सरकारी योजना : मोफत पिठाची गिरणी अनुदान योजना 2024, असा अर्ज केला तर लाभ मिळणार…

free pithachi girani yojana 2024

सरकारी योजना : महाराष्ट्र सरकार अंतर्गत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना आता संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राबविण्यात येणार आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व महिलांना मिळणार आहे ही योजना एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी राबविण्यात येणारी एक योजना आहे.

आपण पाहतो की व्यवसायाचा विचार केला की महिलांचे प्रमाण हे व्यवसायामध्ये खूपच कमी आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महिलेला घरबसल्या व्यवसाय प्राप्त होईल, असा व्यवसाय म्हणजे पिठाची गिरणी व्यवसाय तरी याचसाठी महाराष्ट्र महिला बाल विकास विभागाने पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे ज्या योजनेसाठी कोणतीही महिला अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकते

मोफत पिठाची गिरणी योजना पात्रता

  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे तरच त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल
  • अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 60 वर्ष दरम्यान असायला पाहिजे
  • तसेच अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी मध्ये नसायला पाहिजे
  • एका कुटुंबातून एकाच महिलेला या योजनेचा फायदा घेता येईल जेणेकरून असंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळेल

मोफत पिठाची गिरणी योजना कागदपत्रे

  • अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  •  प्रतिज्ञापत्र
  • मोबाईल क्रमांक
  • इलेक्ट्रॉनिक दुकानाचे बिल

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये करायचे आहे तुमच्याजवळ जर ग्रामपंचायत कार्यालय नसेल तर तुम्ही तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी असलेल्या महिला व बालविकास विभागांमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता

Leave a Comment