महाराज लोकांनी कीर्तनाची 40,000 रू. सुपारी घेणं योग्य आहे का, इंदुरीकर महाराज यांचे सुंदर उत्तर…..

Indurikar Maharaj

महाराष्ट्र मध्ये वारकरी संप्रदायाला भरपूर प्रसिद्धी मिळत चालली आहे ज्यामुळे अनेक कीर्तनकार महाराज हे एका कीर्तनाची अवघे 40 ते 50 हजार रुपये घेत आहेत, त्यामुळे खूप साऱ्या लोकांच्या मनात आता एकच प्रश्न उभा राहत आहे की कीर्तनकार महाराजांनी आता वारकरी संप्रदायाचा धंदा करून ठेवला आहे. यावर खूप सार्‍या लोकांचे म्हणणे असे आहे की महाराज लोकांनी कीर्तनाची 40 ते 50 हजार रुपये सुपारी घेणे योग्य आहे का ? तर या प्रश्नावर नुकत्याच झालेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनात त्यांनी एक अप्रतिम उत्तर दिले….

इंदुरीकर महाराज म्हणतात कि आपण जेव्हा कीर्तन करण्यास जातो त्यावेळी आपल्या बरोबर टाळकरी, पखवाज वादक, पेटीवादक असा लवाजमा घेउन जावा लागतो. ही मंडळी आपले काम सोडुन तुमच्या शब्दाखातर तुम्हाला साथ देण्यासाठी आणि तुमचे किर्तन सुंदर तसेच आकर्षक व्हावे यासाठीच येतात. आपण जर त्यांना त्याबद्दल मोबदला जर नाही दिला तर ते बरोबर येतील का? नाही आले तर किर्तनकाराचे किर्तन चांगले होणार नाही आणि जे भाविक मंडळी किर्तन ऐकण्यास आलेली असेल ती निघुन जाईल. आणि तो किर्तनकार किर्तन करण्याचे सोडुन देईल.

पुर्वीच्या काळी लोकांच्या किर्तनातील अपेक्षा कमी होत्या.परंतु आता त्यांना किर्तन विविध रंगी हवे असते. आणि लोकांना कीर्तनाची आवड व्हावी कमीतकमी ते किर्तनस्थळी यासाठी किर्तनकाराला नेहमी अपडेट रहावे लागते. त्याची सुरवात त्याच्या पोशाखापासुन सुरु होऊन ते द्न्याना पर्यंत असते हे सर्व साधण्यासाठी पैशाची गरज असते. तसेच किर्तनाच्या ठीकाणी मंडळी आणि वाद्याची ने आण करण्यासाठी वाहनाची गरज असते. आणि या सर्वांसाठी पैसा लागतो.

तसेच आयोजक ईतर गोष्टींवर ज्यातून काहीच परमार्थ मिळणार नाही त्यावर पाण्यासारखा पैसा ऊधळत असतात. परंतु किर्तनाची वेळ आली की त्यांचे डोळे विस्फरतात. लोकांना जर आपण फुकटे पणाची सवय लावली तर त्यांना किर्तनकाराचा आदरही राहत नाही तसेच किंमत ही रहात नाही. लोकं आपले खिसे विषयसुखातील गोष्टींसाठी खाली करण्यासाठी आतुरलेली असतात. पण पारमार्थिक कार्यासाठी आखडतात. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्याने पैशाचा मोह सोडला तर चांगलं आहे. परंतु ज्या संसारीक मनुष्याला परमार्थ करण्याची इच्छा असेल परंतु आर्थिकअडचणक असेल तर त्याने आपल्या द्न्यानाचा उपयोग. परमार्था बरोबरच संसाराचे रहाट गाडं हाकण्यासाठी नक्कीच करावा. कारण ज्याचा संसार नेटका असतो तोच चांगला परमार्थ करु शकतो. समर्थ रामदास म्हणतात संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी.

पोष्ट मधील महाराज जो उपदेश करीत आहेत. त्यांना संसाराचा जरी त्याग केला असला तरी संसारीक गोष्टींचा त्याग केलेला नाही. ते एवढ्या मोठ्या मंचावर येऊन भाषण देत आहेत तर त्यांना इथपर्यंत येण्यापासून ते पुन्हा घरी जाईपर्यंत अनेक यंत्रणा कामाला लागल्या असणार अधिक त्यांच्या शारीरिक गरजा या सर्वांसाठी पैसा लागतो. तो त्यांनी कसा जमवला? त्याचा ते त्याग का करत नाहीत. असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत…..रामकृष्ण हरी

Leave a Comment