IPL 2024 : आयपीएल 2024 साठी नुकताच दुबई मध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला त्यामध्ये सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू मिचेल स्टार्क बनला व त्याचे पूर्ण विश्व भरात नाव झाले की आयपीएल लिलावामध्ये आजपर्यंतचा सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू म्हणून, परंतु तुम्हाला माहित आहे का हार्दिक पांड्या सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू ठरला आहे ज्याचे इथून पुढे कोणीही रेकॉर्ड मोडू शकत नाही. ते कसे तर पहा…
हार्दिक पांड्या आयपीएल संघात गुजरात टायटन्स या संघाचा कर्णधार म्हणून ओळखला जायचे ज्या कर्जमाफीदारांनी गुजरात संघाला एक आयपीएलचे चषक देखील मिळवून दिले आहे जिंकून दिले आहे, हार्दिक आयपीएलचा काल पाहिला तर सुरुवातीपासून हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्स या संगम कडून खेळत होता,परंतु 2021 मध्ये आयपीएल मध्ये दोन नवीन संघ बनवण्यात आले जे म्हणजे गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जेंट्स ज्यामध्ये गुजरात टायटन संघाच्या कर्णधार हा हार्दिक पांड्या करण्यात आला व लखनऊचा कर्णधार हा के एल राहुल करण्यात आला…
परंतु आयपीएल 2024 मध्ये असे काही झाले की हार्दिक पांड्या थेट मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला, याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून देखील हार्दिक पांड्याला बनवण्यात आले यावर असंख्य रोहित शर्माच्या चाहत्यांनी सोशल मीडिया वरती हार्दिक पांड्याला ट्रोल केले, परंतु अजूनही यावर हार्दिक पांड्या व रोहित शर्माचे कोणते प्रतिउत्तर बाहेर आले नाही..
परंतु हार्दिक पांड्या ला मुंबई इंडियन्स या संघामध्ये पुन्हा दाखल करण्यासाठी अवघे 115 कोटी रुपये लागले ते कसे तर पंधरा कोटी हे हार्दिक पांड्याला ट्रेड स्वरूपात मुंबई इंडियन संघात दाखल करण्यासाठी लागले व बाकी 100 कोटी हे गुजरात टायटन्स ला द्यावी लागली ते म्हणजे गुजरात आयटम्स ने हा खेळाडू कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं होतं त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट हे संपले नव्हते त्यामुळे गुजरातने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाला देण्यासाठी 100 कोटींचा व्यवहार केला
त्यामुळे यावर्षी सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू हा हार्दिक पांड्या ठरला आहे. आता सर्व क्रिकेट प्रेमींच्या मनात एकच शंका पडली आहे की हा व्यवहार मुंबई इंडियन्सला किती महागात पडेल किंवा मुंबईला किती सामने जिंकून देण्यात मदत करेल