Electric tractor : बाजारामध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी मागणी वाढेल का; जाणून घ्या ही ठराविक कारणे!

is electric tractor demand will increase in 2024

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर : बाजारामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे आता इलेक्ट्रिक बाइक,इलेक्ट्रिक चार चाकी गाड्या, याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील उपलब्ध होणार आहेत यासाठी भारत सरकारने शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर निर्मितीसाठी खूप प्रोत्साहन दिले आहे ज्यामध्ये महिंद्रा सारखी कंपनी व टाटा सारखी कंपनी देखील इलेक्ट्रिक ट्रॅक्टर निर्मितीसाठी भरारी घेत आहे

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी शेतकऱ्यांची मागणी वाढेल का

आपण जर शेती व्यवसायाचा विचार केला तर शेती व्यवसायामध्ये जमिनीच्या मशागतीसाठी शेतकऱ्याला वर्षाचा खर्च हा खूप येत असतो ज्यामध्ये ट्रॅक्टरचे भाडे असेल किंवा ट्रॅक्टरला लागणारा डिझेल खर्च असेल त्यामुळे एक प्रकारे जर आपण विचार केला तरी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी शेतकऱ्यांची मागणी वाढू शकते कारण असे की इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला डिझेलच्या तुलनेत कमी खर्च लागतो व आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा घरबसल्या चार्जिंग करू शकतो त्यामुळे जर डिझेलच्या खर्चात शेतकऱ्याला घट होत असेल आणि त्याचा फायदा जर त्याला शेतीच्या उत्पादनात होत असेल तर नक्कीच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला येत्या काळात मागणी वाढू शकते

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चांगला की डिझेल ट्रॅक्टर चांगला

आपण जर डिझेल ट्रॅक्टरचा विचार केला तर डिझेल ट्रॅक्टर हे 30 एचपी ते 50 एचपी पर्यंत मिळतात तसेच डिझेल हे इंधन असल्यामुळे डिझेल ट्रॅक्टरला पावर ही खूप जास्त असते त्यामुळे जर आपला शेतीचा खर्च जास्त असेल व आपले उत्पादन जास्त असेल तर आपल्याला परवडणारा ट्रॅक्टर म्हणजे डिझेलचा ट्रॅक्टर पण नुकत्याच आलेल्या माहिती सांगण्यात आले आहे की येत्या वर्षात डिझेल ट्रॅक्टरच्या किमतीत वाढ होणार आहेत त्यामुळे आपला जर डिझेल ट्रॅक्टर घेण्याचा विचार असेल तर आपण आत्ताच घ्यायला हवा

 जर आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा विचार केला तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला पावर थोडी कमी असते परंतु इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टर जे काम करतो ते काम तो ट्रॅक्टर करू शकतो फक्त फरक एवढाच आहे की इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अजून पाहिजे तेवढे डेव्हलप नाही त्यामुळे महिंद्रा किंवा टाटा कंपनीचे जेव्हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे उत्पादन होईल तेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घेण्याचा विचार करू शकता कारण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये या दोन कंपनी ह्या सर्वात चांगल्या कंपन्या म्हणून ओळखले जातात, याचबरोबर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला डिझेल ट्रॅक्टर पेक्षा कमी खर्च असतो संपूर्ण खर्च हा चार्जिंगचा असतो जो आपण घरबसल्या चार्जिंग करू शकतो त्यामुळे आपल्याला या ट्रॅक्टरमध्ये कोणतीही काळजी करण्याची गरज नाही

Leave a Comment