Krushi News : बँकेकडून पीक कर्जामध्ये वाढ, शेतकऱ्यांनी केली बँकेत गर्दी,पहा किती वाढ झाली..

Increase in crop loan for farmers from pdcc bank

कृषी बातम्या : मित्रांनो महाराष्ट्र मध्ये अनेक बँकांनी पीक कर्जामध्ये वाढ केली आहे ज्यामध्ये पुणे मध्यवर्ती बँक म्हणजेच पीडीसीसी बँक ने शेतकऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी कर्जामध्ये वाढ केली आहे जसे की आत्ता गेलेला खरीप हंगाम प्रत्यक शेतकऱ्यासाठी नुकसानदायी होता कारण म्हणजे शेतकऱ्याला पाहिजे तेवढे त्या हंगामातून उत्पादन मिळाले नाही व पिकांचे देखील नुकसान झाले होते.

परंतु रब्बी हंगामात तरी काहीतरी उत्पादन काढण्यासाठी शेतकरी आता रब्बी हंगामातील पीक घेण्यास सुरुवात करत आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे व शेतकरी पीक कर्जासाठी बँकेमध्ये रांगा देखील लावत आहेत,त्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक बँकांनी ज्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकने शेतकऱ्याच्या पीक कर्जामध्ये वाढ केली आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने रब्बी हंगामात 630 कोटी रुपये पीक कर्ज वाटण्याचा निर्णय घेतला होता ज्यामध्ये बँकेने आत्तापर्यंत 408 कोटी 17 लाख रुपये म्हणजेच एकूण रकमेच्या 64% रक्कम ही पीक कर्ज स्वरूपात शेतकऱ्याला वाटली आहे ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात 82 कोटी 80 लाख रुपयांनी पीक कर्जामध्ये वाढ करण्यात आली आहे.

वरील पीक कर्ज अनुदान हे रब्बी हंगामातील हरभरा,गहू,ज्वारी,करडई अशा विविध पिकांची पेरणी व उत्पादनासाठी शेतकऱ्यासाठी हे अनुदान वाटले आहे परंतु जे शेतकरी रब्बी हंगामात ऊस,टोमॅटो,कांदा,बटाटा,केळी,द्राक्ष,डाळिंब,आंबा,गुलाब,जरबेरा,ढोबळी मिरची,भात,भुईमूग अशा पिकांची लागवड करतात त्यांच्यासाठी देखील हे पीक कर्ज अनुदान बँकेकडून देण्यात येणार आहे, त्यामुळे या सर्व पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक गरज भासत आहे त्यामुळे शेतकरी बँकेमध्ये पीक कर्जासाठी गर्दी करत आहेत त्यामुळे आपल्याला जर पीक कर्ज हवे असेल तर आपण आपल्या जवळच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जाऊन पीक कर्ज अनुदानाचा लाभ घेऊ शकता

Leave a Comment