जावई म्हणजे तुमचा दुसरा मुलगा व तुमच्या मुलीच्या आयुष्यातील साथीदार म्हणजे तिचा नवरा तोच तुमचा जावई त्याच तुमच्या जावयाला वाढदिवसाच्या खाली काही शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्की तुमच्या जावयाला शेअर करा

- “एका फुलपाखराप्रमाणे तुम्ही आमच्या बागेत आलात, आणि आता बागच नव्हे तर आमचं संपूर्ण आयुष्य तुमच्या प्रेमाने फुलवून टाकलंत. आज तुमचा वाढदिवस वाढदिवसाच्या तुम्हाला अनंत शुभेच्छा, प्रिय जावई!”
- मुलीच्या डोळ्यांत जेव्हा तुमच्यासाठी प्रेम पाहतो, तेव्हा देवाचे आभार मानतो. तिच्या हसण्यात तुमचं सर्वस्व दिसतं. तिच्या आनंदात तुमचं प्रेम जाणवतं. असंच कायम तुमच्या दोघात प्रेम राहो व आज तुमचा वाढदिवस त्यामुळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “पावसानंतरच्या इंद्रधनुष्यासारखे तुम्ही आमच्या कुटुंबात रंग भरलेत. आमच्या घरातल्या रिकाम्या भिंतींना तुमच्या स्पर्शाने जीवन मिळालं. आणि आम्हाला मुलाच्या रूपात आम्हाला जावई मिळाले हेच आमचे भाग्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जावईबापू
- “ जसे रात्रीचा चंद्र अंदर दूर करतो तसंच आमच्या आयुष्यातील संकटे आमचा जावई दूर करतो असत्या प्रिय जावयाचा वाढदिवस ” त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
- “मुलीच्या हातात तुमचा हात ठेवताना आमचे डोळे पाणावले होते. आज तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचे अश्रू आनंदाचे झाले . वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावईबापू !”
- “ कुठल्याच शब्दांमध्ये तुमचं महत्त्व सांगता येणार नाही, कुठल्याही कवितेत तुमच्यावरचं प्रेम मावणार नाही. तुम्ही आमच्या घराचा अनमोल हिरा आहात, ज्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- ” शब्दांना जेव्हा भावनांचे पंख फुटतात, तेव्हा ते तुमच्यासारख्या जावयाचं वर्णन करू शकतात. आकाशातल्या चांदण्यांसारखे तुम्ही आमच्या आयुष्याला प्रकाशित करता. चंद्रासारखं तेजस्वी तुमचा मन आहे आणि आज तुमचा वाढदिवस तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “कन्येसाठी जीवनसाथी, आमच्यासाठी विश्वासाचा आधार. पत्नीसाठी जीवनाचा दीप, आमच्यासाठी घराचा मानबिंदू. आजच्या दिवशी आमच्या जावयाचा वाढदिवस तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “जेव्हा तुम्ही आमच्या दारात पाऊल ठेवलंत, तेव्हा आमच्या घरात सूर्य उगवला. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा आमचं मन प्रफुल्लित होतं, जेव्हा तुमचे विचार ऐकतो तेव्हा ज्ञान वाढतं. आणि जेव्हा तुमचा स्वभाव पाहतो तर तुमच्यावर अजून प्रेम वाढते आणि आज तुमचा वाढदिवस त्यामुळे वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
- “आयुष्याच्या वादळात तुम्ही स्थिर किनारा आहात, दुःखाच्या अंधारात तुम्ही टिमटिमता दिवा आहात. जावई नव्हे, तुम्ही आमच्या हृदयाचा एक तुकडा आहात. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई
- “सागरासारखं विशाल मन आणि हिमालयासारखी उंच माणुसकी असलेल्या आमच्या जावईराजांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आणि तुमचा आयुष्य असत हसत खेळत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”
- “आयुष्याचे सूर तुमच्या हातात सुरक्षित आहेत, कुटुंबाचा गाडा तुमच्या खांद्यावर सहज चालतो. देव तुम्हाला शतायुषी करो, बळ देवो, पावलोपावली तुम्हाला यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई
- ” तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाला एकच प्रार्थना, तुमचे आयुष्य असो मधुमय सारे. कोणत्याही संकटांचे वादळ येवो ना, सुखाचे दिवे सदैव तेवत राहो तुमच्या दारे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “चंद्राच्या प्रकाशाएवढं शीतल मन तुमचं, सूर्याच्या तेजाएवढं उज्ज्वल जीवन तुमचं. आकाशाच्या विस्ताराएवढं मोठं यश मिळो तुम्हाला, आणि समुद्राच्या खोलीएवढी प्रेमळ माणुसकी राहो तुमच्यात! न संपणार तुमचा आयुष्य राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जावई!”
- “तुमच्या प्रत्येक श्वासात असो आयुष्याचा आनंद, प्रत्येक क्षणात अनुभवा जीवनाचा छंद. कधीही न संपणारे आरोग्य आणि समृद्धी मिळो, जीवनभर तुमच्यावर कृपादृष्टी देवाची राहो. आणि तुमची साथ आम्हाला कायम मिळो अशी प्रार्थना करतो व तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जावई !”
- “जेव्हा तुम्ही जन्मलात, तेव्हा आकाशातल्या चांदण्यांनी आपला प्रकाश तुम्हाला दिला असावा. म्हणूनच तुमच्या व्यक्तिमत्वात असा प्रकाश आहे. तुमच्या एवढा चांगला माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला व आज त्याच चांगल्या माणसाचा वाढदिवस तर तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा जावई !”
- “जावईराजा, तुमचं मन मंदिर असो, तुमची वाणी वेदवाणी असो. तुमच्या हातात यशाची सूत्रे असो, आणि आयुष्यात सुखसमृद्धीची वर्षा होवो. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- जावई तुम्ही कुटुंबाचा आधार आहात, मुलीच्या आयुष्याचा दागिना आहात. देव करो तुमचं आयुष्य सुखमय जावो, आणि प्रत्येक पाऊल यशाकडे वाटचाल करो. आयुष्यात तुम्हाला कायम प्रगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “ सगळ्यांसोबत मन मोकळ्या स्वभावाने राहणाऱ्या सगळ्यात मिसळून राहणाऱ्या आमच्या प्रिय जावयाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
- “प्रत्येक नव्या दिवसासोबत नवा आनंद तुम्हाला मिळो. प्रत्येक नव्या क्षणासोबत नवी उर्जा तुमच्यात भरो. वाढदिवसाच्या अमृतमय शुभेच्छा!”
- “आमच्या घराचा राजबिंदू तुम्ही आहात, कन्येच्या डोळ्यांतलं स्वप्न तुम्ही आहात. जावयाच्या रुपात मुलगा मिळाला आम्हाला, म्हणूनच आम्ही देवाकडे सदैव कृतज्ञ आहोत तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जावई!”
- “जेव्हा तुम्ही आमच्या दारात उभे राहिलात, तेव्हा वाटलं देवच दारात उभा आहे. जीवनातील सर्वश्रेष्ठ वरदान म्हणून तुम्हाला जावई म्हणता येतंय याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आज तुमचा वाढदिवस आहे त्याचा मला खूप आनंद आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावईबापू !”
- “सुगंधी फुलांचा ताजा हार गुंफून तुमच्या वाढदिवसास अर्पण करतो. आमच्या अंतःकरणातील शुद्ध स्नेह या शब्दांतून व्यक्त करतो. की तुमच्या सारखा व्यक्ती आमच्या कुटुंबातला हेच आमचे मोठे भाग्य आहे आणि आज तुमचा वाढदिवस त्यामुळे वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख मनापासून शुभेच्छा जावई !”
- फुलं जशी मंदिराला शोभा देतात. तशी तुमची साथ आमच्या कुटुंबाला शोभा देते. दिव्याचा प्रकाश जसा अंधार दूर करतो, तसे तुमचे अस्तित्व आमचे दुःख दूर करतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशीच साथ तुमची आमच्या सोबत राहो व तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो जावई !”
- “शब्दांचा साज सजवून भावनांचे दीप लावून प्रेमाचा हार गुंफून आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आमच्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा देतो जावई
- “जावई म्हणजे कुटुंबाचा चंदेरी तारा, ज्याच्या प्रकाशाने उजळतो संपूर्ण दारा. आज तुमच्या जन्मदिनाला आम्ही देवापाशी मागतो, तुमच्या आयुष्याचा प्रत्येक पल असो न्यारा. प्रार्थना करतो देवाकडे सुखाचं व खूप सार आयुष्य लाभो तुम्हाला व आजच्या दिवशी तुमचा वाढदिवस त्यामुळे वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा जावई
- “आकाशात चांदणं एकच असतं, कळ्यांच्या बागेत फूल एकच उमलतं. तसेच आमच्या कुटुंबात जावई एकच असतो, ज्याच्या संस्काराने सारे घर फुलून जातं. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई !”
- “सावली जशी साथ देते उन्हात, तसे तुम्ही सोबत आहात आमच्या जीवनात. तुमच्या हसण्यातला आनंद असाच राहू द्या, आणि डोळ्यांतले स्वप्न पूर्ण होऊ द्या. हीच देवाकडे प्रार्थना करतो व आजच्या दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जावई !”
- “आयुष्य हे पुस्तक आहे, तुम्ही त्यातील सर्वोत्तम पान आहात. कुटुंब हे मंदिर आहे, तुम्ही त्यातील देवता आहात. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “जावई म्हणजे कधी मित्र, कधी मार्गदर्शक, कधी सल्लागार, तर कधी भाऊच वाटता तुम्ही. अशा अनेक नात्यांनी बांधले आहात आम्हाला, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “पावसातल्या पहिल्या थेंबासारखा तुमचा स्पर्श आमच्या कुटुंबाला लागला, उन्हाळ्यातल्या छायेसारखा तुमचा आधार आमच्या कन्येला लाभला. आणि तुम्हाला पाहून आम्हाला थोडा आधार आला आज तुमचा वाढदिवस त्यामुळे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “शब्द जसे मनातलं सांगतात, फुलं जशी प्रेम दर्शवतात, तसेच ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आमचं अंतःकरण दाखवतात. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई !”
- “सरस्वतीचं वरदान तुमच्या वाणीला, लक्ष्मीचा वास तुमच्या कार्यांना, गणेशाचा बुद्धिचातुर्य तुमच्या विचारांना, आणि हनुमानाचं बळ तुमच्या निर्णयांना. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय जावयाला !”
- “तुम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलात, मनात विचार होता हाच वर असेल कन्येसाठी. आज तुम्ही जे आहात त्यापेक्षा अधिक चांगला वर शोधणे अशक्य वाटते आम्हाला. मी आज तुमचा वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जावई बापू!”
- “आकाशाचा विस्तार मोजता येत नाही, सागराची खोली ठरवता येत नाही. तसेच जावई म्हणून तुमचं महत्त्व शब्दांत व्यक्त करता येत नाही. अशा प्रिय जावयाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ”
- “चंद्र जसा पौर्णिमेला पूर्ण असतो, सूर्य जसा मध्यान्हीला तेजस्वी असतो, तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाचे पूर्णत्व आणि तेज आहात. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “मंत्रांना जसं यज्ञकुंडाची साथ लागते, दीपाला जसं तेलाची गरज असते, तसेच आमच्या कुटुंबाला तुमच्यासारख्या जावयाची साथ लागते. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “वडाच्या झाडासारखी विशाल छाया तुमची, मंजुळ स्वरासारखी मधुर वाणी तुमची, विशाल सागरासारखे उदार मन तुमचे, म्हणूनच आम्ही भाग्यवान आहोत तुमच्यामुळे आमचं कुटुंब भरलं. आणि त्याच कुटुंबातील आज प्रिय जावयाचा वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!”
- “कवितेच्या ओळी सजवून, भावनांचे मोती गुंफून, आम्ही पाठवतो तुम्हाला आज तुमचा वाढदिवस वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई !”
- “तुमचे विचार उंच हिमालयासारखे, तुमचे बोल मधुर पावसासारखे, तुमचे मन निर्मळ गंगेसारखे, म्हणूनच तुम्ही आमच्यासाठी अमूल्य आहात एखाद्या देवासारखे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “पहिल्या वेळेस जावई म्हणून तुमचा वाढदिवस साजरा करताना अंतःकरण भरून येतं आनंदाने. तुमचे सारे दिवस मंगलमय जावोत, हीच प्रार्थना आमची देवाकडे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून तुमच्याकडे जावई!”
- “जावई झाल्यानंतरचा हा पहिला वाढदिवस, म्हणून अधिकच स्पेशल आहे आमच्यासाठी. आजपासून तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचा प्रवाह वाहत राहो, ईश्वर तुम्हाला खूप आयुष्य देत राहो हीच प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो जावई !”
- “ खूप वर्षे झाली तुम्ही आमच्या घरात येऊन, पण अजूनही जावई नव्हे तर मुलगाच वाटता. आणि आज आमच्या मुलासारख्या जावयाचा वाढदिवस हा विशेष वाढदिवस तुमच्यासाठी सुखाचा असो, आणि येणारी अनेक वर्षे अशीच गोड असोत. ही देवाकडे प्रार्थना करतो व तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या कुटुंबाकडून लाख लाख शुभेच्छा देतो जावईबापू!”
- “लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी वाढदिवस साजरा होतोय. हे क्षण आम्ही कायम लक्षात ठेवू. तुमच्या आयुष्यात अशीच हजारो आनंदी वर्षे येवोत. ही देवाकडे सदैव प्रयत्न करतो व वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो जावईबापू !”
- “दूरदेशी राहूनही आमच्या मनात तुमच्यासाठी जागा कायम आहे. अंतर असले तरी अंतःकरणात तुमचे स्थान अठळ आहे. या वाढदिवशी आमची विशेष प्रार्थना, तुम्हाला भेटण्याची संधी लवकरच मिळावी. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या घरात तुम्ही जावई म्हणून प्रवेश केला. आज तुमचा वाढदिवस साजरा करताना वाटतंय जणू काल परवाची गोष्ट आहे. या सुवर्ण क्षणांच्या साक्षीनं मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जावई!”
- “नातवंडांच्या गळ्यात बसून बाबा झालेल्या जावईराजांना वाढदिवसाच्या ह्रदयस्पर्शी शुभेच्छा देतो! तुमच्यासारखे बाबा मिळणे हे नातवंडांचेही भाग्य आहे. अनेक पिढ्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत असोत !”
- “पन्नास वर्षांचा टप्पा गाठताना तुमच्या चेहऱ्यावरचे तेज अजूनही तसेच आहे. आमच्या कन्येचा सुखसंसार तुम्ही जपला, आणि आमच्या कुटुंबाचा मान वाढवला. या वाढदिवसानिमित्त तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- “आज आम्ही सारे भावंडे एकत्र जमलो आहोत तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. आमच्या बहिणीचे आयुष्य तुम्ही फुलवले, म्हणूनच तुम्हाला भावाचं स्थान आमच्या मनात आहे. आणि आज तुमचा वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही सर्व जण खुश आहोत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जावई!”
- आज आमच्या कुटुंबातील एका प्रमुख व्यक्तीचा वाढदिवस तो म्हणजे आमच्या जावयाचा वाढदिवस तर आमच्या कुटुंबाकडून आमच्या जावयाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आमच्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो!”
टॉप 100 बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा