IPL 2024 : सगळ्यांच्या मनात पडलेला प्रश्न म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्मा येणाऱ्या t20 वर्ल्ड कप सामन्यात संघाला कसे मैदानात खेळवेल व तो सर्वात उत्कृष्ट कर्णधार आहे हे कसे लोकांना पटवून देईल हा प्रश्न सगळीकडे होता परंतु नुकत्याच आलेल्या मुंबई इंडियंस संघाच्या बातमीकडून असे कळते की मुंबई इंडियंस संघाचे कर्णधार पद हे रोहित शर्माने सोडून आता मुंबई इंडियंस संघाचा कर्णधार हा हार्दिक पांड्याला बनवण्यात आले आहे
नुकत्याच काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या हा गुजरात टायटन्स या संघाचे कर्णधार पद सोडून मुंबई या संघात दाखल झाला परंतु कुणालाच असे माहीत नव्हते की हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियंस संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात येईल त्यामुळे येत्या ipl 2024 मध्ये मुंबई इंडियंस या संघाचा कर्णधार हा हार्दिक पांड्या असणार आहे
सर्व मुंबई इंडियंस संघाच्या व अनेक क्रिकेट प्रेमींच्या मनात आता एकच प्रश्न पडत आहे तो म्हणजे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्माने 12 सामन्या मधील 11 सामने तो कर्णधार म्हणून संघाला जिंकून दिले आहेत व असंख्य सामने मुंबई इंडियंस संघाला देखील आयपीएल मध्ये जिंकून दिले आहेत मग असे काय झाले की जेणेकरून रोहित शर्माला मुंबई इंडियंस संघाचे कर्णधार पद हे सोडावे लागले
IPL 2024 मुंबई इंडियंस या संघाचे कर्णधार पद रोहित शर्मा सोडणार म्हणून सोशल मीडिया वरती अनेक सारे प्रश्न उभे होत आहेत, त्यावर परंतु अजूनही रोहित शर्माचे काही प्रतिउत्तर आलेले नाही