मित्रांनो आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात पेट्रोल बाईक नंतर बाजारामध्ये आता इलेक्ट्रिक बाइक सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत परंतु असंख्य ग्राहकांच्या मनात एकच प्रश्न पडतो की आपण इलेक्ट्रिक बाइक घ्यावी की पेट्रोल बाईक घ्यावी तरी याबद्दल आपण व्यवस्थित माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यामुळे खालील लेख व्यवस्थित वाचा
इलेक्ट्रिक बाइक व पेट्रोल बाईक फरक
तसे पाहिले तर इलेक्ट्रिक बाईक ही प्रदूषण न होण्यासाठी व सौर ऊर्जेवरती चालण्याकरता बनवली गेलेली एक बाइक आहे.खालील लेखांमध्ये तुम्हाला या दोन्ही बाइक मधील फरक व तुम्ही कोणती बाइक घेतली पाहिजे या संबंधित माहिती मिळेल
पेट्रोल बाईक व इलेक्ट्रिक बाइक किंमत
सर्वात पहिल आपण या दोन्ही बाइक मधील किमतीचा फरक पाहिला तर इलेक्ट्रिक बाइक ही आपल्याला पेट्रोल बाईक पेक्षा महाग किमतीत मिळते
पेट्रोल बाईक किंमत | इलेक्ट्रिक बाइक किंमत |
सुरुवात 50 ते 60 हजार पासून | 1 लाख पासून पुढे |
असं का आहे की इलेक्ट्रिक बाइक हे पेट्रोल बाईक पेक्षा जास्त किमतीत मिळते तर मित्रांनो हे अशा मुळे आहे की इलेक्ट्रिक बाइक ला बॅटरी चा खर्च जास्त येतो त्यामुळे त्याची किंमत देखील जास्त ठेवण्यात येते
पेट्रोल बाईक व इलेक्ट्रिक बाइक एव्हरेज कोण जास्त देते
मित्रांनो पेट्रोल बाईकला एव्हरेज हे खूप कमी असते परंतु त्याच्या पलीकडे इलेक्ट्रिक बाइकला एव्हरेज हे खूप चांगले असते जे तुम्ही खाली पाहू शकता
एव्हरेज | रुपये |
इलेक्ट्रिक बाइक 100 किलोमीटर | 20 रूपये |
पेट्रोल बाईक 100 किलोमीटर | 200 रुपये |
आपण पाहू शकता की इलेक्ट्रिक बाइक ला शंभर किलोमीटर प्रवास करण्यासाठी अगदी 20 रुपये लागतात
परंतु पेट्रोल बाईक ला शंभर किलोमीटर प्रवास करण्यासाठी 200 रुपये लागतात त्यामुळे इलेक्ट्रिक पाहिजे आपले पैसे वाचवण्यास मदत करते
इलेक्ट्रिक बाइक व पेट्रोल बाइक सर्विसिंग खर्च
मित्रांनो खरं सांगायचं झालं तर इलेक्ट्रिक बाइक ला वर्षातून व सहा महिन्यातून सर्विसिंग केली जाते त्यामध्ये त्या बाइकचा सर्विसिंग खर्च हा अगदी 100 ते 200 रुपयांचा येतो
परंतु पेट्रोल बाइकला वर्षातून तीन ते चार वेळा सर्विसिंग केली जाते व प्रत्येक वेळी सर्विसिंगचा खर्च हा हजार ते दीड हजार रुपये येत असतो त्यामुळे इथे देखील पेट्रोल बाईक ला खूप जास्त पैसे लागणार आहेत
इलेक्ट्रिक बाइक पेट्रोल बाईक तुम्ही कोणती घेतली पाहिजे
मित्रांनो जर तुम्ही शहरांमध्ये राहत असाल आणि तुमचा प्रवासा हा तिथल्या तिथे होत असेल जसे ऑफिसला जाणे किंवा कॉलेजला जाणे किंवा इतर भाजीला जाणे तर तेव्हा तुम्ही नक्कीच इलेक्ट्रिक बाइक घेऊ शकता परंतु जर तुम्ही गावाकडील भागात राहत असाल तर तुम्ही नक्कीच पेट्रोल बाईक घेतली पाहिजे कारण की गावाकडील रस्त्यांवर इलेक्ट्रिक बाइक जास्त चालत नाही व तिकडे चार्जिंग चे पंप नसल्यामुळे अडचण देखील तुम्हाला येऊ शकते