गांडूळ खत प्रकल्प | gandul khat project in marathi

gandul khat project in marathi | गांडूळ खत प्रकल्प संपूर्ण माहिती | gandul khat price | gandul khat prakalp in marathi

आजच्या काळात आपण पाहतच असाल की खुपसारे शेतकरी हे गांडूळ खत प्रकल्प हा उभारत आहेत.हा प्रकल्प उभारण्याचे कारण म्हणजे गांडूळ खतापासून एक घरबसल्या व्यवसाय देखील करता येतो व तसेच त्या गांडूळ खताचा वापर शेतीसाठी देखिल केला जातो, तसे पाहिले तर  रासायनिक खते वापरल्यामुळे आपल्या जमिनीची खुप जास्त प्रमाणात धूप ही होत त्यामुळे जमिन नापीक हो चालली आहे, ज्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता देखील कमी होते,व त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये तोटा देखिल होतो, यामुळेच आज आपण गांडूळ खत प्रकल्प विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत

gandul khat project

गांडूल खत प्रकल्पासाठी किती खर्च येतो ?

gandul khat project

शेतकरी बंधूंनी यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला कच्चा माल लागणार आहे म्हणजेच लेंडीखत असेल शेणखत असेल गाडीकचरा असेल पालापाचोळा असेल जमिनीवर टाकण्यासाठी कीटकनाशकांची पावडर असेल इत्यादी सामगराची शेतकरी मित्रांनो तुम्हाला खर्च हा एकून चार हजार रुपये येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा जर मजुरीचा खर्च पाहिला तर मजुरी म्हणजे काय आहे की बेड भरणे त्यानंतर तयार झालेला माल त्याठिकाणी काढणे चाळणी पॅकिंग करणे असेल त्यानंतर दररोज ४५ दिवस त्या ठिकाणी पाणी मारणे असेल तर नक्कीच याचा खर्च शेतकरी मित्रांनो  तुम्हाला दोन हजार रुपय इतका येणार आहे शेतकरी मित्रांनो गांडूळाचा जर त्या ठिकाणी खर्च पाहिला तर तुम्हाला एका बेडसाठी त्या ठिकाणी दीड किलो गांड़ूळ लागणार आहेत आणि याचा खर्च तुम्हाला ७५० रुपये इतका येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी HDPE BEDS बेडची जर किंमत पाहिली तर दोन हजार रुपये प्रतिबेट तुम्हाला त्या ठिकाणी बाजारात किंमत मोजावी लागेल अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो  एकूण जर आपण खर्च पाहिला तर एका बेडमध्ये तुम्हाला खत तयार करण्यासाठी ८७५० रुपये इतका खर्च येणार आहे.

गांडूळ खत प्रकल्प माहिती

तर मित्रांनो गांडूळ खत प्रकल्प हा उभारण्यासाठी आपल्याकडे एक पुरेशी १ किवा २ घुन्ठा दमट व हवेशीर जागा असणे आवश्यक आहे,ज्यामध्ये आपल्याला एक खाली दाखवलेल्या चित्रासारखा एक पत्र्याचा शेड बांधायचा आहे,शेड हा आपण आपल्या गरजेनुसार बांधणार,म्हणजेच जर तुम्हाला फक्त तुमच्या शेतीसाठीच गांडूळ खत तयार करायचे असेल तर तुम्ही एक बारीक पत्र्याचा शेड देखिल उभा करू शकत आणि जर तुम्हाला एक व्यवसायाच्या दृष्टीने गांडूळ खत प्रकल्प उभा करायचा असेल तर तुम्ही एक मोठा ३२ बाय १०० चा किवा १०० बाय ४० चा एक शेड मारू शकता,जेणेकरून तुम्हाला गांडूळ खताचा साठा हा खुप मोठया प्रमाणात करता येईल.आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे शेड बांधताना आपण शेड हा दक्षिण-उत्तर या दिशेनी बांधा कारण पूर्व आणि पश्चिम या दिशेने सर्याचा प्रकाश हा जास्त येते असतो आणि त्याचा त्रास आपल्या गांडूळ खताला न होण्यासाठी आपण हा प्रकल्प दक्षिण-उत्तर या दिशेनी बांधा तसेच गांडूळ खत व्यवस्थित राहण्यासाठी आपण शेड ला एक हिरव्या रंगाची नेट देखील बांधू शकता जेणेकरून हवा व पाणी आत घुसणार नाही, तसे पाहयला गेल तर गांडूळ खत शेती ही जास्त खर्चिक बाब नाही पण जर तुम्ही एक व्यवसायाच्या दृष्टीने पाहत असाल तर तुम्ही खुप मोठ्या प्रमाणात काम करू शकता 

gandul khat

गांडूळ खत बेड्स

शेड बांधल्यानंतर आपल्यला गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड मध्ये एक चौकोनी आकाराचे उभे बेड्स तयार करावे लागतात,हे बेड्स आपण घरी सुद्धा विटांचे बांधकाम करून करू शकतो,शेतकरी बंधूंनो सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिले तर तुम्हाला बारा बाय चार बाय दोन फुट या आकाराचे HDPE BEDS त्या ठिकाणी आलेले दिसून येतील याच्यामध्ये जवळजवळ शेतकरी बंधूंनो दीड टना पर्यंत त्या ठिकाणी तुमचा कच्चामाल बसतो आणि याच्यामध्ये फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हाला गांडूळ खत तयार झालेले त्या ठिकाणी दिसून येते,आपल्यला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण बेड्स तयार करू शकता किवा विकत घेऊ शकता,खुप सारे शेतकरी दोन्ही पद्धतीच्या बेड्स चा वापर करून गांडूळ शेती करतात.आणि जर तुम्ही जरा डोक लावल तर  अगदी कमी खर्चात देखिल तुम्ही चांगले बेड्स तयार करू शकतात

gandul khat bed

गांडूळ खतसाठी कोणते शेण घ्यावे ?

बेड्स तयार केल्यानंतर आत्ता आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासठी लागणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जनावरांच शेन,खुप सारी लोक ही गांडूळ खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जनावरांच शेन वापरतात पण जर आपल्यला गांडूळ खत कमी दिवसात जास्त प्रमाणात तयार कयायचं असेल तर आपण म्हशीच शेन वापरू शकता आणि म्हशीच शेण हे गांडूळ खतासाठी एक योग्य शेन म्हणून ओळखले जाते,परंतु गांडूळ कथासाठी आपण पूर्णपणे ताज शेण देखिल वापरलं नाही पाहिजे व पुर्णपणे कुजलेल शेण देखिल वापरलं नाही पाहिजे म्हशीच शेन घेताना कमित कमी १५ ते २० दिवसाच जुन शेण आपण घेणार व दोन महिन्याच्या आतील शेण आपण घेणार,आपला गांडूळ खत प्रकल्प जर मोठा असेल तर आपण म्हशीच शेण हे विकत देखिल घेऊ शकता 

शेण घेतल्यानंतर आपल्याला ते शेण बेड्स मध्ये पुर्णपणे पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवून झाल्यानंतर आपल्याला त्या शेणावर साधारणपणे  दोन ते तीन दिवस १०० लिटर इतक पाणी मारायचं आहे व ते शेणखत आपल्याला गार करायचं आहे.१५ ते २५ च्या आसपास आपल्याला त्या शेणाच tempreture हे ठेवायचं आहे,जास्त गरम ही नाही व जास्त थंड ही नाही अस आपल्यला त्या शेणाच वातावरण ठेवायचं आहे.आणि त्यानंतरच आपण त्यात गांडूळ टाकणार 

गांडूळ खतसाठी कोणता गांडूळ घ्यावा ?

तर मित्रांनो गांडूळाचे खुप सारे प्रकार आहेत जमिनीत भरपूर प्रकारचे गांडूळ असतात पण त्यापैकी Eisenia fetida (आयसेनिया फेटिडा) ही गांडूळाची जात भरपूर प्रमाणात गांडूळ खत निर्मीती मध्ये वापरली जाते,कारण हे गांडूळ शेण जास्त जलद गतीने खातात जेणेकरून एक दाणेदार गांडूळ खत तयार होत तर आपण ही Eisenia fetida ही गांडुळे शेणामध्ये घालु शकता 

गांडूळ खतसाठी पाण्याचं नियोजन कसं करायच ?

तर मित्रांनो साधारणपणे आपण एका बेडमध्ये ५ किलोच्या आसपास गांडूळ सोडु शकतो. एकदा गांडूळे शेणात टाकल्यानंतर आत्ता आपल्याला पाण्याच नियोजन करण खुपच  महत्वाच आहे कारण आपण जर पाणी जास्त प्रमाणात वापरलं तर त्यामुळे त्या शेणातील गांडूळांची हालचाल होत नाही व ती गांडुळे मरून जातात त्यामुळे पाण्याचं नियोजन हे योग्य असायला पाहिजे पाण्याचं नियोजन हे आपल्याला फक्त १५ दिवसासाठीच करायचं आहे,आपण दररोज १५ ते २० लिटर पाणी मारू शकतो, ते पण आवश्यक ते नुसार आपल्यला त्या शेणाला पाणी घालायचं आहे एकदा खत तयार होण्यास सुरवात झाली की आपल्यला त्या खताला पाणी घालयचं नाही आणि जर आपण पाणी घातलं तर ते खत शेणात पुन्हा मिसळत व परत गांडुळे ते खत खत नाहीत.त्यामुळे पाण्यचा नियोजन चागलं पाहिजे 

गांडूळ खत तयार होण्यासाठी किती दिवस लागतात ?

त्यानंतर गांडूळ खत तयार होण्यसाठी कमीत कमी २५ ते ३0 दिवसांचा कालावधी लागतो आणि आपल गांडूळ खत तयार झाल आहे की नाही हे आपण कस ओळखु शकतो तर जेव्हा बेड वरती त्या शेणाचे चहा पावडर इतक्या लहान आकाराचे दाने तयार होतील तेव्हा आपण समजु शकतो की आपलं गांडूळ खत हे तयार झाल आहे.तर ते गांडूळ खत आपण लगेच नाही काढणार आपण आधी एक वरच्या खताचा थर आधी हलवून घेणार आणि एक एक दिवस तसचं ठेवणार जेणेकरून वरचे सगळे गांडूळ खाली जातील आणि त्यांतरच आपण दुसऱ्या दिवशी तो हलवलेला थर काढून घेणार आणि अजून काही दिवस दुसरा गांडूळ खताचा थर तयार होण्यासाठी वेळ देणार तस पाहायला गेल तर १ बेड पूर्णपणे रिकामा होण्यसाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो   तर जेव्हा आपण गांडूळ खताचा पहिला एक थर काढून घेतो तर तेव्हा सर्वप्रथम आपल्याला तो सगळा काढलेला थर एक ते दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचा आहे व त्यानंतर चहापावडर इतका बारीक चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच बाजारामध्ये विक्रीसाठी काढायचा आहे,जर समजा आपल्या गांडूळ खत प्रकल्पामध्ये ३० बेड्स असतील तर आपण प्रत्येक  महिन्याला १५ टन इतक गांडूळ खत तयार करू शकतो.

गांडूळ खत किंमत | gandul khat price

gandul khat price

शेतकरी मित्रांनो आत्ता एकंतरीत जर आपण याच मोजमाप केलं तर दीड टनाच्या गांडूळ खताच्या कच्च्या मालापासून तुम्ही जवळजवळ बाराशे किलो इतका गांडूळ खत तयार करू शकता आणि याचा जर आपण भाव पाहिला तर आठ रुपयापासून ते दहा रुपये पर्यंत तुम्हाला प्रति किलो तयार गांडूळाची किंमत मिळेल शेतकरी मित्रांनो एकूण जर आपण हा गांडूळ खत मार्केटमध्ये विकल्यानंतर एका बेड मधून तुम्हाला किमान दहा हजार आठशे रुपये इतके मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो जर आपण उत्पादनाचा खर्च याच्यामधून वजा केला तर एका बेड पासून 45 दिवसांमध्ये 2050 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहणार आहेत नफा या स्वरूपामध्ये शेतकरी मित्रांनो आत्ता सांगितलेले सर्व भाव आपण कमीत कमी रेंज मधील पाहिलेले आहेत त्यामुळे याच्या पेक्षा जास्त नफा देखील तुम्हाला होऊ शकतो.

गांडूळ खताचे फायदे

तर असा आपण एक घरच्या घरी एक गांडूळ खत प्रकल्प तयार करू शकतो.आणि जर तुम्हांला गांडूळ खत तुमच्या शेतीसाठी वापरायचे असेल तर आत्ता तुम्ही गांडूळ खताचे फायदे जाणून घ्या,रासायनिक खतामुळे आपल्या जमिनीची जी धुप झाली असते ती धूप गांडूळ खत कमी करते,ज्याचा फायदा आपल्याला पिकामध्ये होते,तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शमता वाढते त्यामुळे आपली जमिन नेहमी थंड व हिरवीगार राहते,आणि गांडूळ हा प्राणी एक जमिनीमधिल आढळणारा प्राणी आहे आणि तो जमिनीमधील जैविक घटक खात असतो. गांडूळ खतामुळे आपली जमिन सुपीक राहते असे अनेक फायदे व बदल आपल्याला गांडूळ खता पासून पाहायला मिळतात. 

Leave a Comment