आजच्या जगात जर आपण पाहिलं तर नोकरीचे प्रमाण हे खूपच कमी होत चालला आहे त्यामुळे जो तरुण वर्ग आहे तो कुठे ना कुठेतरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत आहे त्यामुळे आज आपण एका अशा महिलेची माहिती पाहणार आहोत की ती महिला घरगुती व्यवसाय करून त्यातून एक चांगले एक ते दोन लाखाचे उत्पन्न घरबसल्या कमवत आहे.
महाराष्ट्र मधील सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्यात सुलभा कदम नावाची महिला एक घरगुती व्यवसाय करून प्रति दिवस पाच ते सहा हजार रुपये कमवते आणि हा जो व्यवसाय आहे तो शेतीपूरक व्यवसाय आहे त्यामुळे त्यांना कोणताही माल खरेदी करावा लागत नाही.सुलभा कदम व त्यांचे पती गेल्या 34 वर्षापासून शेती हा व्यवसाय करतात व त्यांची तब्बल 39 एकरच्या आसपास शेती आहे.सुलभा कदम यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे शेतामध्ये हरभरा,उडीद,तुरी,मुग अशी पिके होतात आणि त्या पिकांवर देखील सुलभा कदम ह्या प्रक्रिया करतात म्हणजेच त्याच्यातून त्यांच्या मील मध्ये डाळी तयार करतात असा उद्योग देखील ते 2011 पासून करत आहेत पण त्यामध्ये काय व्हायचं की मनुष्य संख्या ही जास्त लागायची त्यामुळे कामाचा त्रास त्यांना व्हायचा म्हणून त्यांनी कमी माणसे लागतील असा oil मिल हा व्यवसाय सुरू केला व त्यामध्ये त्यांनी यश देखील प्राप्त केलं.
सुलभा कदम ह्या एक महिला उद्योजक आहेत आणि त्यांच्या व्यवसायाची जर माहिती पाहिली तर त्यांच्या शेतामध्ये ज्या तेलबिया पिकतात म्हणजेच भूईमुगाच्या शेंगा, करडई, सूर्यफुल, किंवा नारळाची झाडे असतील ज्यामधून खोबरे तेल निघतं अशा सर्व तेल बियांच्या घटकापासून त्या त्यांच्या घरी तेल काढतात. जसं की सुलभा कदम यांचं पूर्वीपासून एक डाळ मिल आहे ज्यामध्ये ते डाळ तयार करतात पण त्या उद्योगासाठी मनुष्यबळाची संख्या जास्त लागत असल्या कारणामुळे सुलभाताईंनी एक नवीन उद्योग शोधण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना तेल निर्माण प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
जसे की आपण गिरणी मध्ये पीठ दळण्यासाठी जातो तसे त्यांच्याकडे लोक ही शेंगदाणे किंवा करडई घेऊन येतात आणि सुलभा ताई त्यांच्याकडून प्रति किलो दहा रुपये या भावाने त्यांनी आणलेल्या शेंगदाणे किंवा करडई मधून तेल काढून देतात. आणि सुलभाताईंच्या माहितीनुसार दिवसाला ते ऐंशी किलोच्या आसपास तेल काढून देतात. आणि ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांच्याकडे लाईट ही फक्त आठ तास असते त्यामुळे दररोज आठ क्विंटल च्या आसपास कमीत कमी त्यांचं क्रशिंग होतं. आणि दिवसभरात कमीत कमी आठ क्विंटलच्या आसपास ते तेल काढतात आणि प्रति किलो दहा रुपये या भावाने धरले तर एका क्विंटल मागे त्यांना हजार रुपये इतके भेटतात आणि त्या दिवसाला आठ क्विंटल क्रशिंग करतात म्हणजेच दिवसाला ते आठ हजार रुपये इतके कमावतात. यामध्ये जर लाईट बिल सुटले तर सात ते साडेसात हजार रुपये दिवसाला त्यांना नफा मिळतो. सुलभाताई म्हणतात की जर तुमच्या भागामध्ये लाईट जास्त वेळ टिकत असेल तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा देखील होऊ शकतो.
आता तुमच्या सर्वांच्या मनात एक प्रश्न आला असेल की जी लोक सुलभा कदम यांच्याकडून तेल बियांमधलं तेल काढून नेत आहेत. तर त्या लोकांना तेल काढून न्यायला परवडतं का अशी शंका तुमच्या मनात येत असेल तर सुलभा कदम सांगतात की शेतकरी हे त्यांच्या शेतामध्ये जी तेल बियाणे पिकतात ती तेल बियाणे घेऊन त्यांच्याकडे तेल काढण्यासाठी घेऊन येतात आणि प्रति किलो दहा रुपये अशा भावाने तेल काढून घेऊन जातात तर समजा एखाद्या शेतकऱ्याने चार किलो शेंगदाणे घेऊन सुलभाग कदम यांच्याकडे गेले तर त्या चार किलोच्या शेंगांचा भाव बाजारामध्ये पन्नास रुपये प्रति किलो इतका आहे तर एकूण 200 रुपये इथे लागणार आहेत. आणि तेल काढून घ्यायचे झाले चाळीस रुपये म्हणजे एकूण 240 रुपये इतके झाले. तरी या 240 रुपयांमधून त्या शेतकऱ्याला त्या शेंगदाणे मधून तीन किलो पेंड आणि एक किलो तेल हे मिळणार आहे. आणि आपण जर बाजारा प्रति किलो पेंडीचा भाव पाहिला तर चाळीस रुपये इतका आहे तर तीन किलो पेंडीचे रुपये झाले 120 आणि कोणतीही भेसळयुक्त तेल न वापरता त्यांना ओरिजनल तेल हे मिळणार आहे 120 रुपये किलो या भावाने. आणि हे 120 रुपये किलो या भावाने कोणतेही पाम तेल देखील मिळत नाही आणि त्यांना इथे प्युअर शेंगदाण्याचे तेल हे मिळत आहे त्यामुळे हे ते काढून घेण्यास कोणालाही परवडते.
सुलभा कदम यांनी उभारलेल्या या तेल प्रकरणांमध्ये कमी पैशात त्यांना जास्त उत्पादन होतं आणि त्याचा फायदा शेतकरी व इतर लोकांना देखील होतो कारण बाजारांमधील भेसळयुक्त तेल खरेदी करण्यापेक्षा एक ओरिजनल तेल आपल्याला इथे कमी दरात मिळते हे पाहून लोक देखील याच्याकडे आत्ता आकर्षित होत आहेत.आणि तयार झालेले तेल आपण गाळणीने गाळून एका किटलीमध्ये किंवा बाटलीमध्ये ठेवून असंख्य दिवस त्याचा वापर देखील करू शकतो असे सुलभा कदम ह्या म्हणतात आणि त्याचबरोबर त्यातील बियांमधून जी पेंड निघते ती देखील खूप चांगली व कडक अशी निघते जी जनावरांना खाण्यास एकदम योग्य पेंड अशी मानली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळतो की आपल्याकडे जे तेल मिळते ते तर भेसळयुक्त मिळतच पण त्याचबरोबर जी पेंड मिळते ती देखील एक उपयुक्त पेंड मिळते असा प्रतिसाद सुलभा कदम यांना खूप साऱ्या शेतकरी मित्रांकडून मिळाला आहे त्यामुळे या व्यवसायामध्ये त्यांना कधीच कोणतीही अडचण भासली नाही.
सुलभा कदम व त्यांचे पती गेल्या 34 वर्षापासून शेती हा व्यवसाय करतात व त्यांची तब्बल 39 एकरच्या आसपास शेती आहे त्यामध्ये ते करडई व इतर पिके घेतात आणि तयार झालेली करडईचे पीक त्याचे ते तेल काढून दहा हजार रुपये प्रति क्विंटल या भावाने ते तेल बाजारामध्ये विकतात यामधून देखील त्यांना चांगला फायदा होतो आणि त्याची पेंड 25 रुपये प्रति किलो या भावाने ते विकतात.
आपण हा व्यवसाय सुरु करू शकतो का
हा जो तेल काढण्याचा व्यवसाय आहे त्यासाठी एकही रुपयांचे भांडवल आपल्याला लागत नाही कारण की जो ग्राहक आहे तो स्वतः माल घेऊन येतो व आपल्याला फक्त त्या तेलबियांमधून तेल व पेंड काढून ग्राहकाला द्यायचे आहे व प्रति किलो दहा रुपये इतका भाव त्याचा घ्यायचा आहे.आणि या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रामाणिकपणा जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर आपण प्रामाणिक राहणे हे खूप गरजेचे आहे आणि या व्यवसायामध्ये देखील प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा आहे आपण जर ग्राहकाला समोरासमोर तेल काढून दिल्या तर ग्राहक पुन्हा आपल्याकडे येऊ शकतो कारण की त्याचा त्यावर विश्वास बसेल की आपण या तेलामध्ये कोणतीही बेसन करत नाहीत व त्याच्या मालाचे कोणतेही आपण नुकसान करत नाही त्यामुळे आपण हे काम पूर्णपणे प्रामाणिकपणे केलं पाहिजे ज्याचा फायदा आपल्याला व्यवसायात देखील होईल.आणि या उद्योगासाठी कोणतेही प्रकारचे मनुष्यबळ लागत नाही सगळं काम हे मशीन करत असते एका बटनावर आपण तेल काढू शकतो त्यामुळे यासाठी कोणत्याही मनुष्यबळाची गरज नाही.
Oil मिल प्लांट
आता जर तुम्हाला तेल काढणे हा प्लांट घ्यायचा असेल तर तुम्ही भारत टेक यांच्याशी ७३०४६१०९०९ या क्रमांकावर संपर्क साधून हा प्लांट घेऊ शकता किंवा याच्याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता बाजारामध्ये खूप प्रकारचे तेल काढणे हे प्लांट आहेत परंतु भारत टेक चा प्लांट हा खूप प्रसिद्ध आहे व यासाठी तुम्हाला कोणताही मेंटेनन्स चा खर्च येत नाही त्यामुळे चांगला प्लांट आहे.