Honda sp 125 : होंडा एसपी 125 ही नुकतीच होंडा कंपनीने सादर केलेली बाईक आहे | जी हल्ली भारतामध्ये खूप प्रसिद्ध होत चालली आहे व या बाईक ची मागणी खूप वाढत चालली आहे त्यामुळे होंडा मोटरकॉर्प आत्ता अजून खूप अशा बाईकचे उत्पादन करणार आहे व हे उत्पादन विक्रीसाठी जानेवारी 2024 ला येणार आहे ज्यासाठी होंडा कंपनी उत्तम EMI PLAN देणार आहे.
होंडा एसपी 125 या मोटार सायकलच माइलेज जर आपण पाहिलं तर ही बाईक टीव्हीएस कंपनीच्या टीव्हीएस रेडर 125 बाईकच्या अधिक माइलेज देते तसेच ही बाईक महाराष्ट्र मध्ये 1,00,521 किमतीत ग्राहकांसाठी सादर झाली आहे परंतु या बाईची ऑन रोड किंमत ही महाराष्ट्रा मध्ये 1,05,487 इतकी आहे
होंडा एसपी 125 या बाईकची एवढी किंमत असण्याचे कारण म्हणजे या गाडीला 70 किलोमीटर पर लिटर इतके चांगले मायलेज आहे ज्यामुळे ग्राहकांची या बाईक साठी खरेदी ही वाढली आहे, तसेच या बाईकचे वजन हे 116 किलोग्रॅम इतके आहे व या बाईकला 11.2 लिटरची पेट्रोल टाकी बसवली आहे
Honda SP 125 किती हप्ता बसेल
होंडा एसपी 125 ला घेण्यासाठी तुमच्या जवळ कमीत कमी 20 हजार रुपये असायला हवेत, जर तुम्ही सुरुवातीला 20 हजार डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 12% व्याज 2,900 रुपये महिना हफ्ता बसेल