Milk बिज़नेस : दुध व्यवसाय खरंच परवडतो का? आपण दूध व्यवसाय केला पाहिजे का…

is milk business really a profitable buisness in maharashtra

दूध उत्पादक व्यवसाय : महाराष्ट्र मधील व जगभरातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे दूध व्यवसाय आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे दूध व्यवसायासाठी एक अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो दूध व्यवसाय हा खरच फायदेशीर व्यवसाय आहे का व हा व्यवसाय आपण केला पाहिजे का या संबंधित आज आपण या लेखात माहिती घेणार आहोत

आपण पाहतो की गेल्या काही वर्षापासून शेतकरी आणि दूध ग्राहकांमध्ये अगदी तणावाचे वातावरण आहे ते कसे तर जनावर पाळण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढा भाव जनावराच्या दुधाला मिळत नाही त्यामुळे दूध उत्पादक तणावामध्ये आहे आणि सामान्य ग्राहकांना दूध व्यापाऱ्यांकडून जास्त किमतीत खरेदी करावा लागत आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील निराशा आहे

दिवसेंदिवस आपण पाहतो की दूध उत्पादनाचा खर्च हा वाढत चालला आहे आणि त्याच्या तुलनेत पाहिले तर दुसरीकडे भेसळयुक्त दुधामुळे दुधाचे दर हे दिवसें दिवस ढासळत चालले आहे. तर हेच दुधाचे दर महाराष्ट्र मध्ये का पडत आहेत व यासाठी जबाबदार कोण असेल शेतकऱ्यांसाठी व नवीन तरुण पिढीसाठी दुधाचा व्यवसाय हा एक परवडणारा व्यवसाय आहे का या प्रश्नांवर आज आपण माहिती पाहणार आहोत

पूर्वी जर आपण पाहिले तर जनावरांचे व जनावरांच्या जातींचे प्रमाण हे खूप कमी होते त्यामुळे अगदी मुबलक प्रमाणे बाजारामध्ये दूध उपलब्ध असायचे ज्याचा फायदा शेतकऱ्याला व दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला चांगला व्हायचा परंतु आत्ता जर आपण पाहिले तर जनावरांमध्ये असंख्य वाढ होत चालली आहे आणि जनावरांच्या जाती देखील आपण बाजारांमध्ये खूप पाहू शकतो त्यामुळे दुधाचे प्रमाण देखील बाजारामध्ये खूप वाढले आहे

ज्यामुळे कुठे ना कुठे दुधाचे दर हे कमी पडत चालले आहे जसे की ज्या गोष्टीला मागणी जास्त असते व ती गोष्ट जर अति प्रमाणात मिळत असेल तर त्या गोष्टीचे दर कमीच असतात उदाहरणार्थ आपण जर पाहिले बाजारामध्ये मेथी भाजीचे प्रमाण जर जास्त असेल तर प्रत्येक जण ती भाजी स्वस्त दरात आपल्याला विकेल परंतु जर मेथीचे प्रमाण कमी असेल तर ती एक भाजी आपल्याला महाग किमतीत पडेल त्यामुळे दुधाचे देखील असेच झाले आहे दुधाचे वाढते प्रमाण पाहून दुधाचे दर देखील खूप घसरले आहेत व येत्या काळात दूध व्यवसाय हा न चालणारा व्यवसाय देखील ठरणार आहे

दूध व्यवसाय न चालण्याचे कारण म्हणजे बाजारामध्ये असंख्य आलेल्या कंपन्या ज्या भेसळयुक्त दूध विकतात तसेच पावडरीचे दूध विकतात त्यामुळे त्याचा फटका हा शेतकऱ्याच्या दुधाला बसणार आहे तसेच वाढत्या डेऱ्या त्यामुळे देखील दुधाला मागणी वाढली व त्याचे दर कमी झाले आहेत एकंदरीत जर आपण पाहिले तर दूध व्यवसाय हा आताच्या घडीला भेसळयुक्त व्यवसाय म्हणून ओळखला जातो

दूध व्यवसायात आपल्याला जर खरोखर यश हवी असेल तर आपण जर दूध हे एखाद्या डेअरीत घालण्यापेक्षा डायरेक्ट घरोघरी घातले व ते दूध चांगल्या क्वालिटीचे घातले न भेसळ करता तर आपण या व्यवसायात यशस्वी ठरू शकता व आपल्या दुधाला ग्राहकांकडून मागणी देखील येऊ शकते व ते दूध आपण जास्त किमतीत देखील विकू शकता अशा प्रकारे जर आपण दुधाचा व्यवसाय केला तर आपण नक्कीच दूध व्यवसायात एक यशस्वी व्यावसायिक ठरू शकता

Leave a Comment