Business Tips : पैसे नसताना व्यवसाय सुरू कसा करायचा..

How to start a business without money

व्यवसाय : मित्रांनो व्यवसाय हा सगळ्यांनाच करू वाटतो, परंतु व्यवसाय करताना सर्व व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांकडून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की आम्हाला व्यवसाय, उद्योग, धंदा तर करायचा आहे परंतु आमच्याकडे व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्ध नाही, तर मित्रांनो व्यवसायामध्ये जर तुमच्याकडे भांडवल उपलब्ध असेल तरच तुम्ही उद्योग करू शकता असे नाही…

व्यवसायामध्ये भांडवल नसताना ही जो व्यवसायिक त्याचा व्यवसाय उभा करतो ती खरी उद्योजकता आहे. तर भांडवल उभा करायचं म्हटलं तर पैसे जमवायचे का त्रास नाही पैसे जमवणे हा नंतरचा भाग आहे सुरुवातीला आपल्याला त्या व्यवसाया प्रति ओळख निर्माण केली पाहिजे, जसे की ग्राहकांचा तुमच्यावर विश्वास कसा बसेल, ग्राहकांना तुमची वस्तू कशी आवडेल, ग्राहकांसोबत तुम्ही कसे वागले पाहिजे, ग्राहक तुमची वस्तू कधी खरेदी करतील, या सगळ्यांचं एकच मूळ आहे की तुमची ओळख कशी निर्माण होईल

जर तुम्हाला चांगलं धंदा पाहिजे तर बाजारामध्ये तुमची चांगली ओळख पाहिजे किंवा तुमच्या वस्तूची चांगली मागणी पाहिजे, यासाठी तुम्ही तुमचं सर्वप्रथम व्यवसायाच्या दृष्टिकोनात स्वभाव बदलला पाहिजे यामध्ये प्रत्येक ग्राहक सोबत तुम्ही देवाप्रमाणे वागले पाहिजे तरच तुम्ही तुमचे धंद्यामध्ये नाव करू शकता.

मित्रांनो व्यवसाय मध्ये आपल्याला जो कोणी ग्राहक भेटेल त्या ग्राहकाची आपण मदत करण्याचे ठरवले पाहिजे म्हणजेच एक प्रकारे सकारात्मक भूमिकेवर आपण आपला व्यवसाय चालवला पाहिजे, म्हणजेच असं नाही की जो ग्राहक तुमची वस्तू घेईल त्याच्यासोबत तुम्ही चांगले वागायचे बाकीच्या सोबत वाईट वागायची असं न करता आपण जो ग्राहक येईल त्या ग्राहकाची मदत कशी होईल याचा विचार केला तर तुमचा धंदा हा आपोआप वाढण्यास सुरुवात होणार आहे

तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ओळख नावाचे भांडवल जपले पाहिजे जेवढे तुम्ही जास्त ओळख कराल तेवढं तुमचं जास्त व्यवसाय वाढेल व तुम्हाला भविष्यात कोणत्या प्रकारची पैशाची अडचण बसणार नाही त्यामुळे आपण जर सकारात्मक दृष्टीने बोलणे चालणे ठेवून व्यवसाय केला तर आपला व्यवसाय हा कमी वेळात जास्त उंचावर जातो

Leave a Comment