मित्रांनो हल्लीच्या डिजिटल जगात व्यवहार हा डिजिटल ऑनलाइन पद्धतीने केला जातो आणि त्या व्यवहारासाठी भारतामध्ये ऑनलाईन फोन पे ॲप चा जास्तीत जास्त वापर केला जातो. परंतु खूप साऱ्या लोकांना हे माहीत नाही की फोन पे ॲप आपल्याला पैसे कमवायची संधी देखील देतो. तुम्ही घरातील काम करणारी महिला असाल किंवा शेतकरी असाल किंवा इतर कोणताही व्यवसाय करणारी व्यक्ती असाल किंवा नोकरदार असाल तर याचा फायदा सर्वांसाठीच आहे ते कसं तर खालील दिलेल्या माहितीनुसार आपल्याला फोन पे ॲप वरून पाच पद्धतीने पैसे कसे कमवता येतात ते तुम्ही सविस्तर खाली वाचू शकता.
शेअर करा आणि कमवा (Refer and Earn)
- मित्रांनो शेअर करा आणि कमवा हा पहिला प्रकार आहे यामध्ये तुमच्याकडे फोन पे चे अकाउंट असणे गरजेचे आहे नसेल तर ते तुम्ही सर्वप्रथम उघडून घ्या. आणि या प्रकारामध्ये जास्त करून ग्रामीण भागातील लोकांना पैसे कमावता येतील कारण ग्रामीण भागात फोन पे बद्दल पुरेशी माहिती लोकांना नसल्यामुळे तिथे लोक कमी फोन पे वापरतात त्यामुळे तिथे तुम्ही पैसे कमवू शकता
यानंतर तुम्हाला अशी लोक सापडायची आहेत की जी लोक फोन पे वापरत नाहीत किंवा त्या लोकांना फोन पे कसे वापरायचे हे माहीत नाही त्यामुळे त्यांनी आज पर्यंत फोन पे कधीच वापरल नाही. अशी लोक मिळाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्यांना फोन पे बद्दल सर्व माहिती सांगायची आहे ते कसे वापरले जाते हे देखील सांगायचे आहे जेणेकरून त्यांना वाटणार नाही की आपण कोणत्याही प्रकारची फसवणूक करत आहोत. एकदा का तुम्ही माहिती पटवून दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोन पे ॲप वरती जायचे आहे आणि तिथे दिलेल्या (Refer and Earn ) या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक लिंक आणि एक कोड दिसेल त्यामध्ये तुम्ही लिंक किंवा कोड त्या व्यक्तीच्या व्हाट्सअप वरती पाठवू शकता. आणि पाठवल्यानंतर जर त्या व्यक्तीने त्या लिंक वर क्लिक करून त्याचे फोन पे ॲप चे अकाउंट उघडले आणि पहिला व्यवहार केला तर तुम्हाला तिथे 200 ते 300 रुपये मिळतील.
- मित्रांनो (Refer and Earn ) ही लिंक तुम्ही तुमच्या नातेवाईकांना गावातील लोकांना व तुमच्या मित्र परिवाराला पाठवून त्यांचे जर फोन वरती अकाउंट नसेल तर या लिंक वरती क्लिक करून त्यांनी जर अकाउंट उघडले तर तुम्हाला नक्कीच प्रत्येक अकाउंट मागे 200 ते 300 रुपये मिळून जातील आणि हे पैसे तुम्हाला फोन पे वॉलेट मध्ये जमा होतील ज्याचा वापर तुम्ही खरेदी करण्यासाठी किंवा फोनचा बॅलन्स मारण्यासाठी किंवा रिक्षाचे भाडे देण्यासाठी किंवा दुकानाचे देखील व्यवहार करण्यासाठी करू शकता.
कॅश बॅक ऑफर ने पैसे कमवा (Cashback offers)
- मित्रांनो कॅशबॅक ऑफर हा फोन पे ॲप वरुण पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग आहे. यामध्ये जर तुम्ही फोन पे ॲप वरून मोबाईल रिचार्ज,लाईट बिल भरणे केल्यास तुम्हाला किमतीच्या 5 ते 10 टक्के पैसे कॅशबॅक स्वरूपात परत मिळतात. ( या मार्फत तुम्ही कोणाचाही बॅलन्स किंवा लाईट बिल भरून कॅशबॅक हे मिळवु शकता)
उदाहरण : समजा जर तुम्ही तुमच्या मोबाईलचा 1000 रुपयांच्या रिचार्ज फोन पे वरून केला तर त्या रिचार्ज मागे तुम्हाला 10% टक्के पैसे परत मिळतील म्हणजेच 100 रुपये तुम्हाला परत तुमच्या फोन पे वॉलेट मध्ये मिळतील.
उदाहरण : तसेच समजा जर तुम्ही फोन पे वरून तुमच्या घराचे 2 हजार रुपयाची लाईट बिल भरले. तर त्यावर देखील तुम्हाला पाच टक्के किंवा दहा टक्के कॅशबॅक स्वरूपात पैसे परत मिळतील म्हणजेच दोनशे रुपये पर्यंत पैसे तुमच्या फोन पे वॉलेट मध्ये जमा होतील.
ऑनलाइन खरेदी करून पैसे कमवा (online shopping)
- मित्रांनो ऑनलाईन खरेदी करून पैसे मिळवा हा फोन पे ॲप वर पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला फोन पे ॲप मध्ये ऑनलाईन खरेदीसाठी ॲमेझॉन,फ्लिपकार्ट असे संकेतस्थळ दिलेले आहेत. तर तुम्ही जर फोन पे ॲप मध्ये जाऊन तिथे ऑनलाइन कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य अशा अनेक प्रकारच्या वस्तू जर तुम्हाला तिथून विकत घ्यायच्या असतील तर तुम्हाला त्या वस्तूंवरती विशिष्ट सवलत मिळते व त्याच बरोबर खरेदी केल्यानंतर आपल्याला काही टक्क्यांमध्ये कॅशबॅक देखील आपल्या फोन पे वॉलेट मध्ये जमा होतो
आपण पाहतो की आजकाल खूप सारी लोक ही ऑनलाईन कपडे खरेदी करतात किंवा अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करतात तर आपण या ठिकाणी अशा लोकांची गाठ घेऊन त्या लोकांना कोणती वस्तू खरेदी करायची आहे ती वस्तू आपल्या फोन पे ॲप वरती जाऊन तिथे त्याची किंमत पाहून त्यांना आपल्या द्वारे खरेदी करून देऊ शकतो त्यामध्ये आपल्याला दोन प्रकारे फायदा होईल प्रथम म्हणजे त्या वस्तू वरती आपल्याला आपल्या फोन पे मध्ये सवलत मिळेल आणि ती वस्तू खरेदी केल्यानंतर कॅशबॅक देखील मिळेल यामधून आपण नक्कीच चांगले पैसे कमवू शकतो
- उदाहरणार्थ : एखाद्या व्यक्तीला 500 रुपयाचा ऑनलाइन शर्ट घ्यायचा असेल तर तेव्हा आपण त्या शर्टाची किंमत आपल्या फोन पे वरती किती आहे ते पाहणार जर त्यावर आपल्याला 20 रुपयाची सवलत मिळत असेल आणि खरेदी केल्यानंतर परत 20 रुपये कॅशबॅक मिळत असेल तर तेव्हा तिथे आपल्याला नक्कीच 40 रुपयाचा फायदा होईल.
यूपीआय व्यवहार कॅशबॅक
मित्रांनो यूपीआय व्यवहार कॅशबॅक हा फोन पे वरून पैसे कमवण्याचा चौथा मार्ग आहे आहे यामध्ये आपण जर किंवा कोड स्कॅन करून जर व्यवहार केला तर आपल्याला कॅशबॅक हा मिळतो.
उदाहरणार्थ : जर तुम्ही एखाद्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेला असाल आणि त्या ठिकाणी जर ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा असेल म्हणजेच त्या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी दुकानदाराने एक फोन पे कोड लावलेला असेल तर तो कोड स्कॅन करून जर आपण व्यवहार केला तर आपल्याला त्यावरती देखील विशिष्ट कॅशबॅक मिळतो. म्हणजे जर तुमचे खरेदीचे बिल हे दोन हजार रुपये झाले असेल तर त्यावर तुम्हाला 100 रुपयाचा कॅशबॅक हा परत मिळू शकतो याचा देखील तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी फायदा होईल
गेम खेळून पैसे कसे कमवायचे
- मित्रांनो यानंतर सर्वात शेवटी आपल्याला फोन पे वरती काही गेम खेळून देखील पैसे मिळतात त्यामधील एक म्हणजे सध्या भारतामध्ये राबवण्यात येणारी क्रिकेटची स्पर्धा आयपीएल ही गेम आपण फोन पे वरती खेळू शकतो व फोन पे वरती पैसे होऊ शकतो.
जेव्हा आयपीएल सुरू होते तेव्हा फोन पे ॲप वरती क्रिकेट संबंधित एक थीम आपल्याला पाहायला मिळते तिथे जर आपण गेल तर आपल्याला तिथे काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची जर आपण अचूक उत्तरे दिली तर आपल्याला तिथे पैशाच्या स्वरूपात मोठी बक्षीस मिळतात त्यामुळे तुम्ही तिथून देखील गेम खेळून पैसे कमवू शकता अनेक प्रकारच्या गेम्स या फोन पे ॲप वरती राबवल्या जातात त्यासंबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही युट्युब वरती अनेक व्हिडिओ पाहू शकता. अशा वरील पाच प्रकारे तुम्हाला फोन पे द्वारे पैसे हे कमवता येतात