दूध व्यवसाय : दूध वाढीसाठी हिवाळ्यात जनावरांची कशाप्रकारे काळजी घ्यायची,जाणून घ्या….

How to take care of animals in winter to increase milk production

दूध व्यवसाय : आपल्या भागात दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत चालले असेल आणि त्याचा प्रभाव जर आपल्या गाय व म्हशीच्या दुधात होत असेल तर खालील माहिती तुमच्यासाठी एक उपयुक्त माहिती ठरणार आहे कारण की पशु तज्ञांनी काही सल्ले दिले आहेत ज्यामुळे तुमच्या दुध व्यवसाय वाढिस व उत्पादनात वाढ होणार आहे

पशु विभागातील पशु तज्ञ डॉक्टर सांगतात की हिवाळ्या मध्ये जर आपण गाई व म्हशी या उघड्यावर बांधल्या तर त्याचा प्रभाव त्यांच्या दुधावर होतो कारण की थंडीच्या प्रभावाने गाय व म्हशीचे दूध हे गोठले जाते व आपल्याला हवे तेवढे दूध गाई व म्हशीतून मिळत नाही ज्याचे नुकसान आपल्याला आपल्या उत्पादनात होते, त्यामुळे सर्वप्रथम आपण जर गाय व म्हैस उघड्यावर बांधत असेल तर ते आपण बांधणी टाळले पाहिजे

यानंतर थंड हवेपासून घ्यायची काळजी म्हणजे आपल्याकडे जर पत्र्याचे शेड असेल तर त्या पत्र्याच्या शेड वर वाळलेले गवत टाकावे तसेच गोठ्यातील खिडक्या दरवाजे यांना बाजारात मिळणारी नेट मारून घ्यावी किंवा पडदा लावून घ्यावा जेणेकरून बाहेरची थंड हवा आत येऊ शकणार नाही, तसेच गोठ्यातील जमीन व गाई म्हैस थंड न होण्यासाठी वाळलेल्या चाऱ्याचा वापर करावा

आपल्या गोठ्यात जर एखादे जनावर पहिल्यापासून आजारी किंवा अशक्त असेल तर थंडीच्या काळामध्ये त्या  जनावरावर आपण जाड कपड्याचे बारदान किंवा गोधडी टाकली पाहिजे, याचबरोबर जनावरांना जेवढे ओल्याव्यापासून दूर ठेवता येईल तेवढे ठेवण्याचा प्रयत्न करावा व गोठ्यामध्ये एक उष्णतेसाठी शेकोटी पेटवावी

याचबरोबर हिवाळ्यामध्ये जनावरांसाठी आपल्याजवळ मुबलक प्रमाणात चारा असला पाहिजे तसेच जनावरांचे शरीर उबदार ठेवण्यासाठी जर आपण त्यांना चाऱ्यामध्ये पेंड किंवा गूळ घालून दिले तर त्यांचे शरीर उष्ण राहण्यास मदत होते ज्याचा फायदा आपल्याला आपल्या दूध उत्पादनात होतो

तसेच वेळोवेळी आपण पशु तज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या रोगप्रतिबंधक लस दिली पाहिजे, तसेच जनावरांना दिवसातून चार वेळा कोमट पाणी प्यायला दिले पाहिजे ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, व हिवाळ्यात जनावर आजारी पडण्याचे लक्षण कमी होते, तसेच हिवाळ्यात दुपारचे ऊन जेव्हा असते तेव्हा जनावरांना व्यवस्थित धुवून घ्यावे व उन्हात वाळण्यासाठी बऱ्याच वेळ बांधून ठेवावे

अशा वरील प्रकारे तुम्ही हिवाळ्यामध्ये जनावरांची काळजी घेऊ शकता व तुमच्या दूध उत्पादनात वाढ करू शकता वरील माहिती ही संपूर्ण पशुवैद्यकीय विभागाकडून व काही पशु डॉक्टरांकडून घेण्यात आली आहे व आपल्याला देण्यात आली आहे ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास तुमच्या जवळच्या दूध व्यवसायिकाला पाठवा

Leave a Comment