मित्रांनो शैक्षणिक कामांमध्ये तसेच वाहन चालक परवाना काढण्यासाठी किंवा मतदार यादीत नाव नोंदणी साठी अशा अनेक कामांसाठी जन्म दाखला आपल्याला लागतो व तो दाखला कसा काढायचा याबद्दल आजच्या लेखात आपण माहिती पाहणार आहोत
जन्म दाखला कसा काढायचा
जन्म नोंदणी प्रमाणपत्र हे तुम्ही तुमच्या घरबसल्या मोबाईलचा वापर करून काढू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या संकेतस्थळावरती जावे लागेल जे तुम्ही मोबाईल द्वारे गुगल क्रोम या एप्लीकेशन वर (www.aaplesarkar. mahaonline.com) हे संकेतस्थळ टाकून जाऊ शकता
त्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत व पंचायत असा एक कॉलम दिसेल ज्यामध्ये तुम्हाला जन्म नोंदणी या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे, त्यानंतर तिथे सांगितलेल्या कागदपत्रांसोबत तुमचे त्या संकेतस्थळावरती रजिस्ट्रेशन नोंदणी करायची आहे व त्यानंतरच तुम्हाला जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज करायचा आहे, अर्ज कसा केला जातो याची तुम्ही युट्युब वर प्रत्यक्ष व्हिडिओ पाहून देखील अर्ज करू शकता
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथे एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल तो नंबर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जाऊन ग्रामसेवक अधिकाऱ्याला दाखवला तर तो अधिकारी तुमच्या अर्जाची पूर्तता करेल व तुम्हाला पाच दिवसात जन्म प्रमाणपत्र हे मिळून जाईल
जन्म दाखला कुठे वापरतात
जन्म प्रमाणपत्राचा वापर हा शैक्षणिक कामामध्ये, तसेच वाहन परवाना काढण्यासाठी, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी, तसेच आधार कार्ड, विवाह नोंदणीसाठी तसेच सरकारी नोकरीच्या वेळी देखील जन्म दाखल्याची आवश्यकता भासते अशाप्रकारे अनेक कामांमध्ये जन्म प्रमाणपत्र हे लागते