मित्रांनो नुकत्याच आलेल्या गुगल अपडेट मध्ये सांगितले गेले आहे की ऑनलाइन स्वरूपात होणाऱ्या फसवणुकीमुळे खूप सार्या लोकांचे नुकसान होते त्यामुळे गुगलने आता फेक गुगल अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये खूप सारे फेक गुगल अकाउंट गुगल द्वारे बंद करण्यात येणार आहेत
Google कोणाच ई-मेल अकाउंट बंद करणार
मित्रांनो गुगल एक डिसेंबर पासून सर्व फेक ई-मेल अकाउंट बंद करण्यास सुरुवात करणार आहे ज्यामध्ये खालील प्रकारचे अकाउंट गुगल द्वारे बंद करण्यात येते जर तुमच्या अकाउंट त्यामध्ये असेल तर तुम्ही आत्ताच काळजी घ्या
- सर्वप्रथम गुगल अशी अकाउंट बंद करणार आहे की जे अकाउंट मागील 2 वर्षापासून सुरू नाहीत किंवा ऍक्टिव्ह नाहीत अशी अकाउंट सर्वप्रथम गुगल बंद करणार आहेत
- नंतर गुगल अशी देखील अकाउंट बंद करणार आहे ज्या अकाउंटद्वारे ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा ऑनलाइन फ़्रॉड केले जातात
गुगल ने तुमचे ईमेल अकाउंट बंद केल्यावर काय होईल
जर गुगलने तुमचे ईमेल अकाउंट बंद केले तर सर्वप्रथम तुमच्या ईमेलवर असलेला सगळा डाटा डिलीट होऊन जाईल जसे की तुमचे जर गुगल ड्राईव्ह ला फोटो अपलोड असतील तर ते देखील डिलीट होऊन जातील व जेवढे तुमचे त्या ईमेल वरती डॉक्युमेंट्स किंवा मेल असतील ते सर्व डिलीट होतील
गुगल ईमेल अकाउंट बंद न होण्यासाठी काय करावे
मित्रांनो जर तुम्हाला तुमचे गुगल चे इमेल अकाउंट गुगल द्वारे बंद करायचे नसेल तर तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील
- सर्वप्रथम तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकून तुमच्या मोबाईल मध्ये लॉगिन करून घ्यायचं आहे त्यानंतरच तुमचे ईमेल हे गुगल बंद करू शकणार नाही
- ते ईमेल जर तुम्ही वापरत नसला तरी तुम्हाला दोन वर्षातून एकदा ते ईमेल तुमच्या मोबाईल मध्ये लॉगिन करून वापरायचे आहे जेणेकरून गुगलच्या निदर्शनात येईल की ही ईमेल आयडी ऍक्टिव्ह आहे