महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना, पुरुष कसे फायदा घेऊ शकतात

udyogini yojana for women in maharashtra

Sarkari Yojana : महाराष्ट्र व तसेच संपूर्ण जगभरात जर आपण महिलांचा विचार केला तर महिला व्यवसायामध्ये खुपच कमी पाहायला मिळतात त्यामुळे केंद्र सरकार अंतर्गत महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे ज्याचा फायदा व्यवसाय करून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल व व्यवसायामध्ये महिलांना प्राधान्य मिळेल

तुम्ही पुरुष असो किंवा महिला तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, आणि तुमची आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल, तर केंद्र सरकारने संपूर्ण भारतातील महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना आणली आहे ज्यामध्ये तुम्हाला व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळणार आहे तर समजा तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही महिलेच्या नावावर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

वरील योजनेचा लाभ हा तुम्हाला योजनेत असलेल्या 80 उद्योग धंद्यापैकी जर तुम्ही एक उद्योग केला, तर त्या योजनेचा लाभ तुम्हाला त्या उद्योगातून मिळणार आहे, ते सर्व 80 उद्योग खालील प्रमाणे आहेत.

अगरबत्ती उत्पादन व्यवसाय, खाद्यतेलाचा व्यापार व्यवसाय, लायब्ररी, रेडिओ टीव्ही खरेदी-विक्री, बेकरी, ऑडिओ व्हिडिओ पार्लर, एनर्जी फूड व्यवसाय, नाचणी vपावडर दुकान व्यवसाय, कपडे विकणे व्यवसाय, बेडशीट टॉवेल तयार करणे व्यवसाय, ट्रेड दुकान व्यवसाय, लिफ्ट कप व्यवसाय, रियल इस्टेट एजन्सी व्यवसाय, सौंदर्य ब्युटी पार्लर व्यवसाय, पुस्तके आणि नोटबुक बाइंडिंग व्यवसाय, फॅक्स पेपर व्यवसाय, चटई विणणे व्यवसाय, बांगड्या रिबीन व्यवसाय, असे वरील व अजुन एकूण 80 व्यवसाय या योजनेअंतर्गत येतात व या व्यवसायासाठी तुम्हाला तीन लाख पर्यंत कर्ज हे मिळते

उद्योगिनी योजनेसाठी किती अनुदान दिले जाते

केंद्र सरकार महिला विकास महामंडळ अंतर्गत महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना जी राबवली जाते त्यासाठी त्या योजनेतून 30 टक्के सबसिडी अनुदान महिलांना दिले जाते तसेच 3 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज हे या योजनेअंतर्गत महिलांना दिले जाते.

उद्योगिनी योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात

  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड
  • जन्माचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • जात प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड

वरील योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखाच्या आतील असायला हवे

उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा करायचा

उद्योगिनी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला या योजने संबंधित माहिती सांगायचे आहे व त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी एक अर्ज दिला जाईल तो अर्ज वरील कागदपत्रांसोबत भरून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून पूर्तता केली जाईल व तुमची या योजनेसाठी निवड केली जाईल त्यानंतर थेट तुमच्या खात्यावर या योजनेअंतर्गत तीन लाख रुपये बिनव्याजी कर्जावर तुम्हाला दिले जातील. 

Leave a Comment