नववी पास शेतकरी वर्षाला 11 कोटी  कमवतोय | gharguti vyavsay

शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावातील एक नववी पास शेतकरी, जो चंदन लागवड करून वर्षाला कोटी रुपयाचे उत्पन्न काढत आहे. त्या शेतकऱ्याचे नाव आहे राजेंद्र गाडेकर, तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने त्याच्या सपूर्ण 27 एकराच्या शेतीमाध्ये चंदनाची लागवड केली आहे, आणि राजेंद्र गाडेकर सांगतात की या 27 एकराच्या चंदन लागवडी शेती मधून त्यांनी आतापर्यंत 300 कोटीहून अधिक नफा हा झालेला आहे.

chandan lagwad

शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावातील एक नववी पास शेतकरी, जो चंदन लागवड करून वर्षाला कोटी रुपयाचे उत्पन्न काढत आहे. त्या शेतकऱ्याचे नाव आहे राजेंद्र गाडेकर, तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने त्याच्या सपूर्ण 27 एकराच्या शेतीमाध्ये चंदनाची लागवड केली आहे, आणि राजेंद्र गाडेकर सांगतात की या 27 एकराच्या चंदन लागवडी शेती मधून त्यांनी आतापर्यंत 300 कोटीहून अधिक नफा हा झालेला आहे.

राजेंद्र गाडेकर यांचा परिचय सांगायचं झालं तर त्यांना पहिल्यापासून शेतीपूरक व्यवसाय करायची आवड होती, त्यामुळे त्यांनी माध्यमिक नववीपर्यंत शिक्षण घेतले आणि घरात बसून शेती पूरक व्यवसाय कोणता केला जाईल यावर विचार केला सुरुवातीच्या काळात व्यवसाय बद्दल माहिती नसल्यामुळे त्यांनी त्यांची जी माळरान वरील जमीन होती त्यावर त्यांनी डाळिंब,आंबा, सिताफळ,आवळा यांची लागवड केली. या पिकांपासून देखील त्यांना वर्षाला चांगलं उत्पन्न मिळत होतं परंतु 2014 साली जो त्यांच्या भागात दुष्काळ पडला, ज्यामुळे त्यांचे झाडे उष्णतेमुळे जळून गेली आणि त्यांना तिथे नुकसान झाले, परंतु त्यांच्या शेतामध्ये थोडीफार चंदनाची जी झाडे होती ती दुष्काळात देखील हिरवीगार होती ते पाहून त्यांना चंदन लागवडीसाठी एक मार्ग मिळाला आणि तेव्हापासूनच त्यांनी चंदन लागवडीसाठी सुरुवात केली.

शेतकरी मित्रांनो राजेंद्र गाडेकर यांच्याकडे 27 एकरात जवळपास 12000 चंदनाची झाडे आहेत, राजेंद्र गाडेकर म्हणतात की चंदन हे एक असं रुक्ष आहे की ज्याला मागणी ही खूप जास्त असते व त्याच्या भाव देखील मागणीप्रमाणेच जास्त असतो त्यामुळे ह्या झाडाची लागवड केल्यानंतर ही झाडे चोरीला जाण्याची पण दाट शक्यता असते, त्यामुळे ते सांगतात की जेव्हा त्यांनी ही लागवड करण्यासाठी सुरुवात केली होती तेव्हा त्यांना घरच्यांसोबत आजूबाजूच्या लोकांचा देखील खूप विरोध होता तरीसुद्धा त्यांनी ही लागवड त्यांच्या शेतामध्ये केली आणि आजच्या घडीला चंदन लागवडी मध्ये त्यांनी स्वतःच एक वेगळं नाव निर्माण केल.

  • राजेंद्र गाडेकर माहिती देतात की चंदन हे परीजीव्य वृक्ष असल्यामुळे आपल्याला चंदना सोबत त्याच्या बाजूला अनेक प्रकारची वृक्ष ही लावावी लागतात, त्यामुळे जर तुम्ही चंदन लागवड करत असाल तर त्या प्रत्येक चंदनाच्या झाडाच्या आजूबाजूला तुम्हाला सीताफळ, आंबा अशा अनेक फळांची झाडे लावायची आहेत जेणेकरून तुम्हाला त्यामधून देखील एक चांगलं उत्पादन मिळेल व आपण पाहतच असाल की पावसाचे प्रमाण कमी जरी असेल तरी सिताफळीच,आंब्याच, लिंबाच झाड हे कधी ही मरत नसतं, आणि जास्त करून चंदन हे झाड कडुलिंबा वरती जगत ते त्यामुळे चंदनाच्या झाडाभोवती आपल्याला अशा प्रकारची झाडे लावायची आहेत, आणि तुम्ही प्रति एकर 410 झाडांची  लागवड घेऊ शकता, राजेश खाडेकरांचे एकूण 27 एकर मध्ये चंदनाची झाड आहेत त्यामध्ये चंदनाची झाडे ही 12000 झाडे आहेत आणि चंद्नाला जगवणारी जी भोवतीची झाडे आहेत, ती एकूण 45 हजार च्या आसपास 27 एकरात एकून लागवड आहे.
  • राजेश गाडेकरांनी 27 एकरात जी लागवड केली आहे ती लागवड तीन टप्प्यात केली आहे पहिल्या टप्प्यात त्यांनी पाच हजार रोपांची लागवड केली आहे आणि या पाच हजार रोपांचा अनुभव घेऊन त्यांनी बाकीची लागवड दोन टप्प्यात केली आहे.(ही लागवड करत असताना राजेश गाडेकर यांना अनेक लोकांचे मार्गदर्शन हे मिळालं ज्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा देखील भाग आहे, आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाने राजेश गाडेकर यांनी चंदन लागवड हा मोठा प्रकल्प उभा केला.)

चंदन लागवडीसाठी किती खर्च येतो

  • शेतकरी मित्रांनो जर आपल्याला चंदन लागवड करायची असेल तर याची बाग तयार करण्यासाठी आपल्याला शासनाकडून देखील अनुदान हे मिळते. ज्यामध्ये राष्ट्रीय आयुष्य अनुदान नवी दिल्ली आणि महाराष्ट्र फळबाग व औषदी अनुदान पुणे असे दोन प्रकारचे अनुदान हे आपल्याला मिळते. ज्यामध्ये आपल्याला चंदन लागवड करण्यासाठी हेक्टरी 58 हजार रुपये इतक्या अनुदान मिळते, त्यासोबत आपल्याला ड्रीप ला देखील अनुदान मिळते.
  • चंदन लागवड करत असताना आपल्याला दोन इतर फळांच्या झाडांच्या मध्ये आपल्याला दहा बाय दहाच्या अंतरावर एक चंदनाचे झाड लावायचा आहे.त्यामुळे आपल्याला चंदनाच्या लागवडीसाठी जास्त खर्च देखील करावा लागत नाही.

चंदन लागवडीसाठी शेत जमीन कशी पाहिजे

  • चंदन लागवडीसाठी आपल्याला हलक्या स्वरूपाची जमीन लागणार आहे. आणि  त्याबरोबर चंदनाच्या झाडाला पाण्याचे प्रमाण हे खूप कमी लागते त्यामुळे आपल्याला थोडीफार कमी पाण्याचे जमीन लागणार आहे.
  • लागवड करताना आपल्याला एक बाई दीड चा खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत, बुरशीजन्य पावडर व रोप लागवड करताना लागणाऱ्या खतांचा थोडाफार वापर करायचा आहे.
  • त्यानंतर झाडे थोडीफार मोठी झाल्यानंतर त्या झाडांच्या पानावरती आपल्याला काळी बुरशी पाहायला भेटते त्यामुळे आपल्याला तेव्हा एम 45 हे बुरशीनाशक मारायच आहे आणि यानंतर चंदन हे एक जंगली रुक्ष असल्यामुळे त्यावर इतर कोणतेही रोगाचा परिणाम होत नाही.
  • यानंतर जेव्हा चंदनाचे रोप  हे दोन वर्षाचं होतं त्यानंतर आपल्याला ते रोप एकूण चार वर्षाचे होईपर्यंत त्याची छाटणी करायची आहे.

राजेंद्र गाडेकर यांचं चंदन लागवडी मधून उत्पन्न

  • राजेंद्र गाडेकर सांगतात की त्यांना प्रति एकर अकरा कोटीच्या आसपास उत्पन्न हे होणार आहे, आणि त्यांची जी पाच हजार चंदनाची झाडे आहेत ती प्रति एकर 400 झाडे अशाप्रमाणे आहेत, आणि एकून सर्व झाडे बारा एकर मध्ये आहेत चंदन लागवडीनंतर चंदनाचे एक झाड विकायला काढण्यासाठी कमीत कमी 13 वर्षे लागतात, तर तेरा वर्षांनी जर एवढी झाडे त्यांनी विकली तर किमतीचा अंदाज तुम्ही आता लावू शकता.
  • शेतकरी मित्रांनो राजेंद्र गाडेकर सांगतात की जर चंदनाचा भाव आत्ताच्या घडीला जर पाहिला तर चोरीचा मालच अडीच हजार रुपये प्रति किलो या भावाने चोर त्यांच्याकडून घेतात, परंतु त्यांनी सर्व चंदन लागवड ही लीगल पद्धतीने कायद्यानुसार केली आहे त्यामुळे कायद्याने काम करत असताना केंद्र शासनाची एक मैसूर सॅंडल नावाची चंदन कंपनी ही कर्नाटक मध्ये आहे, आणि त्या ठिकाणी चंदनाच्या प्रति किलो गाभ्याची किंमत नऊ हजार चारशे रुपये इतकी आहे. आणि राजेंद्र गाडेकर म्हणतात की त्यांना तेरा वर्षानंतर एका झाडांमध्ये 28 ते 30 किलो इतका गाभा निघणार आहे, आणि समजा याच जर आपण प्रति झाडा मागे उत्पन्न काढलं तर 30 गुणिले 9400 गेले तर दोन लाख 70 हजाराच्या आसपास एक झाड हे जाणार आहे. आणि आपण जर एका एकर मध्ये पाहिलं तर 400 झाडे आहेत त्यामुळे दोन लाख 70 हजार गुणिले चारशे केल तर ही किंमत किती मोठी होईल हे तुम्हीच आता पाहू शकता ( आणि आपण जर पाहिलं तर दरवर्षी चंदनाचा भाव हा उंचावत चाललेला आहे त्यामुळे याचा फायदा पुढे जाऊन त्यांना अजून नक्कीच होईल.

Leave a Comment