यूट्यूब वर विडिओ बनवून पैसे कसे कमवायचे संपूर्ण माहिती 

आज काल आपण पाहतो की समाजामध्ये नोकरीचे प्रमाण हे खूप कमी झाले आहे त्यामुळे तरुण वर्ग कुठे ना कुठेतरी व्यवसायाकडे वळत आहे परंतु घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणामुळे प्रत्येक युवकाला व्यवसाय टाकने हे शक्य नाही. त्यामुळे आज आपण असा एक मार्ग पाहणार आहोत की ज्याच्या मदतीने यूट्यूबवर अगदी दोन ते तीन तास काम करुण शुन्य भांडवलात आपण घरात बसून ऑनलाइन पद्धतीने काम करून चांगले पैसे कमवू शकतो. तर खालील माहिती सविस्तर वाचा.

यूट्यूब वर काम करुण पैसे कसे कमवायचे

मित्रांनो फेसबुक आणि व्हाट्सअप च्या डिजिटल जगात युट्युब चे देखील एक मोठे स्थान आहे. खूप सारी लोक युट्युब हे एक मनोरंजन म्हणून पाहतात परंतु त्यांना माहित नाही की युट्युब मधून देखील खूप सारी लोक पैसे हे कमवतात. तुम्ही आत्ता म्हणणार की शक्यच नाही युट्युब वरती कसे पैसे कमावता येतील परंतु तुम्ही कधी असा विचार केला का की आपण ज्या युट्युब वरती व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओ बनवण्याचा त्या व्यक्तीला काय फायदा होतो. त्या व्यक्तीला ती व्हिडिओ बनवून काहीतरी उत्पन्न मिळत असेल त्यामुळेच तर तो व्यक्ती ती व्हिडिओ बनवत असेल. मित्रांनो या ऑनलाइन जगात असंख्य प्रकारे ऑनलाईन काम करून पैसे कमवता येतात. त्यामधील एक म्हणजे युट्युब आणि या युट्युब वरती आपण व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो. ते कसे ते आत्ता आपण पाहुया आता आपण संपूर्ण माहिती पाहूया की युट्युब वरती कसे काम करून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पैसे मिळतील.

  • सर्वप्रथम youtube वरती व्हिडिओ बनवण्या अगोदर आपल्याकडे एखाद्या विषयाची योग्य माहिती असणे गरजेचे आहे म्हणजेच की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडते किंवा त्या कामाची संपूर्ण माहिती तुम्हाला माहीत असेल तर त्या विषयावर तुम्हाला यूट्यूब वरती वीडियो बनवून माहिती सांगायची आहे.

उदाहरण : जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेती विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती असेल तर त्या माहितीचा उपयोग करून तुम्ही युट्युब वरती व्हिडिओ बनवू शकता. म्हणजेच जर तुम्ही कांदा लागवड केली असेल तर त्याविषयी कांदा लागवड कशी केली जाते तसेच त्याचं खत व्यवस्थापन कस केल जात याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगायचे आहे. तुम्हाला ज्यापण क्षेत्रा विषयी किंवा विषयावरती माहिती असेल त्यावर तुम्ही माहिती ची वीडियो बनवू शकता. ( परंतु ज्यामध्ये तुमची आवड आहे असाच विषय तुम्ही निवडला पाहिजे म्हणजे जर तुम्ही शेतीविषयी व्हिडिओ बनवत असाल तर त्याच विषयी तुम्ही माहितीचे व्हिडिओ बनवले पाहिजे. काही लोक सुरुवातीला शेती विषयी व्हिडीओ बनवतात आणि त्यानंतर परत दुसऱ्या विषयावर व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात ज्यामुळे आपल्या व्हिडिओ पाहणारी जी लोक असतात ती पुन्हा आपल्या व्हिडिओ पाहत नाहीत त्यामुळे आपल्या व्हिडिओचे लाईक आणि व्ह्यूज कमी होतात त्यामुळे ती व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जात नाही आणि त्यामधून आपल्याला पैसे देखील कमी भेटण्यास सुरुवात होते) त्यामुळे तुम्ही योग्य विषय निवडणे हे खूप गरजेचे आहे विषय कसा निवडला जातो त्याबद्दल तुम्ही युट्युब वर देखील माहिती पाहू शकता.

  • युट्युब वर व्हिडिओ बनवण्यासाठी विषय निवडल्यानंतर काय करावे लागते तर समजा जर तुम्ही शेती विषयी व्हिडिओ बनवण्यासाठी विषय निवडला शेती. तर आत्ता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता व्हिडिओ युट्युब वरती कशा टाकायच्या तर व्हिडिओ टाकण्यासाठी आपल्याला युट्युब वरती एक चॅनेल तयार करावा लागतो तो चॅनेल अगदी एक ते दोन मिनिटात आपल्याला तयार करता यतो. चॅनेल म्हणजे काय तर चॅनेल म्हणजे एक प्रकारे आपली ओळख म्हणजे ज्या तुम्ही युट्युब वरती व्हिडिओ पाहता त्या व्हिडिओच्या खाली त्या चॅनलचं नाव असतं. तर ते नाव यासाठी दिलं जातं की एखाद्या व्यक्तीला जर फक्त त्याच चॅनेल वरच्या व्हिडिओ पहायच्या असतील तर त्या चॅनलचं नाव जर आपण वरती सर्च केल तर आपल्याला ज्या पण व्हिडिओ दिसतील त्या सर्व व्हिडिओ त्याच चॅनलच्या दिसतील. त्यामुळे जर तुम्ही शेतीविषयक व्हिडिओ बनवत असाल तर चॅनलचं नाव देखील तुम्हाला शेतीच्या संबंधित मिळत जुळतं ठेवायच आहे जसे की ( शेतकरी माहिती, शेती माहिती,शेतकरी राजा ) चॅनलचं नाव हे सोप्प ठेवायच आहे जेणेकरून सर्वांच्या ते लक्षात राहील व उच्चारण्यास देखील सोपे जाईल. चॅनेल कसा तयार करतात या संबंधित तुम्ही youtube वर जाऊन प्रत्यक्ष व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा चॅनेल बनवू शकता.
  • चॅनेल बनवल्यानंतर आता तुम्ही व्हिडिओ ह्या युट्युब चॅनल वरती अपलोड करू शकता किंवा टाकू शकता परंतु व्हिडिओ युट्युब वरती टाकण्या अगोदर आपल्याला काही ठराविक गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्या म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आपला आवाज हा चांगला व स्पष्ट असला पाहिजे त्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये असणारा काही न लागणारा भाग आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करून तो काढून टाकायचा आहे. व्हिडिओ एडिटिंग साठी असंख्य ॲप तुम्हाला प्ले स्टोअर वरती मिळून जातील त्यामधील काही ॲप म्हणजे (किनेमास्टर, Vn,Inshot ) अशा ॲपमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओ ही एडिट करू शकता. व्हिडिओ एडिट केल्यानंतर ती व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा जवळपासच्या व्यक्तींना दाखवून त्या व्हिडिओमध्ये काही अजून कमी आहे का ते जाणून घेऊन जर कमी असेल तर ते पुन्हा व्यवस्थित करून त्याची पूर्तता तुम्ही करू शकता.
  • जर व्हिडिओ संपूर्णपणे व्यवस्थित असेल तर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेल वरती जाऊन ती व्हिडिओ अपलोड करू शकता अपलोड करताना आपण ज्या विषयावर व्हिडिओ बनवली आहे त्या विषयाचे टायटल आपल्याला तिथे टाकायचा आहे म्हणजेच जर समजा तुम्ही व्हिडिओमध्ये माहिती दिली असेल की आंब्याची लागवड कशी केली जाते तर तुम्हाला त्या व्हिडिओचे टायटल हे (आंब्याची लागवड कशी केली जाते याची संपूर्ण माहिती पहा) असं काहीतरी टायटल द्यायचं आहे. अश्या अनेक ठराविक गोष्टी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करताना टाकाव्या लागतात. तसेच तुम्हाला व्हिडिओसाठी एक थंबनेल म्हणजेच बॅनर देखील बनवावा लागतो. जो तुम्हाला व्हिडिओच्या वरती टाकावा लागतो ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही युट्युब वर एखादी व्हिडिओ पाहून घेऊ शकता. सर्व माहिती भरल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायची आहे.
  • अपलोड केल्यानंतर ती व्हिडिओ तुम्हाला तुमच्या चॅनेल वरती दाखवण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला तुम्हाला ती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हाट्सअप वर किंवा फेसबुक वर शेअर करायची आहे. जेणेकरून लोकांना कळेल की तुम्ही ही व्हिडिओ बनवली आहे आणि तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज देखील वाढण्यास सुरुवात होतील आणि तुम्ही भविष्यात किती पण व्हिडिओ बनवा त्या व्हिडिओ चं अपडेत सर्व लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला लोकांना तुमचा चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी सांगायचे आहे.
  • आणि फक्त एकच व्हिडिओ बनवून तुम्हाला थांबायचे नाही तर तुमच्या विषयाच्या संबंधित तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ हे अपलोड करावे लागतील आठवड्यामधून तुम्ही दोन तरी व्हिडिओ हे तुम्हाला तुमच्या youtube चॅनेल वरती  टाकायचे आहेत.
  • सुरुवातीला तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज हे कमी येतील परंतु जसे जसे तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहा आणि योग्य आणि चांगली माहिती देत राहाल तशा तशा तुमच्या व्हिडिओज व्हायरल जाण्यास सुरुवात होईल आणि त्याच व्ह्यूज मधून तुम्ही यूट्यूब मधून योग्य प्रकारे पैसे कमवू शकता. तर आता आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया की कसे यूट्यूब वर व्हिडिओ टाकून आपल्याला पैसे मिळतात.

युट्युबवर व्हिडिओ बनवून पैसे कसे मिळतात

  • मित्रांनो युट्युब वर व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला गुगल ऍडसेन्सच्या मदतीने पैसे हे मिळतात. म्हणजेच की जेव्हा आपण एखादी युट्युब वरती व्हिडिओ पाहतो तेव्हा व्हिडिओच्या मध्ये असंख्य प्रकारच्या जाहिराती येत असतात ज्या तुम्ही पाहिले असतील आणि त्याच जाहिरातींमधून आपल्याला गूगल ऍडसेन्स हे पैसे देत असतं जितक्या जाहिराती आपल्या व्हिडिओला येतील तितके पैसे आपण व्हिडिओ मधून कमवू शकतो आणि जाहिराती तेव्हाच जास्त येतात, जेव्हा आपली व्हिडिओ जास्त लोक पाहतात म्हणजेच की एक लाख दहा लाख इतके लोक जर आपली व्हिडिओ पाहत असतील तर तेव्हा आपली कमाई देखील यातून लाखामध्ये होते. आणि जास्त लोक आपल्या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती सांगितली आहे ती योग्य माहिती असायला पाहिजे व ती माहिती कोणाकडून चोरून छापलेली नसायला पाहिजे.
  • आता तुम्हाला तर कळाले की google ऍडसेन्स च्या मदतीने आपल्याला पैसे मिळतात परंतु आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की किती लोकांनी जर आपली व्हिडिओ पाहिली तर आपल्याला किती पैसे मिळतील. तर तसे डायरेक्ट कुणालाही सांगता येणार नाही परंतु सरासरी जर तुमच्या व्हिडिओला कमीत कमी 40 ते 50 हजार व्यूज आले म्हणजेच तुमची व्हिडिओ जर 40 ते 50 हजार लोकांनी पाहिली तर त्यामधून तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये इतके मिळतात. त्यामुळे सुरुवातीच्या वेळेस तुम्हाला व्ह्यूज हे कमी येतील तर असं नाही की त्यामधून तुम्हाला पैसे हे मिळणार नाहीत पैसे हे तुम्हाला मिळतील पण थोडे मिळतील त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या व्हिडिओ  टाकायच्या आहेत. जेणेकरून तुमच्या भविष्यात खूप सार्‍या व्हिडिओ होतील आणि त्या वायरल झाल्या तर त्यामधून तुम्हाला त्याच्यातून खूप सारे पैसे मिळतील. युट्युब वर पैसे कसे मिळतात याबद्दल जर तुम्ही सविस्तर माहिती युट्युब वर व्हिडिओ पाहून पाहिली तर याबद्द्ल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. की की कशाप्रकारे युट्युब वरून पैसे कमवले जातात.
  • आणि एकदा काय तुमचा चॅनेल व्हायरल जाण्यास सुरुवात होईल म्हणजेच की तुमच्या व्हिडिओ ची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल तेव्हा तुम्ही याच व्हिडिओच्या मार्फत अनेक प्रकारे पैसे कमवू शकता. म्हणजेच की जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमचा चॅनेल शेती विषयी असेल तर तुमच्याकडे जी लागवड होते. त्याची विक्री तुम्ही डायरेक्ट ऑनलाइन नंबर देऊन तुम्हाला हव्या असलेल्या भावात करू शकता आणि तुम्हाला ग्राहक देखील खूप प्रमाणात मिळतील.
  • तसेच तुमची प्रसिद्धी पाहून अनेक कंपन्या ह्या तुमच्याकडे त्यांच्या वस्तूंची जाहिरात तुमचे चॅनेलवर करण्यासाठी तुमच्याकडे येतील त्यामधून देखील तुम्हाला पैसे हे खूप मोठ्या प्रमाणात मिळतात (जसे की आपण एखादी व्हिडिओ पाहत असतो तर त्या व्हिडिओच्या मध्ये तो व्यक्ती एखाद्या ॲपविषयी किंवा एखाद्या वस्तूविषयी आपल्याला माहिती सांगत असतो म्हणजेच कि त्या वस्तूची किंवा  ॲपची तो जाहिरात करत असतो. तर तेव्हा त्या वस्तूची किंवा त्याची ॲपची जाहिरात करण्यासाठी कंपनी त्याला खूप पैसे हे देत असते. तर यामधून देखील आपल्याला पैसे मिळत असतात युट्युब वर प्रसिद्धी मिळाल्यानंतर  असंख्य मार्गाने आपल्याला पैसे कमावता येतात याबद्दल सविस्तर आपण एखादी युट्युब वर व्हिडिओ पाहून माहिती घेऊ शकता.

युट्युब वर व्हिडिओ टाकताना या गोष्टींचे काळजी घ्या

युट्युब वर व्हिडिओ हा आपण आपला स्वतःचा वैयक्तिक टाकणार कुणाचाही चोरून किंवा कोणाचाही व्हिडिओ आपण युट्युब वरती टाकणार नाही असे जर आपण केले तर आपल्या चैनल वरती एक कॉपीराईट स्ट्राईक येते म्हणजेच की आपल्याला माहिती दिली जाते की जर तुम्ही अशी व्हिडिओ पुन्हा टाकली तर तुमचा चैनल बंद होईल त्यामुळे आपण जी पण व्हिडिओ टाकणार ती स्वतः बनवूनच टाकणार कुणाचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती टाकणार नाही. परंतु आपण दुसऱ्याची व्हिडिओ पाहून त्यामध्ये काही ठराविक माहिती ॲड करून जर एखादी नवीन व्हिडिओ बनवली तर त्या व्हिडिओला कॉपरेट स्ट्राईक येत नाही त्यामुळे तुम्ही तशी देखील व्हिडिओ बनवू शकता कॉपीराईट स्ट्राइक संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही युट्युब वर सविस्तर व्हिडिओ पहा.

FAQ
युट्युबवर 1000 व्यूज वरती किती पैसे मिळतात

जर आपण सरासरी पकडलं तर भारतामध्ये एखाद्याचं नवीन यूट्यूब चॅनेल जर असेल तर त्याला 1000 व्यूज वरती 80 रुपयापासून ते 400 रुपये पर्यंत मिळतात.

युट्युबवर व्हिडिओ कशी बनवायची

युट्युब वर व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे एखाद्या गोष्टीविषयी माहिती असायला पाहिजे त्या माहितीच्या विषयावर आपण आपला चैनल बनवून मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून ती व्हिडिओ युट्युब वरती टाकू शकतो.

युट्युब वर सबस्क्राईबर कसे वाढवायचे

Youtube वर सबस्क्राईबर वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे आहे फेसबुक किंवा whatsapp अशा अनेक माध्यमातून आपल्याला आपला चैनल लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामधून आपले सबस्क्रायबर हे वाढतील.

युट्युब वरून कमवलेले पैसे कुठे मिळतात

युट्युब वरून कमवलेले सर्व पैसे हे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आपल्या बँकेच्या खात्यात जमा होतात.

Leave a Comment