मोबाईलवर शेत जमिनीचा नकाशा कसा काढायचा

शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांकडे शेतीचा सातबारा असतो परंतु त्यांच्याकडे त्यांच्या शेतजमिनीचा नकाशा नसतोत्यामुळे जर त्यांना भविष्यात शेतामध्ये जाण्यासाठी पाऊलवाट किंवा रस्ता काढायचा असेल किंवा भविष्यात जमीन विकताना जमिनीचे क्षेत्र किती आहे व त्यानुसार ते क्षेत्र नकाशा मध्ये कसे विस्तारलेले आहे हे पाहण्यासाठी किंवा एकूण जमिनीची सर्व हद्द किती आहे हे जाणून घेण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे जमिनीचा नकाशा असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की अवघ्या पाच ते दहा मिनिटात मोबाईलवर आपण आपल्या जमिनीचा नकाशा कसा काढू शकतो यासाठी खालील दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचा.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा  काढायचा

शेतकरी मित्रांनो शेत जमिनीचा नकाशा काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या या (mahabhumi.gov.in) अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल.

  • सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोबाईलवर गुगल क्रोम वरती हे संकेतस्थळ टाकून या संकेतस्थळावरती जायचे आहे
  • शेतकरी मित्रांनो अधिकृत संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला त्या संकेतस्थळाचे होम पेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला (Premium Services) असा एक तक्ता दिसेल ज्यामध्ये तीन नंबरचा पर्याय असा असेल Mahabhunakasha (Maps with Land Records) त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला एक डाव्या बाजूला (Location) हा पर्याय दिसेल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं राज्य निवडायचं आहे जे असेल महाराष्ट्र त्यानंतर खाली तुम्हाला (Category) असा पर्याय दिसेल त्यामध्ये तुम्हाला पुढे दोन पर्याय दिले असतील (Rural, Urban) जर तुम्ही ग्रामीण भागातील शेतकरी असाल किंवा व्यक्ती असाल तर तुम्हाला Rural हा पर्याय निवडायचा आहे. आणि जर तुम्ही शहरी भागातील व्यक्ती असाल तर तुम्हाला हा Urban पर्याय निवडायचा आहे
  • त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा व तालुका निवडायचा आहे व त्यानंतर तुमच्या गावाचे नाव तुम्हाला निवडायचे आहे व निवडल्यानंतर तुम्हाला (Village) या पर्यायावर ती क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर तुम्ही निवडलेल्या गावाचा संपूर्ण शेत जमिनीचा नकाशा तुमच्या समोर तुम्हाला दिसू लागेल
  • त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या गट नंबर प्रमाणे तुमच्या शेत जमिनीचा नकाशा हा पाहू शकता
  • शेतकरी मित्रांनो त्याच पेज वरती तुम्हाला (Search by plot number)असा एक पर्याय दिसेल. मित्रांनो त्याच्या मदतीने आता तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा काढू शकता
  • शेतकरी मित्रांनो वैयक्तिक तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा काढण्यासाठी (Search by plot number) या पर्यायावर ती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या जमिनीच्या सातबारा उतारा वरती असणारा गट क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे
  • त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या जमिनीचा नकाशा हा तुमच्यासमोर उघडेल जो तुम्ही (अधिक व वजा) या पर्यायाचा वापर करून झूम करून पाहू शकता

अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा हा तुमच्या मोबाईलद्वारे होऊ शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

सातबारा वारस नोंदणी मोबाईलवर करण्यासाठी 
 
येथे क्लिक करा
मोबाईलवर जमीन कशी मोजावीयेथे क्लिक करा
 FAQ

मोबाईलवर शेत जमिनीचा नकाशा कसा पहायचा

शेतकरी मित्रांनो शेत जमिनीचा नकाशा मोबाईलवर पाहण्यासाठी तुम्हाला या (mahabhumi.gov.in) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल.

Leave a Comment