फळपीक विमा योजना 2023 मोबाईल वरती अर्ज करा

शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबवली आहे ज्या अंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकारकडून पिक विमा देण्यात येणार आहे यामध्ये मृग नक्षत्र आणि आंबिया नक्षत्र अशा दोन ऋतूंसाठी शेतकऱ्यांना पिक विमा हा देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने ही योजना महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यातील फळबागांच्या हवामानाचा अंदाज घेऊन ही  फळपीक विमा योजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पहिला टप्पा हा खरीप फळ पीक विमा योजने अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. सरकारने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे घेतलेले आहेत जर आपण अर्ज नसेल केला तर खालील लेख संपूर्णपणे व्यवस्थित वाचा या योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

fal pik vima yojana forrm 2023

फळपीक विमा योजना 2023 काय आहे

  • शेतकऱ्याला शेतामधील फळ झाडांमधून एक शेतीपूरक उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असते त्यामुळे तसे पाहिले तर शेतकऱ्याला थोडीफार फळ पिकातून आर्थिक मदत होते परंतु फळ पिकातून उत्पन्न चांगलं असलं तरी नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी फळ पिकांचे देखील नुकसान होतं ज्यामध्ये शेतकऱ्यांचे देखील नुकसान होते त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या फळ पिकांच नुकसान,हवामान नैसर्गिक रित्या धोका व अवकाळी पाऊस किंवा गारपीट इत्यादींपासून त्यांचे संरक्षण व्हावं यासाठी राज्यात फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या फळ पीक विमा योजनेअंतर्गत खालील प्रकारच्या फळ पिकांवर ही योजना राबवली जाणार आहे जसे की संत्रा,मोसंबी,डाळिंब,चिकू,पेरू,द्राक्ष,सीताफळ व लिंबू इत्यादी फळ पिकांचा समावेश या योजनेमध्ये येणार आहे

फळपीक विमा योजना फायदे

  • फळपीक योजनेअंतर्गत एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा हवामानाच्या बदलामुळे किंवा अवकाळी पाऊस गारपीट यामुळे जर शेतकऱ्याच्या फळ पिकाचे नुकसान झालं तर त्या नुकसानीवर सरकार हे या योजनेतून मदत करत असते
  • फळपीक विमा योजनेतून शेतकऱ्याला आर्थिक मदत प्राप्त होते
  • या योजनेचा मुख्य उद्देश असाच आहे की शेतकऱ्यांना फळ पिकामध्ये  होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई काही प्रमाणात सरकारकडून मदत मिळावी हा मुख्य उद्देश आहे.

फळपीक विमा योजनेचे नियम

  • सरकारने फळपीक विमा योजनेसाठी काही नियम ठेवलेले आहेत त्यामधील नियम हे दोन प्रकारामध्ये आहेत पहिला नियम शेतकऱ्याचं ठराविक क्षेत्र पाहून निवड केली जाते व दुसऱ्या मध्ये हंगामासाठी निवड केली जाते
  • म्हणजेच जर शेतकऱ्याचं जास्तीत जास्त चार हेक्टर पर्यंत फळपिक क्षेत्र असेल तरच तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि जर चार हेक्टर पेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तर या योजनेचा त्याला लाभ घेता येणार नाही
  • आणि यानंतर दुसरा नियम असा आहे की एका शेतकऱ्याला एकाच हंगामाचा लाभ या योजनेअंतर्गत घेता येईल त्यामुळे वर्षात तुम्ही एकच हंगामामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकता.

फळपीक विमा योजना 2023 कागदपत्रे

  • सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याचं ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड त्याला लागणार आहे
  • यानंतर त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा सातबारा उतारा 8अ त्यामध्ये त्या सातबारावरती त्या फळबागेची नोंद असणे ही खूप गरजेची आहे जर नोंद नसेल तर तुम्ही जवळच्या तलाठी कार्यालयांमध्ये जाऊन फळबागेची सातबारा वरती नोंद करू शकता
  • यानंतर पीक पेरा स्वयंघोषणापत्र देखील तुम्हाला लागणार आहे
  • यानंतर तुमच्या फळबागेच्या क्षेत्राचा तुम्हाला टॅगिंग केलेला फोटो देखील लागणार आहे
  • तसेच यानंतर तुम्हाला सामायिक क्षेत्र संमती पत्र देखील लागणार आहे
  • व अजून काही ठराविक कागदपत्रे देखील तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहे या योजने संबंधित अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करू शकता.

फळपीक विमा योजना अर्ज कसा करायचा

शेतकरी मित्रांनो फळ पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मोबाईल वरती या (pmfby.gov.in) संकेतस्थळावरती जायचं आहे व इथे जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे जर तुम्हाला मोबाईल वरती फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयांमध्ये जाऊन कृषी अधिकाऱ्याची भेट घेऊन या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता व अधिक माहिती प्राप्त करू शकता.

FAQ

फळपीक विमा अर्ज कुठे करायचे

शेतकरी मित्रांनो फळपीक विमा अर्ज हा सरकारच्या या (pmfby.gov.in) अधिकृत संकेतस्थळावरती आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

फळपीक विमा कोणाला दिला जातो

सरकारकडून फळपीक विमा हा अशा शेतकऱ्याला दिला जातो ज्या शेतकऱ्याचे नैसर्गिक रित्या किंवा अवकाळी पावसामुळे फळबागेचा नुकसान होते त्याला आर्थिक सहायता म्हणून फळपीक विमा दिला जातो.

Leave a Comment