शकता तर संबंधित माहिती पूर्ण वाचण्यासाठी खालील दिलेला लेख संपूर्ण वाचा.

dragon fruit farming in marathi

ड्रॅगन फळ शेती काय आहे

शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फळ शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाणारी एक फळ शेती आहे ज्यामध्ये आपल्याला ड्रॅगन फळाची लागवड करावी लागते व या ड्रॅगन फळाला बाजारामध्ये देखील चांगली मागणी असते. त्यामुळे असंख्य शेतकरी हे ड्रॅगन फ्रुट शेतीकडे वळत चाललेले आहेत.

शेतकऱ्याने ड्रॅगन फळ शेती का करावी

  • शेतकरी मित्रांनो जर आपण पाहिलं की प्रत्येक शेतकऱ्याने थोड्याशा क्षेत्रात का होईना ड्रॅगन फळ शेती का करावी तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाची जर लागवड करायची झाली तर आपल्याकडे पाण्याचा साठा असणे खूप गरजेचे आहे
  • परंतु आपण जर ड्रॅगन फळ शेती पाहिली तर या ड्रॅगन फळ शेतीसाठी पाण्याचे प्रमाण हे खूप कमी लागते त्यामुळे या शेतीमधून शेतकऱ्याला खूप चांगला फायदा घेता येतो
  • यानंतर दुसरे म्हणजे आपण जर ड्रॅगन फळ शेती केली तर विक्रीसाठी तयार झालेल्या फळाला बाराही महिने चांगले बाजार भाव मिळतात त्यामुळे याचा देखील आपल्याला फायदा मिळतो
  • यानंतर तिसरा फायदा म्हणजे असा की ड्रॅगन फळ शेतीसाठी सरकारमार्फत शेतकऱ्याला अनुदान देखील दिले जाते ज्यामुळे या शेतीची लागवड व लागवडीचा खर्च हा शेतकऱ्याचा कमी होतो
  • ड्रॅगन फ्रुट ची लागवड ही कोणतेही प्रकारच्या जमिनीवर करता येते या शेतीसाठी कोणत्याही प्रकारची ठराविक जमीन तुमच्याकडे असणे गरजेचे नाही

ड्रॅगन फ्रुट लागवड कशी केली जाते

  • शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ड्रॅगन फ्रुट लागवड करायची असेल तर लागवडीसाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या नर्सरी मधून ड्रॅगन फ्रुट हे रोप आणावे लागेल
  • किंवा ड्रॅगन फ्रुटची जर तुम्हाला दर्जेदार लागवड करायची असेल तर तुमच्याकडे चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध असणे गरजेचे आहे
  • यानंतर लागवडीच्या आधी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत टाकून  शेताची योग्य मशागत करून घ्यावी लागेल
  • त्यानंतर ड्रॅगन फ्रुट ची लागवड ही 12×5 अंतरावर तुम्हाला करायची आहे
  • ड्रॅगन फ्रुट ची लागवड ही तुम्ही मे ते जुलै महिन्याच्या कालावधीत केली तर ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल ही व तुम्हाला लवकर फळ प्राप्ती होईल
  • ड्रॅगन फ्रुट ची लागवड केल्यानंतर जमिनीमध्ये कुठे पाणी साचणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल पाणी न साठण्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे शेतामध्ये पाठ काढून ठेवायचे आहे जेणेकरून शेतामधील पाणी बाहेर पडण्यास एक मार्ग मिळेल
  • आणि शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रुट शेती ही वेल पद्धतीची शेती आहे म्हणजेच ड्रॅगन फळ हे वेलांवरती लागले जाते त्यामुळे तो वेल व्यवस्थित टिकन्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये सिमेंटचे खांब गाडावे लागतील
  • आणि सिमेंटचा खांब गाडल्यानंतर एका खांबाच्या आधारावरती तुम्ही त्याच्याभोवती 3 ते 5 झाडे लावू शकता
  • अशा पद्धतीने तुम्ही एक थोडक्यात माहिती घेऊन ड्रॅगन फ्रुट ची लागवड करू शकता

ड्रॅगन फ्रुट शेती मधून वर्षाला किती उत्पन्न मिळते

शेतकरी मित्रांनो जर आपण ड्रॅगन फ्रुट शेती करण्याचा विचार करत असाल आणि या शेतीची लागवड जर तुम्ही एक एकर क्षेत्रामध्ये करत असाल तर तुम्ही एक एकर क्षेत्रामध्ये लागवड करून वर्षाला 7 ते 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न कमवू शकता.

FAQ

ड्रॅगन फ्रुट फळशेती कधी करावी

शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रुट फळ शेती ही मे ते जून महिन्याच्या दरम्यान करावी.

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी रोपे कोणती निवडावी

शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी रोपे ही आपण कलम केलेली निवडली पाहिजे जेणेकरून कलम केलेल्या रोपांना कमी काळात फळे लागतात व त्यामधून आपल्याला उत्पादन देखील कमी काळात प्राप्त होते.

ड्रॅगन फ्रुट फळशेती मधुन किती उत्पादन मिळते

शेतकरी मित्रांनो जर आपण ड्रॅगन फ्रुट फळ शेती ही एक एकर क्षेत्रामध्ये केली असेल तर तुम्हाला वर्षाला आठ ते नऊ लाख रुपये पर्यंत उत्पन्न हे होऊ शकते.

Leave a Comment