हळद करेल सर्व शेतातील रोगांवर्ती नियंत्रण | हळदीचे फायदे

शेतकरी मित्रांनो शेतकरी हा दरवर्षी त्याच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेत असतो आणि घेतलेल्या पिकाचा किडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्याला वेगवेगळी खते व औषधे बाजारामधून विकत घ्यावी लागतात आणि त्यासाठी शेतकऱ्याला खुप प्रमाणात खर्च करावा लागतो. जेवढे त्याला त्या पिकांमधून उत्पादन होते त्याच्यापेक्षा जास्त तर त्याचा खर्च हा खतांसाठी व औषधांसाठी झालेला असतो त्यामुळे आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत की अगदी कमी खर्चात आपण आपल्या पिकावर होणारे बुरशीचे अटॅक किंवा इतर किडींची अटॅक आपण न होण्यापासून टाळू शकतो.

संपूर्ण जगभरात अनेक कृषी शास्त्रज्ञ गेल्या आठ ते दहा वर्षात संशोधन करत आहेत की कसा केमिकल चा वापर न करता शेतकऱ्याला योग्य प्रकारे शेती करता येईल ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि त्यांचे उत्पादन पण वाढण्यास मदत होईल आणि एक ऑरगॅनिक पद्धतीने अगदी शून्य रुपयाच्या खर्चात बिना केमिकल शेती कशी करता येईल यावर खूप सारे शास्त्रज्ञ हे संशोधन करत आहेत परंतु आता या संशोधनात ब्राझील या देशाने बाजी मारली आहे म्हणजेच की ब्राझील मधील शास्त्रज्ञांनी शेतीसाठी असा एक शोध लावलेला आहे की तो पदार्थ वापरल्याने शेतीमधील 90% हा खर्च कमी होणार आहे. एक अशी गोष्ट की जी प्रत्येकाच्या घरात असते आणि त्या गोष्टीचा वापर करून शेतीमध्ये तुमच्या कीटकनाशकावरचा खर्च हा कमी होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं उत्पादन वाढण्यास देखील मदत होणार आहे असा मोठा शोधा या शास्त्रज्ञांनी लावला आहे. हा अभ्यास करत असताना जेव्हा शास्त्रज्ञांनी जंगलामधील झाडे पाहिली तर तेव्हा त्यांना कळले की जेव्हा जंगलातील झाडांना मोठ्या प्रमाणात फळे येतात तेव्हा त्यांना कधीही कीटकनाशके किंवा कीड लागत नाही असे का होत असेल बरं आपण कधीही त्यांना कोणतेही टॉनिक मारत नाही किंवा कधी कोणते औषध किंवा खत मारत नाही तरीही त्या फळांना कीड लागत नाही. किंवा जंगलामधील आपण कोणतेही वनस्पतीच जर एक पान विज्ञान लब मध्ये नेलं तर त्यामध्ये आवश्यक असणारे सगळे घटक आढळून येतात तरी या सर्व गोष्टींचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांनी त्यावर असा उपाय काढला की एका मसाल्याच्या पदार्थापासून त्यांनी शेतीचा खर्च कमी करण्याचे ठरवले त्या पदार्थामुळे कीटकनाशक, बुरशीनाशक टॉनिक किंवा खत यांची गरज आता आता भासणार नाही. त्यामुळे सर्वांच्या घरी उपलब्ध असणारी हळद यापासून आपण शेतीसाठी लागणारा अर्ध्याहुन जास्त खर्च हा वाचवणार आहोत.

  • शेतकरी मित्रांनो जसेकी माणसाच्या आरोग्यासाठी हळदी या पदार्था सारखा दुसरा पदार्थ नाही तसेच आत्ता शेतीसाठी सुद्धा हळद हा पदार्थ एक उपयुक्त ठरणार आहे असा ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. आता तुमच्या सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की हळदी या पदार्थापासून कसं काय शेतकऱ्याचे उत्पादन वाढू शकतं आणि पिकातील कीड मारण्यास हळद कशी काय मदत करते.
  • तर शास्त्रज्ञ जेव्हा खूप साऱ्या वनस्पतींचा अभ्यास करत होते तर तेव्हा त्यांना असे लक्षात आले की कोणत्याही वनस्पतीला औषध किंवा खत मारण्याची गरज भासत नसते. शास्त्रज्ञ म्हणतात की खूप सारे शेतकरी हे जेव्हा त्यांच्या पिकावर कीड लागण्यास किंवा बुरशी येण्यास सुरुवात होते तेव्हा ते अनेक प्रकारची औषधेही त्यावर मारण्यास सुरुवात करतात, परंतु शास्त्रज्ञ म्हणतात की निसर्गाने प्रत्येक वनस्पतीच्या अंगात अशी रसायने दिलेली असतात की ती रसायने त्या किडीवर मात करू शकतात.
  • त्यामुळे शास्त्रज्ञांना हळदीमध्ये R टर्मिनॉन नावाच एक असं केमिकल सापडलेल आहे, हे जे केमिकल आहे ते अगदी काही ग्रॅम मध्ये आपल्या पूर्ण पिकाची विविध प्रकारच्या किडी किंवा बुरशी  ही नष्ट करू शकते.

रोगांवर्ती नियंत्रण ठेवण्यासाठी हळद रसायन कसे तयार करायचे

  • आता पण पाहूया की आपण हे हळदीच केमिकल रसायन कसं तयार करायचं, तरी हे रसायन तयार करण्यासाठी आपल्याला हळद लागणार आहे तर 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम हळद मिक्स करून त्याची फवारणी आपल्याला पिकावर करायची आहे फवारणी कशी करायची यासाठी तुम्ही युट्युबवरती अनेक शेतकऱ्यांनी व्हिडिओ बनवले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता.
  • काही शहरातील लोकांनी तर त्यांच्या कुंड्यांमध्ये म्हणजेच एक किलो मातीत दहा ग्रॅम हळद मिक्स करून त्या कुंड्यांमध्ये झाडेही लावली आहेत.

हेच नाही तर आपल्या धान्यांना जी कीड लागते त्या किडे वर देखील हळदी मात करू शकते असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेले आहेत याबाबत तुम्हाला युट्युब वर माहिती मिळेलयाच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी अधिकाऱ्याचा सल्ला देखील घेऊ शकता.

Leave a Comment