मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल आणि दैनंदिन जीवनात शेती करत असताना शेतीसाठी लागणारी खते, औषधे, बियाने, किटकनाशके अश्या वस्तूंसाठी जर दुकानदाराकडून तुमची फसवणूक होत असेल तर आता काळजी करायची काहीच गरज नाही कारण आत्ता सरकारच्या नियमानुसार जर शेतकऱ्यावर कोणताही दुकानदार फसवणूक करत असेल तर त्याच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येणार आहे या संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही खालील दिलेला लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहतच असाल की जेव्हा लागवडीचा किंवा पेरणीचा खरीप हंगाम सुरु होतो तेव्हा बाजारा मध्ये जेव्हा शेतकरी शेती सम्बंधित वस्तु किंवा औषधे खरेदी करतो तेव्हा शेतकऱ्याची दुकानदारा कडून खुप प्रमाणात लुटमार होत असते. त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी सरकारने आता शेतकऱ्यासाठी एक नवीन कायदा आणला आहे
शेतकऱ्याने तक्रार कुठे नोंदवली पाहिजे
शेतकरी मित्रांनो जेव्हा लागवडीचा खरीप हंगाम येतो तेव्हा आपण बाजारामध्ये पाहतो की व्यापाऱ्यांकडून किंवा दुकानदाराकडून शेतीविषयक बियाणे,खते, कीटकनाशके इत्यादी असंख्य प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीवर खूप प्रमाणात लुटमार केली जाते यामधून शेतकऱ्याचे खूप प्रमाणात नुकसान होत असते असे तुमच्या बरोबर देखील खूप वेळा घडले असेल.
परंतु जर इथून पुढे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमची जर व्यापाऱ्याकडून लुटमार होत असेल तर तुम्ही त्या संबंधित तक्रार ही निवारण समिती, कृषी विभाग कार्यालय किंवा भरारी पथकाकडे जाऊन करू शकता.
शेतकरी कोणत्या प्रकारची करार नोंदवू शकतो
शेतकरी मित्रांनो तुमची व्यापाऱ्याकडून लुटमार न होण्यासाठी व घुसखोरीला कुठेतरी आळा बसण्यासाठी तुम्ही निवारण समिती, कृषी विभाग कार्यालय किंवा भरारी पथकाकडे जाऊन तुम्हाला एक अर्ज करावा लागेल त्या अर्जामध्ये तुम्हाला अशी तक्रार करावी लागेल
शेतीच्या मशागतीसाठी व पेरणीसाठी व्यापाऱ्याकडून खते बियाणे कीटकनाशके ही घेतली होती परंतु या खतामध्ये,औषधामध्ये व कीटकनाशकांमध्ये असंख्य प्रकारची भेसळ केलेली आहे तसेच या सर्व वस्तूंची किंमत ही शासकीय दरापेक्षा अधिक किमतीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिली आहे त्यामुळे या भेसळयुक्त औषधांना खताना आळा बसून शेतकऱ्याच यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान न होण्यासाठी या व्यापाऱ्यावरती तुम्ही कठोरपणे कारवाई करा असा अर्ज तुम्हाला करून तो अर्ज तुम्हाला निवारण समिती, कृषी विभाग कार्यालय किंवा भरारी पथकाकडे या ठिकाणी द्यावा लागेल त्यानंतर संबंधित अधिकार्याकडून त्या व्यापाऱ्यावरती किंवा दुकानदारावरती कठोरपणे कारवाई करण्यात येईल.
तक्रार करण्यासाठी कोणती माहिती व कागदपत्रे द्यावी
शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्यापाऱ्याची तक्रार करायची असेल तर तुम्हाला तक्रार करण्यासाठी एक अर्ज करावा लागतो त्यानंतर त्या अर्ज सोबत तुम्हाला फसवणूक केलेल्या बियाणे कधी किंवा कीटकनाशकांच्या औषधांची पावती जोडावी लागते व हे सर्व जोडून तुम्हाला ते निवारण समिती, कृषी विभाग कार्यालय किंवा भरारी पथकाकडे द्यावे लागते
अशाप्रकारे तुम्ही व्यापाऱ्याचे किंवा एखाद्या दुकानदाराची जर त्याच्याकडून तुमची फसवणूक झाली असेल तर अशी तक्रार तुम्ही करू शकता व यावर आळा घालू शकता.
शेतकऱ्याच्या फायद्यासाठी
हे पण वाचा : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी कर्ज देणारी योजना