गाय व म्हशीच्या शेणा पासून करता येणारा व्यवसाय, घरबसल्या कमी खर्चात चालणारा व्यवसाय

gharguti vyavsay in marathi

महाराष्ट्र व्यवसाय : मित्रांनो महाराष्ट्र मध्ये ग्रामीण भागात केले जाणारे व्यवसाय हे खूप कमी आहेत परंतु एखाद्या तरुणाने जर डोकं लावून स्वतःचा व्यवसाय ग्रामीण भागात सुरू केला तर तो व्यवसाय भविष्यात नक्कीच त्या तरुणाला ही यशस्वी बनवू शकतो त्यामुळे आज आपण अशा एका व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत जो तुम्ही ग्रामीण भागात अगदी कमी खर्चात केला जाणारा व शेती पूरक व्यवसाय असणार आहे

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये दुधाळ व्यवसाय हा खूप चांगला व्यवसाय आहे परंतु गाय व म्हशीच्या शेणाचा व्यवसाय तुम्ही खूपच कमी पाहिला असेल आपण गाय व म्हशीचे शेण हे फेकून देत असतो किंवा काही भागात त्याच्या जाळण्यासाठी गौर्या केल्या जातात परंतु जर त्याचा उपयोग आपण आपल्या व्यवसायात केला तर आपण नक्कीच त्या शेणापासून थोडेसे पैसे कमवू शकतो ते कसे तर..

गाय व म्हशीच्या शेणा पासून जर आपण अगरबत्ती किंवा धूप किंवा मच्छर मारण्याचे कॉइल तयार केले व ते बाजारात नेऊन अगदी स्वस्त दरात विकले, तर आपला व्यवसाय हा घरबसल्या चालू शकतो परंतु हा व्यवसाय कसा करायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर खालील पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय करू शकता

मित्रांनो गाय व म्हशीच्या सेना पासून जर तुम्ही एक मच्छर मारण्याचे कॉइल तयार केले जसे की तुम्ही वरील चित्रात पाहू शकता तर ते तुम्ही प्रति कॉइल 10 रुपयाला विकले तरी तुमचा व्यवसाय हा खूप चांगला चालेल,

ते कॉइल कसे तयार करायचे तर मित्रांनो तुमच्याकडे जर गाय व म्हशीचे शेण असेल तर तुम्हाला ते शेण घेऊन थोडासा कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे कडुलिंबाचा पाला हा तुम्हाला उन्हामध्ये 5 ते 6 दिवस वाळवून त्याची पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला झालेल्या पावडरीचे मिश्रण हे त्या शेणामध्ये करायचे आहे

यानंतर तुम्हाला शेणाची छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत व ते गोळे एका लाटण्याने लाटून चपाती सारखे लांब करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक कॉइल बनवनयासाठी डाय प्रेस मशीन घ्यावी लागे, ज्याखाली तुम्हाला ती शेणाची चपाती ठेवायची आहे व वरून ती मशीन प्रेस करून तुम्हाला कॉइल तयार करायची आहे, व ते एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवून विक्रीसाठी बाजारात न्यायचे आहे असं तुम्ही नैसर्गिक पद्धतीने मच्छर मारण्यासाठी कॉईल घरगुती तयार करू शकता व बाजारामध्ये अगदी स्वस्त दरात विकू शकता

तसेच तुम्ही गाय व म्हशीच्या शेणा पासून अगरबत्ती धुप यासारख्या वस्तू देखील बनवू शकता, त्यासाठी तुम्हाला उत्तम वासाची पावडर लागेल जी तुम्ही बाजारामध्ये कुठूनही आणू शकता त्या पावडरचे मिश्रण तुम्हाला शेणा मध्ये करावे लागेल व त्यानंतर अगरबत्तीचे साचे घेऊन त्यामध्ये अगरबत्ती तयार करावी लागेल अशा पद्धतीने देखील तुम्ही अगदी कमी भांडवलात एक शेतीपूरक व्यवसाय करू शकता

Leave a Comment