मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये गरजू व बेरोजगार लोकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यामधील एक योजना म्हणजे लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलीला तिच्या शिक्षणासाठी व इतर खर्चा साठी एक लाख रुपये पर्यंतचे अनुदान सरकारमार्फत दिले जाते ते अनुदान कसे दिले जाते व या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संबंधित खाली माहिती दिली आहे
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज हा तुम्ही तुमच्या जवळच्या महिला बाल विकास केंद्रा मध्ये जाऊन करू शकता अन्यथा तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका जवळ जाऊन त्यांच्याकडून अर्ज घेऊन त्या अर्जा सोबत संबंधित कागदपत्रे जोडून त्या अर्जाची तपासणी अंगणवाडी सेविका कडून करून तिच्याकडे तो अर्ज करू शकता
लेक लाडकी योजना कागदपत्रे 2024
- ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
- मुलीचा जन्माचा दाखला
- कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- आई-वडिलांचे ओळखपत्र
- रेशन कार्ड
- शाळेची बोनाफाईड
इत्यादी वरील कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला लेक लाडकी योजना 2024 ला अर्ज करण्यासाठी लागणार आहे
लेक लाडकी योजना किती अनुदान मिळते
लेक लाडकी योजनेतून पात्र लाभार्थ्यास अनुदान हे चार ते पाच टप्प्यात दिले जाते, त्यामध्ये पहिला हप्ता हा हजार रुपयाचा असतो त्यानंतर दुसरा हप्ता हा 8000 रुपयाचा असतो यानंतर तिसरा आता हा मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये इतका मिळतो. असे एकूण अनुदान 1 लाख 1 हजार रुपये इतके मिळते