यूपीएससी नागरी सेवा परीक्षा मार्फत भरले जाणाऱ्या आयएएस या पदाला सरकारकडून खालील प्रमाणे वेतनश्रेणी व पेन्शन दिली जाते व त्याचबरोबर एका आयएएस अधिकाऱ्याचं काम काय असतं याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे
आयएएस अधिकाऱ्याला पगार किती असतो
देशातील एका आयएएस अधिकाऱ्याला पगार हा बिना ( TA, DA, आणि HRA ) धरता रुपये 56 हजार रुपये प्रति महिना इतका आहे, आणि ( TA, DA, आणि HRA ) हे सगळं धरून प्रति महिना पगार हा अडीच लाखापर्यंत जातो
आयएएस अधिकाऱ्याला पेन्शन किती मिळते
सेवानिवृत्त झालेल्या आयएएस अधिकाऱ्याला पेन्शन पेन्शन ही केंद्र सरकार मार्फत प्रति महिना 50 हजार रुपये पासून एक लाख रुपये पर्यंत दिली जाते
आयएएस नोकरी किती वर्षापर्यंत करायला लागते
एका आयएएस अधिकाऱ्याला 16 ते 24 वर्षापर्यंत एका पदासाठी काम करावे लागते त्यानंतर त्याची नियुक्ती किंवा प्रमोशन पुढील पदासाठी होते जसे ऍडिशनल सेक्रेटरी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी अशा प्रकारच्या पदासाठी होते
आयएएस अधिकारी होण्यासाठी काय करावे
मित्रांनो दहावी किंवा बारावी शिक्षणावर तुम्ही आयएस या पदासाठी परीक्षा देऊ शकत नाही त्यासाठी तुमचं शिक्षण हे पदवीधर शिक्षण असायला हवे पदवीधर शिक्षण असेल तर तुम्ही नागरी सेवा परीक्षा म्हणजेच (CSE) बसवे लागेल व त्यानंतर यूपीएससी मार्फत तीन परीक्षा घेतल्या जातात त्या सर्व परीक्षेत पात्र होऊन तुम्ही आयएएस अधिकारी होऊ शकतात, परंतु संपूर्ण देशात सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाणारी परीक्षा ही आयएएस या पदासाठी असते
आयएएस होण्यासाठी अभ्यास कसा करावा लागेल
मित्रांनो तुम्हाला जर आयएस व्हायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून भारताचा इतिहास,भूगोल,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,पर्यावरण आणि विज्ञान तंत्रज्ञान अश्या सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल