हरतालिका पूजा कशी करावी
- मित्रांनो हरतालिका पूजा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे व त्या पाठावर ती तुम्हाला वाळूच्या मदतीने सर्वप्रथम वाळूची महादेव पिंड तयार करायची आहे (याचं प्रात्यक्षिक व्हिडिओ तुम्ही युट्युब वर पाहू शकता की वाळूची महादेव पिंड कशी तयार केली जाते )
- सर्वप्रथम पाठावरती मधोमध तुम्हाला वाळूच्या मदतीने एक महादेव पिंड तयार करायची आहे
- त्यानंतर त्याच पाठाच्या कडेला एक गणपती देखील तुम्हाला मांडावा लागेल
- यानंतर त्या पिंडीच्या पुढे एक नंदी महाराज देखील तुम्हाला मांडावे लागतील
- त्यानंतर पिंडीच्या बाजूला तुम्हाला पार्वती माता मांडावी लागतील त्यांच्या सखींसोबत कारण की ही पूजा पार्वती माता यांनी महादेव साठी केली होती
- यानंतर तुम्हाला महादेव च्या पिंडेला लागुण एक गंगा नदी काढायची आहे
- या पद्धतिने तुम्हाला संपूर्ण कैलास च पाटा वरती उतरवायचा आहे
हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य
हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य हे खालील प्रमाणे आहे
- सर्वप्रथम तुम्हाला हळद कुंकू तांदूळ लागणार आहे
- त्यानंतर एखाद्या पितळ्याच्या ताब्यामध्ये किंवा हंड्या मध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे
- त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही दिव्यामध्ये थोडसं तेल देखील घालू शकता
- यानंतर तुम्हाला थोडसं कापूर देखील लागणार आहे
- त्यानंतर विड्याची पान व सुपारी त्यालाच नागीलीचे पान असे देखील म्हणतात हे देखिल तुम्हाला लागेल
- यानंतर तुम्हाला दूध, तूप आणि दही देखील लागणार आहे
- तसेच थोडीशी मध व साखर देखील लागेल
- त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवण्यासाठी गुळ,खोबर व खारिक हे देखील लागणार आहे
- यानंतर तुम्हाला सौभाग्य वाण लागणार आहे जो तुम्हाला बाजारामध्ये मिळेल
- यानंतर तुम्हाला तीन पदरी कापसाची वात देखील लागणार आहे
- तसेच तुळशीच्या चार ते पाच काड्या आणि ह्या काड्यांचा उपयोग करून तुम्हाला कापसाच्या मदतीने काड्यावाती तयार करायच्या आहेत
- यानंतर तुम्हाला हळदीचे पाणी देखील लागणार आहे ज्यासाठी तुम्ही वाटीभर पाण्यात हळद टाकून त्याचे पाणी बनवू शकता
- यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला दोन-चार फळांची देखील गरज पडणार आहे ज्यामध्ये तुम्ही केळी सफरचंद चिकू किंवा सिताफळ मोसंबी अशा फळांचा वापर करू शकता
- तसेच पूजेसाठी तुम्हाला फुले व दूर्वा तसेच धोत्राचे फूल व फळ ,बेल पत्र,शमी प्रत्र, तसेच पाच प्रकारच्या फळझाडांची पाणी देखील तुम्हाला लागणार आहेत,
- तसेच तुम्हाला थोडीशी वाळू देखील लागणार आहे महादेव तयार करण्यासाठी
- अशी वरील साहित्य हे हरतालिका पूजेसाठी तुम्हाला लागणार आहेत
हरतालिका उपवासात आपण पाणी पिऊ शकतो
प्राचीन काळापासून चालत आलेल्या हरतालिका पूजनांमध्ये ग्रंथ कादंबऱ्या मधून व प्राचीन लोकांपासून आपल्याला असा बोध मिळतो की बऱ्याचश्या महिला ह्या हरतालिका उपवास करताना पूर्ण दिवस पाणी पीत नाहीत परंतु असे देखील ग्रंथांमध्ये लिहिले आहे की आपण आपली भुक टाळण्यासाठी व थकवा दूर करण्यासाठी या उपवासामध्ये पाणी हे पिऊ शकतो.
FAQ
हरतालिका व्रत का करतात
शंकर पार्वतीचे नामकरण करून हरतालिका व्रत हे महिलांद्वारे घरामध्ये केले जाते ज्याचा मुख्य उद्देश असा असतो की घरामध्ये सर्व दुःख संकटे चिंता दूर व्हावीत व घरामध्ये सुख लाभावे
महाराष्ट्रात हरतालिका उपवासामध्ये काय खावे
हरतालिका उपवासामध्ये महाराष्ट्र मध्ये आपण जे उपवासामध्ये फळे खाली येतात ती खाऊ शकतो
उपवासात आवळा खाऊ शकतो का
मित्रांनो उपवासाला तुम्ही आवळा किंवा आवळा सरबत हेच देऊ शकता ते उपवासासाठी चालते