ग्रामसेवक पगार किती सपूर्ण माहिती | gramsevak salary

महाराष्ट्रा मध्ये प्रत्येक ग्रामीण भागातील गावाला एक ग्रामसेवक नेमलेला असतो आणि त्याची निवड महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती घेऊन करण्यात येते. तर मित्रांनो असंख्य विद्यार्थ्यांना हे माहीत नसते की ग्रामसेवकचा पगार किती आहे  तर खालील दिलेल्या संपूर्ण माहिती मध्ये आपल्याला कळून जाईल की ग्रामसेवकाचा पगार किती असतो ग्रामसेवक होण्यासाठी पात्रता,कागदपत्रे,शिक्षण,वय किती असायला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही खालील लेखात वाचू शकता.

gramsevak salary

ग्रामसेवकाचा पगार किती असतो

मित्रांनो ग्रामसेवकाचा पगार हा दोन पद्धतीमध्ये असतो जेव्हा ग्रामसेवक पदाची निवड केली जाते त्यामध्ये सुरुवातीचे तीन वर्ष निवड झालेल्या उमेदवारास प्रति महिना 5 ते 7 हजार रुपये या वेतनावरती सलग तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेस वरती काम करावे लागते आणि त्यानंतर तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ग्रामसेवकाला परमनंट केले जाते व तिथून त्या ग्रामसेवकाचा पगार 25 ते 30 हजार होतो व हा पगार पुढे जाऊन रिटायरमेंट पर्यंत 60 ते 70 पर्यन्त होतो.

ग्रामसेवकाचे काम काय असते

सर्वप्रथम मित्रांनो ग्रामसेवक हा राज्य शासनाचा नोकर आहे आणि त्याची निवड ही गाव पातळीवर ग्रामीण भागात काम करण्यासाठी झालेली असते.त्यामुळे गाव पातळीवर काम करण्यासाठी त्याच्या हाताखाली काही गावातील सदस्य नेमले जातात. जसेकी संगणक चालक, शिपाई,पाणी सोडणारा कर्मचारी असे तीन-चार व्यक्ती ग्रामसेवक सचिवा खाली काम करत असतात.

  • प्रत्येक गावामधून शासनाद्वारे काही कर आकारले जातात जसे की घरपट्टी,पानपट्टी आरोग्य कर, वीज कर अशी अनेक प्रकारची कर वसूली शासनाकडून केली जाते आणि हे कर वसूलन्याच काम ग्रामसेवक करत असतो
  • यानंतर ग्रामसेवकाचे दुसरे काम म्हणजे राज्य शासनाकडून जे ग्रामपंचायतीसाठी निधी येत असतात त्यांचा वापर गावच्या विकासासाठी करणे म्हणजेच गावामध्ये लोकांना पाण्याची सोय करणे असेल किंवा रस्त्याचे काम करणे असेल किंवा शाळा दुरुस्तीचे काम असेल अशी अनेक प्रकारची कामे आहे ही या निधीद्वारे ग्रामसेवक व सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांच्या मार्गदर्शनातून ग्रामसेवकाला करावी लागतात केले लागतात.
  • यानंतर ग्रामसेवकाचे तिसरे काम म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थांना नवीन सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेचे मार्गदर्शन करणे व त्या योजना त्या लोकांना राबवून देणे.
  • यानंतर ग्रामसेवकाचे चौथे काम म्हणजे गावा मधील ग्रामस्थांची जन्म व मृत्यूची नोंद, विवाह नोंद करणे व ते दाखले ग्रामस्थांना देणे तसेच रहिवासी दाखले लोकांना पुरवने असे काम करावे लागते.
  • एकंदरीत ग्रामसेवकाच काम हे गावाचा विकास करणे एवढेच आहे.

ग्रामसेवकाची बदली कशी केली जाते

मित्रांनो जर ग्रामसेवक हा गाव पातळीवर जाऊन काम करत नसेल किंवा गावातील प्रश्न सोडवत नसेल अशा कोणत्याही कारणामुळे ग्रामस्थांना जर तो ग्रामसेवक नको असेल तर ग्रामस्थ त्याची तक्रार करून बदली करू शकतात ग्रामसेवकाची बदली करण्यासाठी ग्रामस्थांना पंचायत समितीमध्ये जाऊन बीडीओ ( गटविकास अधिकाऱ्याला) तक्रार करावी लागते. आणि त्यानंतर त्या ग्रामसेवकाची बदली ही होत असते. आणि जर तालुका औट ग्रामसेवकाची बदली करायचे असेल तर ती बदली सीईओ करू शकतो. आणि समजा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली करायची असेल तर ती बदली सीईओ हा करू शकतो.

ग्रामसेवकाची प्रमोशन कोणती आहेत

असंख्य विद्यार्थ्यांना असा प्रश्न असतो की ग्रामसेवक पदावरती काम करत असताना ग्रामसेवकाचे अजून वरच्या पातळीवर प्रमोशन होतं की नाही तर उत्तर आहे हो होऊ शकते ग्रामसेवकाचे प्रमोशन हे ग्रामसेवक पदावरून ग्रामविकास अधिकारी या पदावर ती तुमचं पहिलं प्रमोशन होऊ शकतं आणि त्यानंतर दुसरे प्रमोशन हे विस्तार अधिकारी म्हणून होऊ शकतं, त्यानंतर चौथा प्रमोशन हे गटविकास अधिकारी पदासाठी होऊ शकत. अशाप्रकारे ग्रामसेवकाचे प्रमोशन हे होऊ शकतं परंतु हे प्रमोशन होण्यास खूप वेळ लागतो.

ग्रामसेवक कसे बनायचे

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद च्या अंतर्गत ग्रामसेवक भरती राबवली जाते त्या भरतीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून एक लेखी स्वरूपाची परीक्षा देऊन जर तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर तुमची ग्रामसेवक या पदासाठी तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेस वरती निवड करण्यात येते आणि त्यानंतर तुम्हाला ग्रामसेवकासाठी परमनंट केले जाते.

ग्रामसेवक पद पात्रता

  • विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमचे शिक्षण हे बारावी पास असणे गरजेचे आहे आणि बारावी मध्ये तुम्हाला 60% किंवा 60% पेक्षा अधिक गुण पाहिजेत तेव्हाच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता
  • आणि जर तुमची पदवी झाली असेल म्हणजेच 15 वी पर्यंत शिक्षण झाले असेल, ते शिक्षण मुक्त विद्यापीठातील असू देत किंवा विद्यापीठातील असू देत कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल तरी देखील सुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता
FAQ
ग्रामसेवक पदासाठी किती वय लागते

विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी तुमचे वय हे 18 ते 32 च्या आतमध्ये असायला हवे तरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

ग्रामसेवक पदासाठी कागदपत्रे कोणती लागतात

विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड,दहावी बारावी मार्कशीट, पदवीधर असल्यास पदवीधर मार्कशीट, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल असल्याचा दाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी व सई अशी सर्व कागदपत्र तुम्हाला ग्रामसेवक अर्ज करण्यासाठी लागणार आहेत

Leave a Comment